Skip to main content

हिंदु पुरुषांना एका पेक्षा अधिक विवाह करण्यास प्रतिबंध नसावा !

लेखक मारवा यांनी गुरुवार, 26/12/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही. म्हणजे हिंदु पुरुषांना ही एकपत्नीव्रता ची जाचक अट का कायद्यात घातली यामागे हिंदुंची कोणती परंपरा गृहीत धरण्यात आलेली होती याची मला माहीती नाही( जाणुन घेण्याची आकांक्षा आहे) कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे. एका एकपत्नीव्रती महापुरुषाच्या विरोधात शंभर बहुपत्नीव्रती महापुरुषांची उदाहरणे देता येतील,मग हा कायदा बनवितांना कोणती मुळ परंपरा गृहीत धरण्यात आली होती माहीत नाही.या कायद्याने हिंदु पुरुषांच्या एकापेक्षा अधिक विवाह करण्याच्या आणि संबधित विवाहास संमती असणारया स्त्रीयांच्या ही असा विवाह करण्याच्या मुलभुत मानवी हक्कांवर गदा येते यात शंका नाही.याने अनेक हिंदु पुरुष आणि स्त्रीया विवाहाच्या सहजीवनाच्या नैसर्गिक आनंदाला पारखे होतात. आता असे विवाह करण्याची आकांक्षा असलेल्या हिंदु पुरुषांना कायद्यात तरतुद नसल्याने मग निष्कारण चुकीचे मार्ग अवलंबाबे लागतात. कायद्याच्या भीतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रेमभावने वर बंधन घालावे लागते.अन्यथा निष्कारण मग धर्मांतराचा मार्ग अवलंबवावा लागतो. आजकाल तर केवळ विवाहसाठी जर कोणी धर्मांतर करीत असेल तर त्यालाही परवानगी असणार नाही असा काहीतरी कायदा अस्तित्वात आल्याची माहीती आहे.( कायद्याच ज्ञान नसल्याने कृपया जाणकार अधिक माहीती देतील अशी अपेक्षा आहे). म्हणजे हिंदु पुरुषांना आजपर्यंत जो एक मार्ग होता धर्मांतर करुन असा विवाह कायदेशीर करण्याचा( ज्यात धर्मांतराची अत्यंत चुकीची सक्ती होती तरीही तो त्याग प्रेमासाठी सहन करुन कीमान असा विवाह करण्याची संधी होती) आता ती ही काढुन टाकण्यात आलेली आहे. मग बहुपत्नीकांक्षी हिंदु पुरुषाने आता करावे तरी काय? हा जाचक कायदा बदलायलाच हवा व इतर धर्मीयांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची परवानगी देउन सर्वाना समान हक्काची घटनेच्या तत्वाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहीजे. याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे मग संबधित दुसरया स्त्री ला व तिच्या संततीला ही मग व्यवस्थित कायद्याचे पुर्ण संरक्षण मिळते व समाजात मानाने वावरण्याची संधी मिळते. म्हणजे वरील बंधनामुळे चोरटे संबंध ठेवण्याकडे जो कल वाढतो व त्यामुळे कायदेशीर हक्कांसंबधित ज्या समस्या निर्माण होतात त्याही टाळता येउ शकतात.उदारणार्थ मग श्री. तिवारीं च्या पुत्राला जो संघर्ष करावा लागला तिवारींना स्वत: कायद्याच्या बंधनामुळे संबध लपविण्याची कसरत करावी लागली ते सर्व टाळता आले असते. (डावीकडे रजथी जी उजवीकडे दयालु जी मध्ये करुणानिधी ) 222 असे एका पुरुषाचे एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी होणारे अनेक विवाह अत्यंत यशस्वी झाल्याची अनेक सुंदर उदाहरणे उपलब्ध आहेत. तामिळनाडु चे डीएमके पक्षाचे राजकारणी श्री करुणानिधी यांनी दोन स्त्रीयांशी विवाह केलेला आहे. त्यांच्या एका पत्नीचे नाव आहे दयालु( कीती समर्पक !) व दुसरीचे नाव आहे रजथी या दोन्ही वेगवेगळ्या घरांत राहतात व करुणानिधी परस्पर सामंजस्याने दोघींशी अल्टरनेट वेळा पाळुन दाम्पत्यजीवनाचा गाडा गेली अनेक वर्षे यशस्वीपणे हाकत आहेत यांना दोन्ही स्त्रीयापासुन अनेक मुले झालेली आहेत व सर्व भावंडे गुण्यागोविंदाने एकमेकांशी प्रेमाने मिळुन मिसळुन राहतात अजुन काय हवे?. संबंधित लिंक्स http://www.outlookindia.com/article.aspx?240630 http://en.wikipedia.org/wiki/Karunanidhi_family 1 दुसरे एक सुंदर उदाहरण म्हणजे दक्षीणेतील महान कुचीपुडी नर्तक श्री. राजा रेड्डी यांनी तर दोन सख्ख्या बहीणी राधा आणि कौशल्या यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि तिनही जण मिळुन अत्यंत तालबद्ध, लयबद्ध असा दाम्पत्य जीवनाचा पदन्यास आजवर सांभाळत आहेत. यांच्या द्वीतीय विवाहाची गोष्ट अत्यंत रोमॅंटीक आहे. यांचा प्रथम विवाह राधे शी झाला कौशल्या राधे ची लहान बहीण त्यांच्या बरोबर च राहत होती तीही नृत्यांगना च आहे. तर एकदा सिंगापुरला राजा जींचा कार्यक्रम होता तेथे त्यांनी राजांना परफ़ॉर्म करतांना बघितले आणि बस कौशल्या त्यांच्या सौंदर्याने मोहीतच झाल्या आणि त्यांच्या प्रेमातच पडल्या, त्या नंतर बॅकस्टेज ला गेल्या आणि त्यांनी राजांना स्वताहुन विवाहाची मागणीच घातली. तेव्हा ती फ़ारच लहान होती दोघांत वयाचे मोठे अंतर होते. राजांनी सुरुवातील एक साधे आकर्षण असेल म्हणुन सोडुन दिले परंतु कौशल्या मात्र ठाम होती मग तीची ही आकांक्षा जेव्हा तिने राधे ला आपल्या मोठ्या बहीणीला सांगितली तेव्हा राधा ही तयार झाल्या मात्र एका सुंदर कलात्मक अटीवर ती म्हणजे मी राजांना तुझ्या बरोबर शेअर करायला तयार आहे मात्र स्टेजवर जेव्हा राजा परफ़ॉर्म करतील तेव्हा त्यांची संगिनी मी आणि केवळ मीच असेल. तु त्यांच्या बरोबर स्टेज वर कधीही एकत्र परफ़ॉर्म करायच नाहीस. आज राजां ही आपल्या सुंदर दाम्पत्य जीवनाचा गाडा अत्यंत यशस्वीपणे हाकत आहेत. आणि कौशल्यां नी ही आपले मोठ्या बहीणीला दिलेले वचन पुरेपुर पाळले. अजुन काय हवे ? संबधित लिंक्स http://blogs.hindustantimes.com/just-people/2009/04/14/about-raja-reddy… http://www.tribuneindia.com/1998/98dec27/sunday/view.htm आणि म्हणुन च माझे असे म्हणणे आहे की असा जाचक कायदा जो हिंदुं पुरुषांना द्विभार्या प्रतिबंध करतो तो रद्द केला पाहीजे व अशा निरागस प्रेमी जिवांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला पाहीजे यातच खरया अर्थाने घटनेची समानतेच्या मुल्यांची अंमलबजावणी होईल असे माझे एक हिंदु पुरुष म्हणुन मत आहे. आणि मी म्हणतो त्यात अतिशयोक्ती काहीच नाही आपल्याच महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपर्यंत विदर्भ प्रातांत (महाराष्ट्राच्या इतर प्रांतात बंदी आल्यानंतर ही काही वर्षे तरी) हिंदु पुरुषाला द्विभार्या विवाह करण्यास कायद्याच्या कुठल्या तरी स्पेशल कलमानुसार बंदी नव्हती. दैनिक दिव्य मराठी त काही दिवसांपुर्वी आलेल्या पंडीत भिमसेन जोशींच्या वारसांत होत असलेल्या संपत्ती वरील कलहा संदर्भात ही बातमी होती( वारसांचे सुर बिघडले असे काहीतरी शीर्षक होते) त्या बातमीत हा उल्लेख मी वाचला. त्यात पंडीत भिमसेन जींच्या प्रथम पत्नी सुनंदाजी हयात असतांना पंडीतजींनी द्वितीय विवाह वत्सलाबाईंशी करण्यासाठी तेव्हाच्या विदर्भ प्रांतातील या कायद्यातील तरतुदीचा वापर केला होता तो दुसरा विवाह विदर्भात कायद्याने मान्य होता म्हणुन म्हणुन हा विवाह पंडीतजींनी विदर्भ या प्रांतात जाउन केला आणि त्याला कायदेशीर मान्यता घेतली.या तततुदीमुळे पंडीतजींवर धर्मांतराची वेळ आली नाही. पंडीतजींनी ही कायद्याचा कुशलतेने उपयोग करुन घेतला व स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले ते गानपंडीतच नव्हे तर कायदे पंडीत ही होते असे या घटनेवरुन दिसुन येते. तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली आणखी काय हवे ? संबधित लिंक्स http://www.dnaindia.com/mumbai/report-living-in-the-shadow-of-bhimsen-j… http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-11-11/bangalore/439285… आणखी कीती उदाहरणे हवीत ? तर हा जुलुमी कायदा तत्काळ रद्द केला पाहीजे व हिंदु पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी दिली गेली पाहीजे या माझ्या मताची पुनुरावृत्ती मी करतो. याने दुसरा विवाह करण्यासाठी धर्मांतर करण्याचा मार्ग अवलंबवावा लागणार नाही( वरील उल्लेखाप्रमाणे तो ही मार्ग आता शिल्लक आहे की नाही शंकाच आहे परत एकदा जाणकारांच्या तोंडाकडे बघत आहे त्यांनी मार्गदर्शन करावे ) अथवा चोरटेपणाने असे संबंध ठेवण्याची पाळी ही येणार नाही. व संबधित स्त्री व संतति ला ही कायदेशीर मान्यता मिळुन समाजात सन्मानाने वावरता येईल. अर्थात वरील सर्व विवेचनात संबधित स्त्रीयां ची परवानगी संमती आहे असे गृहीत धरलेले आहे. यातील एकाही संबधित व्यक्त्तीची या विवाहाला मान्यता नसेल तर अर्थातच मग मात्र त्याला परवानगी नसावीच मी सर्वांची संमती ज्यात असते अशा आणि केवळ अशा विवाहांपुरतच या संबधातच ही मागणी करीत आहे. म्हणुन ही अत्यंत न्याय्य आणि मुलभुत हक्काची मागणी मी एक हिंदु पुरुष या नात्याने करीत आहे.

वाचने 28943
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

राजा रेड्डींचा त्यांच्या पत्नींसमवेतचा फोटो पाहील्यावर, राजांशी लग्न करण्यास दोघी भगिनी "एका पायावर" तयार झाल्या असाव्यात असे वाटले. :) बाकी द्विभार्याप्रतिबंधक कायदा येण्याआधीच्या पिढीतली अशी प्रसिद्ध मराठी उदाहरणे देखील आहेत. पण कुणाच्याही वैयक्तीक आयुष्यावर लिहीणे टाळू इच्छीतो. :) हा लेख / ही चर्चा जरी "समाज" विषयात असली तरी खर्‍या अर्थाने ती "विरंगुळा" मध्ये वर्गिकृत आहे असे समजत आहे. :)

प्रत्येक घरात "क" ची मालीका चालु होईल. मी कधि बघत नाहि पन अपङेट भेटत असतात की काही दीवसा अगोदरच त्यानी नविन लग्न केले आहे. घरीच मजा येईल. :)

हे बरय राव! मी आत्ताच हा धागा पाहून नवर्‍याला तसा आग्रह केला तर तो म्हणाला की तुझ्यासारख्या महामायेशी एकदा लग्न झाले आहे तेवढे पुरे! यापुढे या जल्मीच नव्हे तर पुढील जल्मीही तो लगीन करणार नाही.

तसंही येत्या काहि वर्षांत अनेक स्त्रि-पुरुषांचे अनेक स्त्रि-पुरुषांशी अनेक लग्नं/लग्नबाह्य संबंधं असं कमालिचं इंट्रेस्टींग कौटुंबीक/समाज स्ट्रक्चर तयार होणार आहे. फल ज्योतिषाने बीग बँग थेअरीचं हे भविष्य नाडिपट्टीवर कोरुन ठेवलय कधिचं.

सहमत

मग घर पण कमीतकमी १५-२० खोल्यांचा राजवाडा असणार नाही का?
नुकताच राजस्थान सहलीनिमित्त जोधपूर येथील अतिभव्य राजवाडा पाहण्याचा योग आला.जसवंतसिंग नावाचे राजे(http://en.wikipedia.org/wiki/Jaswant_Singh ) तेथे होवून गेले.१८७३ ते १८९५ ह्या काळात. गाईडच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर त्यांना २० अधिकृत बायका व ३० अनधिकृत बायका.जेथे बाळंतपण व्हायचे ती वेगळी मोठी खोली गाईडने दाखवली.बर्‍याचवेळा एक बाळंतपण आटोपले की लगेच दुसर्‍या आठवड्यात आणखी एक्.शेवटी राजकुमार्/राजकन्यांची कुंडली मांडण्यासाठी एक पूर्णवेळ पंडितच तेथे असायचा.पडदा पद्धत तेव्हा होती.त्यामुळे पंडितजी खोलीबाहेर बसत. जन्म झाला की सुईणबाई लिंबू फेकून मारत्.लिंबू अंगावर पडले की पंडित ताबडतोब ग्रह तारे पाहून कुंड्ली मांडत. काही वर्षांनी जसवंत महाराज 'सुधारले' व त्यांनी प्रजेकडे ल़क्ष द्यायला सुरुवात केली.काही चांगली कामे केली.हयातीत त्यांना जनतेने त्यांना देवत्वही बहाल केले.त्यांच्या पश्चात जसवंत थडा(जसवंतचे थडगे)बांधण्यात आला. राजस्थानचा ताजमहल ओळखला जातो. jasawant

कारण अपवादात्मक उदाहरणे सोडली तर बहुपत्नीत्व हे हिंदु परंपरेचे एक महत्वाचे लक्षण आहे.
म्हणजे, त्या काळी प्रत्येकाने मल्टिपल बायका करण्यासाठी दुप्पट मुली पैदा व्हायच्या असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

एक सहज विचारतेय, बाकीच्या देशांमध्ये बहुपत्नित्व नाही का? उदाहरणार्थ इथियोपियामध्ये किंवा मलेशियामध्ये किंवा पोर्तुगालमध्ये किंवा पेरुमध्ये कायकाय रीती आहेत? माझ्या मते हिंदूंचे काही वेगळं नाहीये. जगभरच सगळीकडे संधी मिळाली तर बर्‍याच (सगळ्या नाही!) पुरुषांना एकापेक्षा जास्त लग्न करायची इच्छा असेलच. अवांतरः कुठलीही शहाणी बाई मात्र दुसर्‍या लग्नाची इच्छा करणार नाही. एकाचवेळेस दोन दोन सासूसासरे कोण सांभाळणार??? ;)

In reply to by कवितानागेश

अहो... सासरा पण एक ८-१० बायका करेलच ना?आपल्या तरूण बायकोला घेवून सासरा कशाला येतोय सुनेकडे? आणि आपल्या अशा ८/१० बायका सांभाळणार्‍या बापाला मुले पण भरपूर असतील. आम्ही आपले चांगले गेला बाजार अजून एक तरी बायको येईल म्हणून स्वप्न रंगवत होतो, तर तुमचे आपले भलतेच.(खरे तर दुसरे लग्न करायला हरकत नाही, पण २/२ सासूंना सहन करायची आजकालच्या पुरुषांची हिंमत नाही.) वरील प्रतिसाद, १००% विनोदी असल्याने, आणि तो फक्त "लीमाउजेट ताईंना" असल्याने,माबोकर आणि तत्सम मं.नी उगाच आपापला आणि माझा वेळ वाया घालवू नये.

तर भारत रत्न पंडीत भिमसेन जोशींचे ही उदाहरण आपल्याकडे आहे. यांनी ही दोन स्त्रीयांशी विवाह करुन दाम्पत्यजीवनाचा गाडा यशस्वीपणे हाकुन दाखविला, दोघींची जबाबदारी समर्थपणे पेलुन दाखविली.
नुकतेच राघवेंद्र जोशी यांचे, पंडीतजींच्या थोरल्या मुलाचे (पहिल्या पत्नीपासून झालेल्या) "गाणार्‍याचे पोर" हे आत्मचरीत्र वाचलं. या पुस्तकानूसार परिस्थिती तुम्ही म्हणताय त्याच्या अगदी उलट होती.

पुरुषांचे बहुपत्नीत्वा संबंधी कल अन स्त्रीयांचे प्रणयाराधनातले नखरे हे दोन्ही उत्क्रांती तुन आलेले स्वभाव विशेष आहेत इतकेच मी म्हणेन. पण मेंदु च्या जबरदस्त क्रियाशील सहभागामुळे "सामाजिक प्राणी" ह्या पुढे जावुन मनुष्य जमात फ्लरिश झाली , संस्कृती उदयाला आली. म्हणुन निसर्ग विचारात घेतलेस बहुपत्नीत्व हे नैसर्गीस दृष्ट्या प्रबळ असणारी इच्छा आहे अन मानवीय प्रगती पाहील्यास ती इच्छा चुक आहे