Skip to main content

अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 12/01/2014 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक : headphone वर गाणे ऐकत बसलो होतो . बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? " "आतिफ अस्लम ." त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही . "तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. " असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे . म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ? वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील . http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imit… http://www.itwofs.com/hindi-opn.html nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ? या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात . १) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ? २) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ? ३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ? मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .

वाचने 32833
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

खरे तर अनुल्लेखाने मारण्याच्या योग्यतेचा लेख. त्या निमित्ताने रसिक अभ्यासूँचे प्रतिसाद वाचायला मिळाले हा एक फ़ायदा

एक गाणे ज्याची चाल एका मराठी गाण्यावरुन उचलली आहे धूल का फूल मधले आशा भोसलेने गायलेले झुकती घटा गाती हवा सपने सजाए हे गाणे "फांद्यावरी बांधियले मुलीनी हिंदोळे" हे गजानन वाटव्यांच्या गाण्यावरुन. अगदी तीच चाल. जुन्या गाण्याबद्दलचा अजून एक मुद्दा म्हणजे त्यांचे दीर्घ आयुष्य. त्या गाण्यांच्या अंगभूत गुणांमुळे ती गाणी ४०, ५०, ६० वर्षे उलटून गेली तरी ऐकली जातात. आजची किती गाणी इतकी वर्षे टिकतील? १९८० वा १९९० च्या दशकातील किती गाणी आज ऐकली जातात?

मिपावरचे अनेक धागे पाहून आम्हालापण असं काहितरी खळ्ळबळ्ळजनक लिहून शतकी जिल्बी पाडण्याची सुर्सुरी आली आहे... कोणि शिक्वणि घेणर कं?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्वतःच्याच पोस्टवर`निव्वळ वाचनमात्र' राहावं लागणं फार क्लेष्दायक असणार इक्काजी!

In reply to by संजय क्षीरसागर

उद्गीरकरांनी तुमची शिकवणी न लावल्याचा परिणाम आहे हा! आसं आम्हाला वाटतंय इतकंच. काही कमी जास्त बोलले असल्यास क्षमस्व.

In reply to by शिल्पा ब

मनःपूर्वक ऐकावित आणि गैरसमज पसरवू नयेत इतकंच. त्यांना काँपोझिशन समजणं फार पुढची गोष्ट आहे.

नॉस्टेल्जियाचे उमाळे या शब्दप्रयोगामुळे अनेकांना राग आलेला दिसतो आहे. माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे. अशा चाली प्रेरणा म्हणून घेणं आक्षेपार्ह किंवा कसं हे स्वतंत्रपणे ठरवावं. पण आवडत्या संगीतकारांनी ते केलंच नाही, कारण ते थोर होते आणि आजकालचे तसलं करतात म्हणून ते कमी दर्जाचे असं म्हणण्यात एक दुटप्पीपणा आहे. पूर्वीच्या संगीत दिग्दर्शकांनीही चोऱ्या केल्या. मूळ गाणं ऐकल्यानंतर एस डी बर्मनने 'हम थे वो थी और समा रंगी, समझ गये ना' हे गाणं ढापलेलं नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चोरीला सरळ चोरी म्हणावं आणि चांगल्या गाण्याला चांगलं गाणं म्हणावं. दोनमध्ये गल्लत करू नये. जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं. त्यामुळे आपल्याला माहित नसताना चोरून सादर केलेल्या गाण्याने जो आनंद मिळाला तो हिरावला जात नाही.

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या मते लेखकाचा मुद्दा असा की इतर गाण्यांवरून चाली बेतण्याची परंपरा कायमच चालत आलेली आहे. सर्वांनीच ते केलेलं आहे.
हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही? मूळ लेखात व त्यावरील चर्चेत तुम्हाला फक्त इतकेच दिसत असेल, तर मग तुमच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही!

In reply to by प्रदीप

हे पूर्वीच पटलं आहे! त्यांचे सकाळचे मुद्दे दुपारी सेम राहातील की नाही सांगता येत नाही कारण सगळं डेटाबेस्ड! जरा कुठे विदा दिसला की हे फिदा! (मग मुद्दा काहीही असो) .नायतर यांना काय पडलीये इतक्या भंपक लेखाच्या समर्थनाची? पण विदा दिसला ना! कुणी तरी अंकल अन्नू मलिक किंवा प्रितमविषयी विधान करतो आणि लेखक त्याला सुनवायच्या ऐवजी इथे लेख टाकून डायरेक्ट विचारतो :
अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?
आणि हे सदगृहस्थ म्हणतात : "जुन्यातलंही काही कचकड्याचं सोनं होतं हे मान्य करावं"! म्हणजे लेखक म्हणतोयं सगळेच निकामी आणि त्याला सावरायला हे म्हणतात सोन्याचं ठीकाये हो पण कचकड्याकडे पाहा! आहे का नाही विनोद!

In reply to by संजय क्षीरसागर

माफ करा, संजय. राजेशशी चर्चा करण्यात अर्थ नाही, हे मी फक्त ह्या चर्चेच्या संदर्भात म्हटले आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

ओ पी व आर डी यांची अक्खी कारकीर्द ढापूगिरी वर आधारलेली आहे. हा शीध ज्याने लावला तो त्याला लखलाभ ! खास गोष्ट अशी की चिकित्सक पुण्यात कोणत्या दोन संगीतकारांच्या वर जास्त कार्यक्रम होतात ते जरा विदा गोळा करून पाहावे. आताच आजच्या १६ जाने च्या वर्तमान पत्रावर नजर जावी.

In reply to by प्रदीप

हेच, असेच आणि इतर स्वैर व बिनबुडाची शेरेबाजी न करता लिहीता आले असते, नाही?
मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या. कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?

In reply to by राजेश घासकडवी

मुळात झालेल्या स्वैर आणि बिनबुडाच्या शेरेबाजीला प्रतिसाद म्हणून तो लेख आहे हे लक्षात घ्या.
मुळातील शेरेबाजी चुकीची होती, ह्याबद्दल वाद नाही.
कोणी खोडी काढली तर त्यावर अवास्तव पातळीवर प्रतिसाद येणं हे काही नवीन नाही. मग दोष कोणाचा? अतिरेकी प्रतिसाद देणाराचा की खोडी काढणाराचा? की दोघे तत्त्वतः सारखेच दोषी?
ही खोडी येथील चर्चांमधे अथवा कुठल्याही इतर लेखामध्ये काढलेली नाही. आणि तशीही ती कुणी काढलीच, तरी त्यावर प्रतिसाद कसा द्यावा, हे ज्या त्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. अत्यंत बोचरी टिका होऊनही शांत आणि मुद्देसूद, कुठेही पाय न घसरता प्रतिसाद देता येतात. तसे देणारे इथेही अनेकजण आहेत. कुणीतरी अत्यंत गैर टिका नव्या संगीतकारांवर केली, त्यात त्या व्यक्तिचे अज्ञान दिसलेच. परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे, आणि मुळात तेव्हढेच तुम्हाला ह्या लेखात दिसत आहे, ह्याचे मला आश्चर्य वाटते आहे! माझ्यापुरते सांगायचे झाले तर नॉस्टॅल्जियाच्या कुणी त्रयस्थाने केलेल्या उल्लेखाने मला काहीही वाटत नाही, तसे वाटलेही नाही. पण त्यानिमीत्ताने जी भरमसाट अतिशयोक्त उठवळ विधाने केली गेली, ती आक्षेपार्ह होती.

In reply to by प्रदीप

परंतू ह्यामुळे एकदम बेताल (आणी बेसूर) होऊन स्वतःचे ह्या विषयावरील अज्ञान दर्शवणारी टिका 'त्या व्यत्किचे श्रद्धास्थान' वगैरे असलेल्या संगीतकारांवर करणे तुम्हाला पटते आहे
१. विषयावरचं ज्ञान त्यांनी व्यवस्थित गाण्यांचे आणि मूळ गाण्यांचे दुवे देऊन दाखवलेलं आहे. २. श्रद्धास्थान म्हणजे काय, तर आवडीचा संगीतकार आहे. त्याने जर चोऱ्या केल्या असं सिद्ध केलं तर त्याला काय हरकत आहे? ३. मला लेखात दिसलेलं सगळंच मांडण्याची मला गरज वाटत नाही. तेव्हा कृपया मी काय लिहिलं नाही याबाबत माझ्यावर टीका करू नये. राहता राहिला मुद्दा बेसूरपणाचा आणि कर्कशपणाचा. तो ज्याच्या त्याच्या कानावर अवलंबून आहे. कोणाला हळूवार, दर्दभरं संगीत आवडतं; कोणाला ढॅण ढॅण रॉक म्यूझिक आवडतं. कोणाचे कान नाजूक असतील, कोणाचे नसतील. चालायचंच.

फक्त इतकेच माहीती कि:
  • मी घरी (माझ्या/मित्राच्या/नातेवाईंकाच्या) बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना हे कुणाचे पाहून (नक्कल) म्हनून बनविले हे पाहात नाही. काही पुस्तकात पाहून/जालावर वाचून अगदी हुकुमबर्हूकुम बनविले असतील तरी,बल्ल्वाचर्य्/र्यीचे हातगुण त्या पदार्थांवर संस्कार करतातच.
  • तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही
पहिल्यामधल्यांनी किमान अक्कल्/श्रम्/प्रयत्न केलेले असतात दुसरयानी फक्त दिखावा (श्रेयासाठी) आणि हो तिळगुळ घ्या गोड बोला. घरोघरीच्या तिळगुळात मुख्य घटक तेच असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते,तोच दृष्टीकोण बेतलेल्या गाण्यांबाबत ठेवायला काय हरकत आहे? बेतलेल्या हा शब्द हे दिलेल्या दुव्यावरिल इन्स्पायर्ड चे स्वैर भाषांतर आहे. जागोजागी हाच शब्द वापरला आहे.

रेहमान आणि अस्लम चोर नाहित आणि बर्मन आणि ओपी होते हा मुद्दा नसुन सगळेच चोर आहेत. उगाच दोघाचौघांना वेगळे काढुन कशाला मारता असा उद्गिरकरांचा सूर आहे जो माझ्या मते चुकीचा नाही. सगळेच चोर आहेत. फक्त इतकेच की काहिंनी अवीट गोडीच्या काही ओरिजिनल चाली पण दिल्या तर काहिंनी आयुष्यभर उष्टे खाण्यातच समाधा मानले. अन्नू मलिक नावाच्या एका महाभागाने तर एकाच गाण्यावरुन चोरलेली धून साधारणपणे एकाच वेळेस प्रदर्शित होणार्‍या दोन वेगवेगळ्या चित्रपटातल्या गाण्यांना देउन धमाल उडवुन दिली होती.

In reply to by इस्पिक राजा

तुम्ही म्हणतायं
सगळेच चोर आहेत.
आणि पुढे म्हणतायं
फक्त इतकेच की काहिंनी अवीट गोडीच्या काही ओरिजिनल चाली पण दिल्या
या अवीट गोडीच्या चालींची संख्या कॉपीजच्या कित्येक पट आहे, हा मुळ मुद्दाये. तुमचा सांगितिक अभ्यास असेल तर त्या युगातली अवीट गोडीची गाणी आणि पाश्चात्य सिंफनीजवरुन उचललेली गाणी यांचा रेशो काय आहे? लेखक म्हणतो तशी `एकदम सही सही नक्कल' असलेल्या गाण्यांची यांची यादी देऊ शकाल काय? (त्यानं दिलेल्या दोन गाण्यांवर मी यथोचित प्रतिसाद दिलेत त्यामुळे त्या लिंक्सला काही अर्थ नाही.) माझ्या मते `इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणं मोझार्ट्च्या Symphany-40 ची सहीसही कॉपी आहे. पण अशी नक्की किती गाणी आहेत? म्हणजे लेखक जे विधान करतो "सगळाच मामला चोरीचा आहे" (आणि ज्याला तुमचं अनुमोदन आहे) ते कितपत योग्य आहे? लेखात दिलेली साईट अत्यंत भिकार आहे असं माझं मत आहे. अर्थात तिचा उपयोग केलात तरी हरकत नाही पण एकदा शहानिशा होऊन जाऊं दे!

सचिनदेव बर्मन ह्यांची कारकिर्द चोरलेल्या गाण्यांवर आधारीत होती हे वाचुन लेखकाच्या बुद्धीची कीव आली. त्यांनी, शंकर जयकीशन, कल्यांणजी-आनंदजी नी प्रत्येकी काही शे चांगली गाणी दिली आहेत. त्यातली १०-२० असतील चोरली, तर काय विषेश?

कारकिर्द चोरलेल्या गाण्यांवर आधारीत होती हे जरा जास्त आहे पण तरीही आपण जर का काही चाली उचलल्या तर त्या सांगायला पाहिजेल होत्या हां खरा मुद्दा आणि तो मान्य करण्यात फार कोणाला त्रास नसावा.

अभियांत्रिकीला असताना मास्तर म्हणायचे-दुसर्‍याची drawing sheet GT मारा,कॉपी करा पाहिजे तर! पण नीट समजून् घेवून .बिनडोकपणे कॉपी नको.