Skip to main content

दिल्ली निवडणूक नंबर २

लेखक देशपांडे विनायक यांनी शनिवार, 14/12/2013 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्री केजरीवाल यांचे पत्र इथे ही निवडणूक व्हावी असे मला वाटते कारण लोकशाहीत स्पष्ट बहुमत असण्यास महत्व मिळेल श्री केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र किती परिणामकारक ठरते ते समजेल राजकारण सरळ बाळबोध असावे का याचे उत्तर मिळेल [ काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीनी ''सरकार बनानेके लिये समर्थन दिया था सरकार चलानेके लिये नही ''] असले पक्ष इतरत्र निघू शकतील असले पक्ष राज्यकारभार चालवू शकतील का याचे उत्तर मिळण्याची संधी मिळेल

वाचने 25875
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

In reply to by क्लिंटन

१०० % पटला प्रतिसाद... पुर्णपणे मजाक चाललाय.. केजरीवाल ह्यांना एवढ्या मतांची अपेक्षा नव्हतीच. त्यामूळे आधी हुरळुन जाऊन त्यांनी अशी नाटके सुरु केली.. आता त्यांच त्यांनाच कळत नाहीये की करायचं काय.. ह्या परिस्थिती मध्ये जर परत निवडणुका झाल्या तर लोक हे माकडचाळे पाहुन भाजपला मत देतील असे वाटते..

केजरीवाल काँग्रेसच्या सापळ्यात बरोबर अडकले आहेत. काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा देऊ केला तेव्हाच नाही म्हणायचे होते, म्हणजे भूमिकेत सातत्य राहिले असते. त्याऐवजी काँग्रेस/भाजपाने आमच्या जाहीरनाम्यातील १८ अटी मान्य करण्याची अट घातली. भाजपने या अटींकडे ढुंकुनही पाहिले नाही. आणि काँग्रेसने सर्व अटी बिनशर्त मान्य केल्याने आता केजरीवाल पेचात सापडले आहेत. आता सरकार स्थापन नाही केले तर दिलेल्या शब्दापासून मागे फिरण्याचे व दिल्लीवर फेरनिवडणुका लादण्याचे पाप माथी येणार. आणि सरकार स्थापन केले तर ज्या काँग्रेसविरूद्ध लढा दिला त्यांचीच मदत घेतल्याचे पाप लागणार. तसेच काँग्रेस आपल्या परंपरेप्रमाणे काही महिन्यांनंतर पाठिंबा काढून घेईल व परत निवडणुक होईलच. तेही पाप केजरीवालांच्या माथी येऊन त्यांची विश्वासार्हता धुळीला मिळणार. इतका दारूण पराभव होऊनसुद्धा काँग्रेसने जे राजकीय चातुर्य दाखविले आहे त्याचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. निवडणुकीच्या राजकारणात केजरीवाल जिंकले पण डावपेचांच्या राजकारणात केजरीवाल हरले. काँग्रेसने जबरद्स्त खेळी करून आप व भाजप या दोन विरोधकांपैकी एकाला संपविले. आता यापुढील निवडणुक भाजप वि. कॉंग्रेस अशीच होऊन त्यात काँग्रेसची स्थिती नक्कीच सुधारेल.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्यांशी सहमतच. काँग्रेसने अजून एक गोष्ट तातडीने मार्गी लावली आणि पाचर देखील मारली... - ती म्हणजे लोकपाल विधेयक. ते अण्णांना मान्य पण केजरीवाल यांना अमान्य.

आआप ने सरकार स्थापले तरी काही मला काही प्रश्न आहेतः -- त्यांच्या आमदारांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव 'शुन्यवत' आहे. त्यांचे वयही २५ ते ४०च्या दरम्यानचे आहे. त्यापैकी कायद्याची जाण किती जणांना कल्पना नाही. अशावेळी सत्ता हातात घेतली तर जे "मंत्री" होतील ते काय व कसे काम करतील? का बहुतांश खाती एकट्या केजरीवाल यांनाच सांभाळावी लागणार? -- दुसरे, कायदा व सुव्यवस्था केंद्रसरकारच्या हाती असताना, समजा जनतेने केजरीवाल सरकार विरूद्ध आंदोलन केले तर त्यांची भुमिका काय असेल? किंबहुना आम्ही जनतेचे 'सगळ्ळे सगळ्ळे' ऐकतो म्हणणारे पक्ष जनतेच्या वेगवेगळ्या गटांकडून परस्परविरोधी मागण्या आल्यास निर्णय कसा घेणार? -- वादग्रस्त प्रश्नावर जनमत घेऊन निर्णय घ्यायची भुमिका सरकारची असेल तर अल्पसंख्य गटांवर नेहमीच अन्याय होणार हे गृहित धरावे काय? उदा मशीदीवरील भोंगे काढायचे की नाही याचा निर्णय एसएमेस घेऊन करायचा म्हटला तर कसे चालेल?

In reply to by ऋषिकेश

१. आपले लाडके काँग्रेसी नेते मंत्री होतात तेव्हा हे प्रश्न नाही पडले ते? विलासराव देशमुखांना अवजड उद्योग चालवायचा काय अनुभव होता? शरद पवार संरक्षण खाते संभाळत होते. त्यांनी त्याचे प्रशिक्षण घेतले होते का? मंत्रीपदाचे वाटप हे त्या मंत्र्याच्या वजनावर अवलंबून असते वकूबावर नाही असा आजवरचा शिरस्ता आहे. तो जर डाचत नसेल तर हा नवा प्रयोगही इतका डाचू नये. २. इथे एक तिढा उद्भवला आहे ज्याने राज्यकारभार सुरु होणेच खोळंबले आहे. म्हणून सार्वमत घ्यायचा प्रयत्न चालू आहे. नेहमीच असा तिढा होईल हे कशावरून? ३. मशिदीवरील भोंगे काय फक्त अल्पसंख्यांच्या कानठळ्या बसवतात काय? बहुसंख्य लोकांची मते न विचारता मग काय मशिदीच्या इमामाचे वा मुल्ल्याचे मत तेवढे विचारात घ्यावे आणि बाकीच्यांना धुडकावून लावावे अशी आपली अपेक्षा आहे का?

In reply to by हुप्प्या

  1. येथे कुठल्याही पुढार्‍याची बाजू घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण विलासराव झाले, शरद पवार झाले, ते त्यांच्या पहील्याच टर्ममध्ये काही अगदी राज्यात पण प्रमुख मंत्री झाले नव्हते. तीच गोष्ट आय ए एस / आय एफ एस अधिकार्‍यांची असते. त्यांना सुरवात लहान पदांनी करावी लागते आणि नंतर मोठे होत जातात. पवारांनी हट्ट धरला असता तर सुप्रिया सुळे देखील सहज मंत्री बनू शकल्या असत्या. पण त्यांना (पवारांना) देखील माहीत आहे की आधी लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाचा अनुभव येउंदेत मग पुढे अधिकारप्राप्ती होईलच.
  2. एकदा निवडून आल्यावर मी सत्ता घेऊ का नको असे पब्लीकला विचारणे म्हणजे तद्दन खुळचटपणा आहे. त्यातून एकच दिसते की स्वतःबद्दल एक राजकीय नेतृत्व म्हणून केजरीवाल यांना अजिबात आत्मविश्वास नाही. विरोधी पक्षात बसून टिवटिव करायला त्यांना आवडली असती.
  3. सरकार हे कायदा-सुव्यवस्था आणि धोरणे तयार करण्यासाठी असते. फार तर फार सरकार टाऊनहॉल मिटींग अथवा पब्लीक हिअरींग घेऊ शकते. पण निर्णय शेवटी नेतृत्वालाच घेयचा असतो. ज्यांना मशिदीवर भोंगे नको आहेत त्यांनी कोर्टात जावे, लोकप्रतिनिधीला सांगावे पण ते निर्णय घेऊ शकणार नाहीत. असली निर्णयशक्ती अगदी पब्लीक म्हणून आपल्याला मिळाली तरी ते दुधारी शस्त्र ठरू शकते. सो, नॉट गूड! :)

In reply to by विकास

राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा किती अनुभवी होते? आणि दिल्ली हे राज्य आहे. तुलनेने छोटे राज्य आहे. कारकीर्दीची सुरवात कुणी अशा राज्याने केली कुणीतर वाईट काय? निव्वळ राजकारणातला अनुभव काय वाट्टेल ते खाते चालवायला उपयोगी पडते हे कसे काय बुवा? बारामतीत वा महाराष्ट्रात तोडाझोडी आणि संधीसाधू समीकरणे केली म्हणून सैन्याची धोरणे, सीमेवरील आणि पलीकडले प्रश्न कळू लागले हे कसे काय घडले? वस्तुस्थिती अशी आहे की निव्वळ मिसळपाववरील काही टाळक्यांना केजरीवाल आणि त्याचे साथीदार आवडत नाहीत म्हणून काही फरक पडत नाही. दिल्लीतील मतदारांनी लोकशाही पद्धतीने ह्या पक्षाला सरकारस्थापनेच्या इतके जवळ आणून पोचवले आहे. दिल्लीत तुमच्या मते उत्कृष्ट पात्रता असणार्‍या सरकारला लोकांनी हाकलले आहे. आणि काँग्रेसच आपला पाठिंबा देत आहे. आपच्या आमदारांना अनुभव नाही ते नालायक आहेत असे समजा मानले तरी दिल्लीच्या लोकांचे मत तसे नाही असे दिसते आहे. आणि त्यांच्या इच्छेला मान देणे आवश्यक आहे. आता ह्या परिस्थितीत सरकार बनवावे हा निर्णय कसा घ्यावा ते त्या पक्षावर अवलंबून आहे. महाराणींसारखे आतल्या आवाजावर विसंबायचे का एस एम एस वापरायचा हे त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे. निदान माझ्या माहितीप्रमाणे ह्याविरुद्ध कुठलाही कायदा नाही. आता ह्याला आचरट म्हणायचे का समावेशक ते मत बनवायला लोक स्वतंत्र आहेत. ३. मशीदीवर भोंगे असावेत का नाही ह्यावर सार्वमत का नाही घेता येणार? खरोखर घेतले तर लोकांना ते कर्णकटू कर्णे किती आवडतात ते पुढार्‍यांच्या लक्षात येईल. स्विट्झर्लंड मधे मशिदींवर मिनार असावेत का नाही ह्यावर सार्वमत घेत्ले होते. त्या मिनारांवर बंदी आली होती त्यामुळे त्या देशात फार मोठ्या वाईट उलथापालथी घडल्याचे ऐकिवात नाही. भारतातील कोर्टे काय गतीने काम करतात हे सामान्य माणसाला ठाऊक आहे. आणि कित्येक उच्च न्यायालये सामान्यांच्या खिशालाही परवडणारी नाहीत. तेव्हा त्याचे फार कौतुक नसावे.

In reply to by हुप्प्या

महाराणींसारखे आतल्या आवाजावर विसंबायचे का एस एम एस वापरायचा हे त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे. आसं इचारायचं नस्तं. काळजाला भोकं पडत्यात बाबा ! महाराणींसारखे आतल्या आवाजावर विसंबायचे का एस एम एस वापरायचा हे त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे. हे तर लईचं झालं. आरं कोन हाय तिकडं? ते शिबिआय काय झोपा काडतय काय? ऑ ? हायकामांडवर टीका म्हंजे काय? अवो लै अण्भव लागतोया त्याला... मंत्री का असाच बन्तो व्हय? मोठ्ठे घोटाले करायला कसं कार्यक्रता केडरमदून यायला लागतं. ते काय कालच्या पोरांची काम हाय्त का? चला लै झालं. नायतर त्ये बाजूच्या गल्लीतलं आमच्याच पार्टीचं बेनं आमच्या अदुगर ते म्होट्ट घर झाडायला जायचं आनि आपला नंबर खाली जाय्चा. चला बिगी बिगी.

In reply to by हुप्प्या

दिल्लीतील मतदारांनी लोकशाही पद्धतीने ह्या पक्षाला सरकारस्थापनेच्या इतके जवळ आणून पोचवले आहे.
मुद्दा हाच तर आहे. मतदारांनी पक्षाला सत्तेच्या इतके जवळ आणले आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थनावर केजरीवाल सहज मुख्यमंत्री होऊ शकतील अशी परिस्थिती असतानाही ते कच खात आहेत त्याचे काय? काँग्रेसने समर्थन द्यायचे मान्य केल्यावर आआपकडे कोणते पर्याय होते? एक तर काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे आम्ही काही वाटेल ते झाले तरी त्यांचे समर्थन घेणार नाही आणि आम्ही फेरनिवडणुकीसाठी तयार आहोत हा एक पर्याय.नाहीतर ते पाठिंबा द्यायला तयार आहेत ना मग तो घ्यायला आमची ना नाही असे म्हणत नक्की कोणत्या मुद्द्यांवर दोन पक्षांमध्ये सहमती होत आहे हे बघून तो सरकारचा कार्यक्रम ठरवून सरकार स्थापन करणे. याव्यतिरिक्त तिसरा पर्याय मला तरी दिसत नाही. तरीही केजरीवाल या दोन पैकी कशालाच हो म्हणायला तयार नाहीत.वर लोकांकडून एस.एम.एस वगैरे मागायचा आचरटपणा कशाला? वास्तविकपणे आआपच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हा एक कसोटीचा कालखंड आहे. यावेळी चुकीचा निर्णय घेतला तर त्या पक्षाच्या भवितव्यावर त्याचे वाईट परिणाम होतील.इतका महत्वाचा निर्णय कोणी घ्यायचा? नेत्यानेच ना? आणि आपल्याला योग्य वाटतो तो जो काही निर्णय घेतला जाईल तो काही वाटेल ते झाले तरी पूर्णपणे तडीस न्यायचा.पण केजरीवाल या क्षणी भयंकर गोंधळलेले दिसत आहेत आणि नक्की काय करायचे हे त्यांनाही कळत नाही. अशा मोक्याच्या वेळी निर्णय घ्यायला कचरणे हे नक्की कोणत्या प्रकारच्या नेतृत्वाचे लक्षण आहे? बाकी लोकांकडून त्यांचे मत मागणे असे म्हणत या आचरटपणाचे समर्थन करणे म्हणजे उगीचच रॅशनलायझेशन झाले.एक तर लोकांनी निवडणुकांमध्ये त्यांचे मत दिले आहे. परत परत किती वेळा लोकांची मते मागणार आहात? दुसरे म्हणजे कालच मटामध्ये आले होते की काँग्रेस आणि भाजप समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर केजरीवालांना 'हो' म्हणून एस.एम.एस केले आहेत.याचे कारण साधे सरळ आहे. काँग्रेसला आता फेरनिवडणुकांची भयंकर धास्ती आहे आणि काँग्रेस-आआप सरकार आले तर जी काँग्रेसविरोधी मते अन्यथा आआपला गेली असती ती लोकसभेच्या वेळी भाजपला आपल्याकडे खेचता येतील. त्यामुळे असे सरकार स्थापन होणे हे या दोन्ही पक्षांना हवेच आहे. आता अशा एस.एम.एस वर विसंबून राहून केजरीवाल निर्णय घेणार का? बरं एकाच माणसाने पन्नास एस.एम.एस पाठविले तर बाकीच ४९ काढणार कसे, दिल्लीतील मतदारांनीच एस.एम.एस पाठविले आहेत याची खातरजमा कशी करणार वगैरे गोष्टींना फाट्यावरच मारायचे. एक तर स्वतःला निर्णय घेता येत नसल्यामुळे आता जे काही पाऊल उचलले जाईल ते नंतर उलटले तर कोणावर तरी दोष ढकलता आला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच चालला आहे हे इतरांना समजत नाही असे वाटले आहे का? यांना स्वतःच्याच पक्षाच्या (आणि स्वतःच्या) राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेता येत नसतील तर इतरांसाठी ते महत्वाचे निर्णय घ्यायची त्यांची पात्रता आहे असे आम्ही का म्हणून समजायचे? आज सरकार स्थापन करू की नाही हे लोकांना विचारत आहेत.उद्या इतरही निर्णय घेतानाही असे एस.एम.एस मागणार नाहीत याची खात्री काय? दिल्लीचा अर्थसंकल्प कसा असावा हे मला कळत नाही चला लोकांनाच एस.एम.एस पाठवायला सांगू असे होणार नाही याची ख्रात्री काय? आणि सगळे निर्णय असे लोकांवरच सोडले जाणार असतील तर मुळात हे हवेतच कशाला? एकूणच काय तर बाकी कोणापेक्षाही मोबाईल फोन कंपन्यांना केजरीवालच मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असणार हे नक्की :)

In reply to by क्लिंटन

क्लिंटन, विकासप्रभृति भाजपासमर्थक लोक ज्या तर्‍हेने डिवचून एकामागोमाग प्रतिक्रिया देत सुटले आहेत ते बघता मला त्रिशूल सिनेमामधला अमिताभ बच्चन आणि संजीवकुमारचा एक सीन आठवला ज्यात संजीवकुमार बच्चनला आपला बिसनेस बुडवल्याबद्दल लाखोल्या घालत असतात तेव्हा बच्चन चा हा डायलॉगः "लगता है मैंने आपकी किसी दुखती रग पर पांव रख दिया है". अगदी अशाच प्रकारे आआप ने विशेषतः भाजपची कुठली तरी दुखरी नस चुकून छेडलेली दिसते. बाकी- केजरीवालांच्या एसेमेस द्वारे (वा इतर कुठल्याही प्रकारे) लोकांचा कौल मागणे यात एवढे थयथयाट करण्यासारखे काय आहे ते मला अजूनही कळले नाही. अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नमेंट मध्ये येतात जिथे कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावर पब्लिक कन्स्लटेशन घेतले जाते. "एकचालकानुवर्तित्व" या तत्त्वावर चालणार्‍या संघटनेचे अपत्य असलेल्या पक्षाच्या समर्थकांना या पद्धती कदाचित कळणार नाहीत पण ह्या प्रॅक्टिसेस लोकशाहीला प्रगल्भ करणार्‍या आहेत आणि विकसित पाश्चात्त्य देशांत ह्या पद्धतीने राज्यकारभार केला जातो. ते भारतात आणून रुजवू पाहाणार्‍यांना केवळ ते आपल्याला आवडत नाहीत असल्या पोकळ मुद्द्यावरुन विरोध करणे हे क्षुद्र व असमंजसपणाचे आहे.

In reply to by बाळकराम

बाकी- केजरीवालांच्या एसेमेस द्वारे (वा इतर कुठल्याही प्रकारे) लोकांचा कौल मागणे यात एवढे थयथयाट करण्यासारखे काय आहे ते मला अजूनही कळले नाही.
लोकपाल, जातीय हिंसाचार विरोधी कायदा इत्यादी कायद्यांसाठी केंद्र सरकारनेही लोकांचे मत मागितले होते आणि तसे वेळोवेळी केलेही जाते.केजरीवालांचे पध्दत आणि ही पध्दत यातील मूलभूत फरक लक्षात यायला वेळ लागू नये.पहिले म्हणजे त्या पध्दतीत लोकांचे इनपुट्स हे qualitative असतात म्हणजे कायद्यात नक्की कोणत्या स्वरूपाच्या कलमांचा अंतर्भाव करावा याविषयी लोकांचे मत मागवले जाते. प्रत्यक्षात कायद्यात नक्की कशाचा अंतर्भाव करावा हे सरकारच ठरविणार म्हणजे एखाद्याने खोडसाळपणे उगीच काही वेडीवाकड्या सूचना केल्या तर त्याचाही अंतर्भाव करण्यास सरकार बांधिल नसते. मुख्य म्हणजे सरकार कायदे करणे आणि governance या आपल्या जबाबदारीपासून दूर जात नाही तर ते अधिक परिणामकारक कसे करता येईल याबद्दल लोकांच्या सूचना मागविते. दुसरे म्हणजे असे inputs हे पूर्णपणे qualitative असल्यामुळे अशा सूचना लोकांकडून मागवायला आणि त्याचा योग्य अभ्यास करायला (असे होणे अपेक्षित आहे) पुरेसा कालावधी--महिना दीडमहिना वगैरे दिला जातो. पार्टिसिपेटिव्ह डेमॉक्रसी अशा स्वरूपाची असल्यास काहीच म्हणणे नाही. केजरीवालांची पध्दत अशी आहे का?एक तर ते लोकांचे मत मागवत आहेत ते आमच्या सरकारचा जन्म व्हावा की नाही याविषयी आहे.नक्की कोणत्या सरकारचा जन्म व्हावा यासाठी अवघ्या १५ दिवसांपूर्वी झालेली निवडणुक हे त्या मानाने बरेच निष्पक्ष माध्यम उपलब्ध असताना त्यावरच आणखी लोकांचा कौल मागून काय साध्य होणार आहे? लोकांचा कौल पुरेसा स्पष्ट नसेल तर आहे त्या आकड्यांमध्ये इतर पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करावे (केंद्रात १९९६ मध्ये तसे झाले होते) नाहीतर परत लोकांपुढे कौल मागायला जावे (बिहारमध्ये २००५ मध्ये, केरळमध्ये १९६७-६९ मध्ये आणि इंग्लंडमध्ये १९७४ मध्ये तसे झाले होते). या गोष्टीवर निर्णय निश्चितपणे निवडून गेलेल्या राजकीय नेत्यांनीच घ्यायचा परत तो लोकांवर सोडणे म्हणजे स्वत:च्या जबाबदारीपासून पळण्यासारखे झाले.बरं यात केवळ दिल्लीतलेच मतदार भाग घेतील, एकच माणूस अनेक मते देणार नाही याची खात्री काय (निवडणुक प्रक्रीयेत या दोन्ही गोष्टींची खबरदारी घेतली जाते)?काल वर्तमानपत्रात आले होते की एकूण ९ लाख एस.एम.एस आणि फेसबुक पोस्ट आले आहेत.या ९ लाखांपैकी दिल्लीतले मतदार आणि एकदाच मत दिलेली genuine मते नक्कीच कमी असणार. याउलट १५ दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण ७८ लाख ७४ हजार ११५ मतदारांनी भाग घेतला होता.म्हणजे ही केजरीवालांची पध्दत जनमताचे प्रतिनिधित्व करते असे का म्हणायचे?

In reply to by क्लिंटन

पब्लिक कन्स्ल्टेशन हे क्वालिटेटिव्ह्च असते असं तुमचं म्ह्णणे दिसतंय. इतर कुठल्याही स्टेकहोल्डर कन्स्ल्टेशन प्रमाणे- ही qualitative, quantitative, focus groups, public meeting, interviews, paired interviews, service user groups, public ballots etc. याच प्रकारे होतात. केजरीवालांनी यातीलच एका प्रकाराचा अवलंब केला आहे. ज्या प्रकारचा प्रश्न इथे त्यांना विचारायचाय ते बघता इथे क्वालिटेटिव्ह कन्स्ल्टेशन घेणे योग्य होणार नाही, तिथे क्वांटिटेटिव्ह्च पाहिजे. उदा. ब्रिटन २०१५ मध्ये स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबद्दल जे कन्स्ल्टेशन घेणार आहे ते फक्त १ प्रश्न असलेले व हो की नाही अशी उत्तरे असलेले असणार आहे. लोकांनी त्यांना २८ जागा दिल्यात ३६ ऐवजी म्हणजेच सरकार स्थापन करा असा स्पष्ट जनादेश त्यांना जनतेने दिलेला नाही. म्हणूनच जनतेला नक्की काय पाहिजे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न अशा कौलाद्वारे केला तर काय बिघडलं. अपुर्‍या जागा (२८ वि.३६) असताना सरकार स्थापणे म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट्च्या भाषेत " स्कोप क्रीप" आहे आणि तोच केजरीवाल टाळायला बघताहेत असं मला वाटतं. एकूण ९ लाख एस.एम.एस आणि फेसबुक पोस्ट आले आहेत.या ९ लाखांपैकी दिल्लीतले मतदार आणि एकदाच मत दिलेली genuine मते नक्कीच कमी असणार. याउलट १५ दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये एकूण ७८ लाख ७४ हजार ११५ मतदारांनी भाग घेतला होता.म्हणजे ही केजरीवालांची पध्दत जनमताचे प्रतिनिधित्व करते असे का म्हणायचे? साधी रँडम सँपलिंग ची पद्धत आहे ही मालक! आणि ९ लाख सॅम्पल साईझ ७८ लाख पॉप्युलेशन साठी नक्कीच सांख्यिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

In reply to by बाळकराम

साधी रँडम सँपलिंग ची पद्धत आहे ही मालक! आणि ९ लाख सॅम्पल साईझ ७८ लाख पॉप्युलेशन साठी नक्कीच सांख्यिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
थोडे गणित करू या: दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे: भाजप: ३३.१%+ अकाली दल: ०.९%=३४% आआप: २९.५% कॉंग्रेस: २४.५% बसप: ५.३% जदयु: ०.९% वरीलपैकी कोणीही नाही: ०.९% अपक्ष आणि इतर: ४.९% तेव्हा जर का या ’सार्वमतात’ मिळालेले एस.एम.एस आणि फेसबुक पोस्ट हे random sample असेल तर ९ लाख हा मोठा आकडा लक्षात घेता त्यात सर्वसाधारणपणे याच प्रमाणात विविध पक्षांच्या समर्थकांनी मते दिली असणार असे मानायला हरकत नाही. (जर का सगळी मते दिल्लीतूनच आली आणि कोणीही एकापेक्षा जास्त मते दिली नाहीत असे गृहित धरले तर--मुळात या गृहितकातच मोठा गोंधळ आहे तरी सोयीसाठी सध्या ते गृहितक खरे मानू) वर म्हटल्याप्रमाणे कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही आआपचे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर यायला हवे आहे.कॉंग्रेसला फेरनिवडणुकांची भयंकर धास्ती आहे त्यामुळे आणि भाजपला असे सरकार आले तर जी कॉंग्रेसविरोधी मते आआपकडे गेली असती त्यापैकी बरीच मते लोकसभेला आपल्याकडे वळविता येतील या कारणामुळे. तेव्हा कॉंग्रेस आणि भाजप समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर "हो" एस.एम.एस चा मारा चालवला आहे असेही मटामध्ये कालपरवा वाचले. तेव्हा अशी मते आणि आआपमधील विरोधी मते वगळून इतर मते लक्षात घेतली तर या एस.एम.एस पोलमध्ये (किंवा अगदी वॉर्डातल्या सभांमध्येही) "हो" ला बहुमत का मिळत आहे हे लक्षात यावे. परवाच कोणाच्या तरी फेसबुकवर काहीसा गंमतीशीर पोस्ट बघितला.त्यात म्हटले होते की केजरीवालांनी योगेन्द्र यादव, सिसोदिया इत्यादी कोअर टिममधील २५ लोकांना मत विचारले असते तर त्याविषयी कोणीच तक्रार केली नसती मग जर ते काही लाख लोकांना विचारत आहेत त्याविषयी तक्रार का? well..आपल्या भरवशातले नक्की कोण आणि कोण आपल्या पक्षाचे हित लक्षात घेऊनच सल्ला देईल अशांचेच मत नेत्याने लक्षात घेतले पाहिजे.या लाखो लोकांपैकी किमान अर्धे लोक तर आआपचे हित लक्षात घेऊन मत देतील ही मुळातच पहिली अट पूर्ण करत नाहीत.दुसरे म्हणजे एक तर सर्वानुमते/बहुमताने निर्णय घ्यायचा आणि तो करता येत नसेल तर नेत्याने इतरांचा सल्ला घ्यायचा आणि शेवटचा निर्णय स्वत: घ्यायचा.सध्या जो प्रकार चालला आहे त्यात केजरीवाल केवळ सल्लाच घेत आहेत आणि शेवटचा निर्णय स्वत:च घेणार आहेत (पक्षाच्या हितासाठी तो कदाचित यापेक्षा वेगळा असू शकेल) असे चित्र आता तरी नक्कीच नाही.म्हणजे आपले हितचिंतकच आहेत याची खात्री नसलेल्यांचा सल्ला तर नाही तर मत घ्यायचे आणि त्यावर आपला निर्णय अवलंबून ठेवायचा असा अजब कारभार चालू आहे सध्या.आणि तरीही केजरीवालांकडे निर्णयक्षमता नाही असे इतरांनी म्हणायचे नाही?कमाल आहे. (शेवटी शतक झळकावायचा मान माझाच :) )

In reply to by क्लिंटन

म्हणजे आपले हितचिंतकच आहेत याची खात्री नसलेल्यांचा सल्ला तर नाही तर मत घ्यायचे आणि त्यावर आपला निर्णय अवलंबून ठेवायचा यालाच तर खरी लोकशाही म्हणतात, मालक! आपल्या हितचिंतकाच्या (पक्षी: बगलबच्च्यांच्या, खुशमस्कर्‍यांच्या) सोईने निर्णय घेणे हे हुकूमशाहीत/ एकाधिकारशाहीत बसते. कॉर्पोरेट जगतातला हा क्रोनिइझम झाला. सर्वसमावेशक लोकशाहीत (पार्टिसिपेटिव्ह डेमॉक्रसीमध्ये) विरोधी मत सुद्धा निर्णयप्रक्रियेत सहभागी असतं. (अवांतरः इंग्लंडमधल्या आरोग्यसेवेत एक वरिष्ठ अधिकारी म्हणून अशाप्रकारे जनमताचे समायोजन मी वारंवार करतो. आमच्या निर्णयप्रक्रियेत कर्मचारी, अधिकारी, पुरवठादार ( काही अटींवर) तसेच रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे मत विचारात घेतले जाते. काही मह्त्त्वाच्या पेशंट-फेसिंग पदांवर नेमणूक करताना मुलाखतीच्या पॅनेलवर तर चक्क पेशंट्स असतात! कुठलेही मोठे निर्णय घेताना त्यात एक महत्त्वाचा स्टेकहोल्डर म्हणून पेशंट्स चे काय म्हणणे आहे हे आवर्जून विचारात घेतले जाते, किंबहुना ती एक अत्यंत महत्त्वाची गव्हर्नन्स प्रोसेस आहे, ती पाळली नाही तर बोर्ड आमचे निर्णय नाकारु शकते वा जरी त्याला बोर्डाची मंजुरी मिळाली तरी पुढेमागे ते बेकायदेशीर ठरवले जाऊ शकतात.)

In reply to by बाळकराम

यालाच तर खरी लोकशाही म्हणतात, मालक!
आपले हितचिंतक आहेत याची खात्री नसलेल्या आणि जे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांचीही असे काँग्रेसच्या समर्थनावर सरकार स्थापन केल्यास पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने नक्की कोणता परिणाम होईल याविषयीचा साधकबाधक विचार करायची पात्रता असेलच याचीही खात्री नसलेल्यांकडून नुसता सल्लाच नाही तर मत मागून त्यावर आपला निर्णय घेणे याला साध्या शब्दात मी तरी बिनडोकपणाच म्हणतो.आता या प्रकाराचे खरी लोकशाही म्हणून समर्थन करायचा तुम्हाला हक्क आहेच.तेव्हा let's agree to disagree. तरीही हितचिंतक म्हणजे खुषमस्करेच असतात हा शोध नक्की कुठून लावलात? आपले खरोखरचे हितचिंतक कोण आणि खुषमस्करे कोण यातला फरक न समजता येऊन चुकीच्या लोकांचे सल्ले ऐकल्यामुळे नुकसान झालेले कित्येक नेते इतिहासात/ कॉर्पोरेट जगतात आणि सर्वत्र दिसतील. दुसरे म्हणजे महत्वाचे निर्णय घेतानाच नेत्याची खरी कसोटी लागते.हा क्षण आआपच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा आहे याविषयी शंका नसावी आणि यावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास कदाचित आआपच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह त्यामुळे उभे राहू शकते. अशा मोक्याच्या वेळी केजरीवाल मात्र कुठलाच निर्णय घ्यायला अक्षम वाटत होते.जो माणूस स्वतःच्या आणि स्वतःच्या राजकीय भवितव्याविषयी इतका महत्वाचा निर्णय घेताना कचरत असेल त्या माणसाची एक मुख्यमंत्री म्हणून इतरांसाठी महत्वाचे निर्णय घ्यायची क्षमता आहे यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही. अशा वेळी नेत्यानेच खमकेपणा दाखवून आपल्याला योग्य वाटतो तो निर्णय (इतरांशी सल्लामसलत करून) घ्यावा आणि तो शेवटपर्यंत तडीस न्यावा. याविषयी ह्युलेट-पॅकार्ड च्या सी.ई.ओ कार्ली फिओरिना यांनी कंपनीच्या संस्थापकांचे पुत्र वॉल्टर ह्युलेट आणि डेव्हिड पॅकर्ड आणि महत्वाचे शेअरहोल्डर यांच्या विरोधाला न जुमानता कॉम्पॅक कंपनी टेक-ओव्हर करायचा त्यांच्या मते योग्य असलेला निर्णय कसा धडाडीने पुढे नेला ही एक उत्तम केस स्टडी आहे.असा खमकेपणा कधी दाखविता येईल?जेव्हा स्वत:चे काहीतरी मत असेल तेव्हा आणि निर्णय चुकल्यास तो आपल्या पूर्ण कारकिर्दीचे वाटोळे करू शकेल इतके stakes मोठे असतानाही आपल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्विकारली तरच. इथे तर स्वतःचा काही निर्णय असायचीच बोंबाबोंब मग पुढचे सगळे येणार कुठून? आणि उद्या निर्णय फसला तरी 'बघा लोकांनी मला सांगितले होते' असे म्हणून दोष ढकलायला कोणीतरी आहेच. एक तर स्वतः कोणताच निर्णय घ्यायला टाळाटाळ करायची आणि अगदी वेळच आली की दोष ढकलायला कोणीतरी हेरून ठेवायचे अशी कार्यपध्दती असलेला मनुष्य चांगला नेता होऊ शकेल यावर माझा तरी विश्वास नाही. असो.माझे सगळे मुद्दे मी या चर्चेत मांडले आहेत आणि माझ्याकडे अजून नवीन भर घालण्यासारखे काही नाही.तेव्हा माझ्याकडून या चर्चेला मी पूर्णविराम देत आहे. धन्यवाद.

In reply to by बाळकराम

आता (पेचात पडल्यावर) आम्ही सरकार स्थापन करावे की नाही, असल्या बाबींवर आपल्या येथील कुठच्या पक्षाने पब्लिक कन्सल्टेशन केले आहे? गेल्या सार्वत्रिअक निवडणूकांनंतर टोरीज व लिब डेम एकत्र आले तेव्हा त्याअगोदर त्यांनी असे पब्लिक कन्सल्टेशन केले होते काय? सत्तेवर असलेली सरकारे समाजाच्या/ देशाच्या संदर्भातील काही विशेष निर्णय घ्यावयाचे असतील, ज्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतील, अशा बाबींसाठी पब्लिक कन्सल्टेशन करतात. उदा. सध्या नॉर्थ सीमध्ये शेल एक्स्प्लोरेशन करावाचे की नाही अशा विषयावर असे कन्सल्टेशन होऊ शकते.

In reply to by प्रदीप

माझ्या माहितीप्रमाणे १५ ऑगस्ट १९४७ या दिवसापासून आजतागायत भारत देशात एकही खरे सार्वमत झालेले नाही.अगदी राज्यघटना बनविताना देखील नाही. फक्त गोवा मुक्त झाल्यावर महाराष्ट्रात सामील व्हायचे ( भाषा निकष घेऊन) की केंद्रशासित की स्वतंत्र राज्य यावर गोव्यात सार्वमत झाल्याचे आठवते. वि.सू. - ही माझी माहिती चुकीची असल्यास माहितगारानी संदर्भ देऊन ती दुरूस्त करावी ही नम्र विनंति. पण लोकांचे मत घेऊन कायदे बनविले जात नाहीत. हे भारतातील वास्तव आहे. उदा. सांगायचे झाले तर हेलमेट सक्तीचे घ्या. यात खरेच सार्वमत झाले तर हेलमेट " सक्ती" ला विरोधी मतदान ५१ टक्के पेक्षा जास्त होईल. ( हेलमेटचे महत्व माहीत असूनही)

In reply to by विकास

विकास साहेब- तुमची वरची तिन्ही विधाने तर्कदुष्ट आहेत. १. तुम्ही शरद पवार आणि विलासरावांचे उदाहरण दिलेत- त्यांचे कर्तृत्त्व आपल्या सगळ्यांसमोर आहे. इतकावर्षांचा राजकारणातला दीर्घ अनुभव असूनही पवारांनी कृषी, संरक्षण इ केंद्रीय खात्यांचा जो विचका केला ते बघता राजकारणाचा अनुभव ही चांगल्या कारभाराची गॅरंटी नव्हे. विलासराव आता आपल्यात नाहीत म्हणून जास्त बोलत नाही पण "आदर्श" प्रकरणाचे उदा बोधप्रद ठरावे. पवारांचे राजकारण काय प्रकारचे आहे हे शेंबड्या पोरालादेखील माहिती आहे. अशाप्रकारचे माफिया राजकारण करणार्‍यांना कितीही अनुभव असला तरीही सक्षम, प्रामाणिक राज्यकारभार करण्यासाठी त्याचा काहीही उपयोग नाही. दिल्लीपुरतं बोलायचं तर शीला दीक्षित १५ वर्षे मुख्यमंत्री होत्या, तुमच्याच तर्कानुसार तर मग काँग्रेसचा वा खुद्द शीला दीक्षितांचा पराभव व्हायचे काहीच कारण नव्हते! २. निवडून आल्यानंतर जनतेचा कौल घेणे जर चूक असेल तर मग गोष्टच संपली. कारण याच न्यायाने उदा सरकार बनवल्यानंतर, अगदी ५७३/५७३ लोकसभा सीटस मिळवल्यानंतर, मग विधानसभा, लोकसभा इ सांसदीय संस्थांची जरूरीच नाही. कारण मग उद्या तुमच्या सारखे लोक सरकारला विचारतील-" अबे लेका, निवडून दिला न तुम्हाला आता? आता कसले हे लोकसभेत/विधानसभेत ठरावबिराव मांडून लोकसभेची/विधानसभेची मंजुरीफिंजुरी घेत बसतोस? एवढा पण आत्मविश्वास नाही होय?". जनतेने निवडून दिले म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे वाट्टेल तसा कारभार हाकण्याचा खुल्ला परवाना नसतो दिलेला. ते अधिकार घटना व कायद्याच्या चौकटीत राहून आणि लोकभावनेचा आदर करुनच घ्यायचे असतात. उलट केजरीवालांनी हा चांगला पायंडा पाडायचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे स्वागतच केले पाहिजे. ३. सरकार हे कायदा-व्यवस्था आणि धोरणे बनवण्यासाठी असते- पण ते लोकांना बांधील असते. सरकार हे एक्स्युक्युटिव्ह फंक्शन आहे, ती ऑपरेटिंग बॉडी आहे. ज्या गोष्टींच मॅन्डेट त्यांना नाही त्याबद्दल निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य सरकारला नाही. ह्या गोष्टी सुशासन (गव्हर्नन्स) च्या आहेत. कॉर्पोरेट जगतातसुद्धा याच तर्‍हेने गव्हर्नन्स ची प्रक्रिया असते. फक्त सरकारच्या ऐवजी सीईओ वा तत्सम अधिकारी कल्पावा. सीईओ जसा बोर्डाला (जे शेअरहोल्डर्सचे प्रतिनिधित्व करते) जबाबदार असतो आणि मोठे फैसल्यांना (टेक-ओव्हर, मर्जर इ.) बोर्डाची मंजुरी घेतो, स्वतःला अधिकार असले तरीही, त्याचप्रमाणे सरकारने लोकमताचा अजमास वेळोवेळी पब्लिक कन्स्ल्टेशन इ द्वारे घेणे ही बेस्ट प्रॅक्टिस आहे, आणि याचा अवलंब केजरीवाल करत असतील तर त्याचे कौतुकच व्हावे. शेवटी, केजरीवाल म्हणजे तो भुक्कड राज ठाकरे नव्हे की ज्याला खायचं कुठून आणि xxxxचं कुठून ते ही कळत नाही म्हणायला!! केजरीवालांच प्रोफाईल बघता हे असले प्रश्न पडू नयेत खरं तर.

In reply to by बाळकराम

सर्वप्रथम माझे इतरत्र (मिपावरीलच) प्रतिसाद पाहीले तर केजरीवाल आणि आप जर यशस्वी झाले तर चांगलेच आहे, असे माझे स्पष्ट मत मी मांडले आहे. पण ते जे काही आत्ता करत आहेत ते त्यांचे नेतृत्वगूण दाखवत नसल्याने, किंबहूना उलटच दाखवत असल्याने, त्याला आचरटपणा म्हणावे लागले... १. शरद पवार आणि विलासराव, अथवा एकूणच आत्ताचे मोदीं-शिवराज चौहानसारखे विरळ सत्ताधारी राजकारणी सोडल्यास, कुणालाच दुर्दैवाने स्वच्छ राजकारणी म्हणू शकत नाही. पण तो मुद्दा वेगळा आहे. हुप्या यांनी प्रश्न विचारले होते, "विलासराव देशमुखांना अवजड उद्योग चालवायचा काय अनुभव होता? शरद पवार संरक्षण खाते संभाळत होते." त्या संदर्भात माझे उत्तर होते. त्यातच मी सनदी अधिकार्‍यांचा देखील म्हणूनच उल्लेख केला होता. शेवटी राज्यशासन ही सिस्टीम आहे. त्या सिस्टीमची माहिती करून घेणे हे महत्वाचे असते. मगच अगदी त्यात अमुलाग्र बदल करायचे असले तर शक्य होईल... केजरीवाल यांना अशा अनुभवाची काही गरज वाटत नाही आहे, हे दुर्दैव आहे. २. "निवडून आल्यानंतर जनतेचा कौल घेणे जर चूक असेल तर मग गोष्टच संपली." जनतेला काय वाटते (अर्थात ओपिनिअन पोल) याचा कौल घेणे वेगळे आणि आम्ही काय करू असा प्रश्न आम्ही जनतेला विचारणे आणि त्यावर आधारीत आम्ही निर्णय घेऊ असे म्हणणे वेगळे. इतिहासातील आणि वर्तमानातील कुठलाच राजकीय, सामाजीक अथवा उद्योगधंद्यातील नेता असे वागणार नाही. नेतृत्वाबरोबर जसे काही अंशी अमर्याद वाटणारे अधिकार आणि त्या अनुषंगाने फायदे मिळू शकतात पण ते जर उपभोगायचे असले आणि जर काही चांगले काम करायचे असले, ठसा उमटवायचा असला तर लोकांच्या टिकेला सामोरे जाऊन प्रसंगी स्वतःस योग्य वाटणारा निर्णय पुढे रेटायची ताकद आणि समजशक्ती असावी लागते. केजरीवाल यांनी ओपनींगलाच ती वापरण्यापासून स्वतःस लांब ठेवले आहे. आता उद्या काँग्रेसबरोबर जाताना, "लोकांना वाटले म्हणून" असे म्हणायला मोकळे! ३. "सरकार हे कायदा-व्यवस्था आणि धोरणे बनवण्यासाठी असते- पण ते लोकांना बांधील असते." अर्धसत्य आहे हे. लोकशाहीत बांधीलकी ही सर्वांची असते. तुम्ही कॉर्पोरेट जगाचे उदाहरण दिले आहे म्हणूनः तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर्स नसले तर अंबानी काय करणार आहे हे तो तुम्हाला विचारेल का? पब्लीक कन्सल्टेशन वेगळे आणि पब्लीक अ‍ॅप्रूव्हल वेगळे, ते देखील अशा गोष्टीसाठी ज्याची पूर्ण जबाबदारी, एक नेता म्हणून केजरीवाल यांनी घेणे महत्वाचे आहे. ही लढाई नेतॄत्व दाखवण्यासाठी चालली आहे आणि ते चांगलेच आहे. आता तुम्हाला लोकशाहीत नेतॄत्व एका व्यक्तीचे असावे हेच मान्य नसले तर वेगळा मुद्दा आहे... म्हणून मी परत सांगतो, माझ्य लेखी, एक नेता म्हणून त्यांनी (केजरीवाल यांनी) स्वतः घेतलेला निर्णय भले बरोबर-चूक कसाही वाटोत, त्यांना तो राजकारणात पुढे नेईल. पण असले प्रकार करू लागले तर पुढच्या वेळेस दिल्लीत असूनही दिल्ली लांबच राहील... असो.

In reply to by बाळकराम

ह्या गोष्टी सुशासन (गव्हर्नन्स) च्या आहेत. कॉर्पोरेट जगतातसुद्धा याच तर्‍हेने गव्हर्नन्स ची प्रक्रिया असते. फक्त सरकारच्या ऐवजी सीईओ वा तत्सम अधिकारी कल्पावा. सीईओ जसा बोर्डाला (जे शेअरहोल्डर्सचे प्रतिनिधित्व करते) जबाबदार असतो आणि मोठे फैसल्यांना (टेक-ओव्हर, मर्जर इ.) बोर्डाची मंजुरी घेतो, स्वतःला अधिकार असले तरीही, त्याचप्रमाणे सरकारने लोकमताचा अजमास वेळोवेळी पब्लिक कन्स्ल्टेशन इ द्वारे घेणे ही बेस्ट प्रॅक्टिस आहे
सीईओ बोर्ड ओफ डायरेक्टर्सचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतो, सगळ्या शेअरहोल्डर्सचे नव्हे! इथे सर्व शेयरहोल्डर्स (दिल्लीचे मतदार) इतकेच काय, आजूबाजूच्या इतर कंपन्यांचे शेयरहोल्डर्स (दिल्लीबाहेरील मतदार, व इतरही) ह्यांची मते मागवण्यात आली होती.

In reply to by हुप्प्या

एसएमएस आणि इमेल वगैरेने जनतेची मते मागण्याचा खुळचटपणा चालू आहे ते ठीक आहे. पण केजरीवालांनी सर्व नवनिर्वाचीत (आप) आमदारांची मते घेतली का आणि त्यांना विचारले का की नक्की त्यांना काय वाटते ते? लोकशाहीत लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रतिनिधी म्हणून विचरायचे असते. का आता आप मध्ये पण हाय कमांड चालू झाले?

In reply to by विकास

आपल्याकडे अशी काही माहिती आहे का की त्यांनी आपल्या सहकार्‍यांना विचारात न घेताच हा तथाकथित आचरटपणा चालवला आहे? का उगाच खातरजमा न करता, संशयाचा फायदा न देता आपण हे विधान करत आहात?

In reply to by हुप्प्या

का उगाच खातरजमा न करता, संशयाचा फायदा न देता आपण हे विधान करत आहात? जेंव्हा प्रश्नचिन्ह असते तेंव्हा ते विधान नसते तर माहिती करून घेण्यासाठी विचारलेला प्रश्न असतो. :) मी कुठेही असे म्हणलेले नाही (आनी कधीच म्हणत नाही) जेणे करून चुकीच्या माहितीने (अथवा माहितीच्या अभावानेच) गैरसमज पसरतील.

In reply to by हुप्प्या

काय हुप्प्याराव. उत्तरे असे शीर्षक देऊन प्रतिप्रश्नच विचारले आहेत. मुळ प्रश्नांची उत्तरे कुठायत? समोरच्याला प्रतिप्रश्न विचारून गप्प तर सगळेच पक्ष करू बघतात. आआप हा "वेगळा" असेल तर त्यांनी असले चाळे थांबवून प्रश्नांना "उत्तरे" द्यायला नकोत? अर्थात वेगळे असले तर!!!

In reply to by ऋषिकेश

लाडक्या काँग्रेसला गाडून आप पुढे आल्यावर आपल्याला त्यांच्या आमदारांचा अननुभवी पणाचा साक्षात्कार झाला आणि असे लोक आता सरकार कसे चालवणार वगैरे प्रश्न पडू लागले. अहो, आपल्याला भारतीय कायद्यात खोट आहे असे म्हणायचे आहे का? कारण ह्या (आपल्या लेखी) नालायक आणि अननुभवी लोकांना मंत्री बनण्यापासून कुठलाही कायदा रोखू शकत नाही. त्यांनी सरकार निर्मितीकरता ज्या काही अटी आहेत त्या पुर्या केलेल्या आहेत. आता त्यांनी सरकार बनवायचे का नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आता निव्वळ मतप्रदर्शन इतकेच आपण करु शकता. आपल्या पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे आपल्याला आपचे तथाकथित नालायकत्व फार जाचते आहे. पण पूर्वी ह्याहून नालायक लोक मंत्रीपदे भूषवत होते तेव्हा ते काँग्रेसच्या पवित्र पक्षात असल्यामुळे आपण ते पावन करून घेतलेत हे मला अधोरेखित करायचे होते.

ज्यावेळी जॉर्ज फर्नांडीस केंद्रीय मंत्री झाले त्यावेळे ते म्हणाले होते" मंत्री होणे फार सोपे.. सगळे काम तर सचिवच करतो." अहो राबडीदेवीनी नाही का चालविला का बिहार ? एकाच कायद्याची जाण आमदाराना असणे गरजेचे असते तो म्हणजे " हाय कमांडचा" कायदा !

In reply to by चौकटराजा

तुम्ही सांगितलेले वाक्य जॉर्ज फर्नांडीस कधी म्हणले माहीत नाही. पण एनडीएच्या राज्यात ते संरक्षण मंत्री असतानाची गोष्ट आहे: त्यांनी सियाचेनला भेट दिली तेंव्हा तिथल्या सैनिकी अधिकार्‍यांकडून कळले की तेथे हवे असलेले स्पेशल स्नो मोबाईल्स दिल्लीतले बाबू अडवून ठेवत आहेत. जॉर्ज त्यावर काही म्हणाले नाहीत/नसावेत. फक्त दिल्लीला आल्यावर त्यांनी त्या दोन सचिवांना ८ दिवस सियाचेनला जाऊन रहायला सांगितले. पुढच्या दोनच दिवसात स्नो मोबाईलचे काम पूर्ण झाले. अहो राबडीदेवीनी नाही का चालविला का बिहार ? तेंव्हा बिहार चालत होता असे तुम्हाला खरेच वाटते?

जॉर्ज फर्नांडीस फार मोठे कामगार पुढारी होते सोलापुरातील गिरणी कामगारांचा [ PF ई ]प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला . सरकारवर टीका केली पण प्रश्न कित्येक वर्षे सुटला नाही १९७७ नंतर फर्नांडीस केंद्र सरकारात मंत्री झाले . सोलापुरातील गिरणी कामगाराचा प्रश्न त्यांच्या अखत्यारीत होता तरी प्रश्न सुटला नाही . नुसती टीका करून किंव्हा नुसत्या अधिकाराने प्रश्न तापदायक होऊ शकतात सुटण्यासाठी काहीतरी वेगळे लागते हेच खरे !!

विनाशर्त समर्थन म्हणजे ' कोरा चेक ' अगदी पूर्णपणे कोरा! रक्कम ही नाही, तारीख नाही अन सही पण नाही.

बाकी किती टक्के गरीब जनतेला असे एसएमएस परवडतात आणि किती टक्के गरीब जनता फेसबुकवर असते - हेही कोणी तज्ज्ञ सांगतील काय? दिल्लीतली गरीबांची संख्या लक्षणीय आहे हे पाहिले आहे - म्हणून केजरीवाल यांचे मार्ग सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक मत कितपत समोर आणतील याविषयी शंका आहे. एकंदर काहीतरी टोक गाठायचं - हे किंवा ते - ही राजकीय पक्षांची परंपरा 'आप' पुढे चालवणार असं दिसतंय. दुर्दैव आहे.

In reply to by आतिवास

गरीबांचा कळवळा असणं चांगली गोष्ट आहे, पण भारतात मोबाईल फोन्स आता बहुधा गरीबातल्या गरिबाकडे आता मोबाईल असावेत- निदान दिल्ली सारख्या महानगरातल्या तरी. भारतात आजमितीला सुमारे ८७ कोटी वा ८९% लोकांकडे मोबाईल्स आहेत. दिल्लीचं दरडोई उत्पन्न बघता, एका एसेमेसचा खर्च बहुसंख्य गरीबांना परवडावा असं वाटतं.

नावडतीचे मीठ अळणी अशी एक म्हण आहे इथे ती लागू असावी. आपल्यासारखे काँग्रेसी आणि अन्य भाजप समर्थक हे दोघेही केजरीवालचा इतका तिरस्कार करत आहेत हे विशेष आहे. केजरीवाल आता एस एम एस वगैरे प्रकारे मत मागवत आहेत ते ह्या अशा अस्थिर परिस्थितीत सरकार चालवावे का नाही. ज्या पक्षावर जहरी टीका करून तुम्ही आम्हाला सत्तेवर आणू पाहिलेत त्यांचेच समर्थन घेणे तुम्हाला पटते का असे विचारणे म्हणजे आचरटपणा का? मतदारांनी मत देताना आप काँग्रेसचा आधार घेऊन सत्तेवर बसेल असे गृहित धरले होते का? मला वाटत नाही. त्यामुळे ह्या टप्प्यावरुन पुढे जाताना लोकांना विचारले तर इतके काही खटकायला नको. हा एक नवा प्रयोग आहे. केजरीवाल थोरल्या आऊसाहेबांप्रमाणे हुकुमशाही न करता सार्वमत घेऊ पहात आहेत हे काँग्रेसी लोकांना नवे असणारच. भाजपालाही असेल. कारण भाजपात फक्त उच्चपदस्थ असे निर्ण य घेतात. त्यामुळेच अनेकदा अशी आवळ्याभोपळ्याची मोट बांधलेली समीकरणे लोकांच्या माथी मारली जातात. मला वाटते अशा प्रकारची अधांतरी परिस्थिती उद्भवायला भारताची कायदेव्यवस्थाच कारणीभूत आहे. पण त्यावर उपाय म्हणून अशा प्रकारे एक प्रयोग करत असेल तर त्याची निष्पत्ती व्ह्यायच्या आतच नाके मुरडायला सुरवात करणे हे आंधळ्या द्वेषाचे निदर्शक आहे.

In reply to by हुप्प्या

तेंच म्हन्नं आसं की, पाटदिशी "मिलबाटके खायेंगे" या तत्वावर पाठिंबा घेउन सरकार स्थापन करत नाय म्हंजे या आपवाल्यांना राज्कारनाचा कायबी आण्भव नाय बगा ! ;)

आपल्या अनेक टीव्ही च्यानेल्सवर एसेमेस मागवून स्पर्धांचे विजेते घोषित करतात. अशा सारेगम वगैरे काही स्पर्धांमधे काही लोकांना खास सिमकार्डे देऊन एसेमेस करायला "बसवले" होते आणि विजेते "निवडून" आणले होते अशी एका इनसायडरकडून इश्टोरी ऐकली आहे. इथे तेच होणार नाही/झाले नाही याची काय ग्यारण्टी आहे? :-/

इथे आणि अन्य ठिकाणीही अज्ञानापोटी वा जाणूनबुजून असा अपप्रचार होतो आहे की एखाद्या मनोरंजन वाहिनीप्रमाणे केजरीवाल निव्वळ एस एम एस वर भिस्त ठेवून आहेत. तसे आजिबात नाही. निवडून आलेले आमदार आपापल्या विभागात जाऊन तिथे छोट्या छोट्या सभा घेऊन लोकांचे मत जाणून घेत आहेत. तेव्हा मोबाईल बाळगत नसणार्‍या मतदारांनाही आपले मत मांडायची संधी आहे. आता हे एखाद्या साग्रसंगीत निवडणुकी इतके सर्वव्यापी असणार नाहीच. आप कडे इतकी यंत्रणा वा पैसा कसा असेल? पण तरीही केजरीवालांची भूमिका ही त्यांच्या आत्तापर्यंत दिसलेल्या विचारसारणीशी सुसंगत आहे. आणि लोकांना आपले मत मांडण्याचा हक्क देण्याचा प्रयोग कौतुकास्पद आहे. तसे पाहिले तर अधिकृत निवडणुकीत गैरप्रकार होतातच ना? पैसे देऊन मत मागणे, खोटे मतदान करणे, पुन्हा पुन्हा एकाच मतदाराने अनेक मते देणे, मोजण्यातल्या चुका वगैरे वगैरे. तसे इथेही संभवते पण म्हणून ह्या कल्पनेचीच आचरटपणा अशी संभावना करणे म्हणजे आपल्या मनातील किल्मिषाची कबुली देणे आहे.

पारंपरिक राजकारणापेक्षा काही वेगळे होते आहे, ते थोडे विचित्र वाटत आहे लोकांना. कदाचित आपण इतके महत्वाचे आहोत हेच लोक विसरून गेले की काय? प्रयोग सफल होईल की नाही तो विषय वेगळा, पण त्यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही.

In reply to by जयनीत

१००० टक्के सहमत. भारतीय मतदाराना सुद्धा आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची सवय नाही म्हणून आपण अमेरिकेसारखी अध्य्क्षीय लोकशाही चा विचार देखील त्याज्य मानतो.राज्यघटना ३/४ मताने देखील काही बाबतीत अपरिवरर्तनीय आहे असे समजतो. राजकारणाची एक ठराविक पद्धत आहे असे मानतो. म्हणून केजरीवाल ना आपण समजून घेऊ शकत नाही. मोठ्या दोन पक्षांच्या धोकेबाजीचा इतिहास आपल्यालाही माहीत आहे तो केजरीवालाना माहीत नसेल काय ?

In reply to by चौकटराजा

भारतीय मतदाराना सुद्धा आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची सवय नाही म्हणून आपण अमेरिकेसारखी अध्य्क्षीय लोकशाही चा विचार देखील त्याज्य मानतो.
भाजपाने आणि त्यातही मला वाटते अडवाणींनी असे सुचवले होते तेंव्हा तमाम स्युडोसेक्यूलर्स आणि माध्यमे भारतीय घटना खतरेमे म्हणून ओरडायला लागली होती...

In reply to by विकास

त्याच्याही आधी, इंदिरा गांधींच्या काळात वसंत साठे (किंवा अंतुले) यांनी असे सुचवले होते. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षियांनीदेखिल नेमके हेच केले होते. ;)

In reply to by सुनील

मल वाटते वसंत साठे... विरोधी पक्ष म्हणजे मला वाटते जनसंघ/भाजपा व्यतिरीक्त असावेत. यात त्यांची (भाजपाची) बाजू घेण्याचा उद्देश नाही. पण हा काही अंशी तात्विक मतभेद होता/आहे. किमान त्या काळात तात्विक. सध्या कुणासाठीही तात्विक लिहीताना/टंकताना हात थरथरतात. :(

निवडून आलो तर "जनलोकपाल" विधेयक २९ डिसेंबरच्या आत पास करून २९ डिसेंबरला कार्यन्वित करू असे आप ने वचन दिले होते. आता मंत्रीमंडळ २८ डिसेंबरला शपथ घेत असल्याने सरकारस्थापनेस वेळ लागला आहे, त्यामुळे ते व्यावहारीक नाही हे सर्व समजू शकतात. त्यात काही विशेष नवल नाही. आता केजरीवाल म्हणाले की १५ दिवसात ते काम पूर्ण करू. पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की कुठलेही दिल्ली विधानसभेतले विधेयक संमत करण्यासाठी आधी केंद्राकडून संमती लागणार! "“As per the Constitution, the Delhi State Assembly has the right to pass all laws, except those in the State List that may come in conflict with Central laws." म.टा. मधे दिलेल्या माहितीनुसार, "'दिल्लीत लोकपाल लागू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज आहे. दिल्ली केंद्रशासित असल्याने या कायद्याचा मसुदा आधी केंद्रीय कॅबिनेटकडे पाठवावा लागेल. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हा मसुदा राज्यपालांमार्फत गृहखाते, कायदा खाते व अन्य संबंधित खात्यांकडे जाईल. त्यात आवश्यक सुधारणांनंतर पुन्हा तो नायब राज्यपालांकडे येईल. त्यांच्या मंजुरीनंतरच तो दिल्ली विधानसभेसमोर येईल." आता केजरीवाल एकीकडे काँग्रेसला आणि इतर सर्वच प्रस्थापित पक्षांना नावे ठेवत हा कायदा त्यांच्यामुळे होत नाही म्हणायला मोकळे... पण आश्वासन देताना नक्की कुठल्या ज्ञानाच्या/माहितीच्या आधारावर दिली हे मात्र त्यांना कोणी विचारायचे नाही... तेच वीज दर सवलतीच्या संदर्भात होणार - कारण वीजदर कमी करायचे हक्क हे राज्यसरकारला नसून स्वायत्त वीज मंडळांना आहेत. फार तर ते ५०% रक्कम दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पात त्यासाठी ठेवून नागरीकांना एक अर्थाने सबसिडी देऊ शकतात. पण त्यात ज्या वीज कंपन्यांना त्यांनी नावे ठेवली, त्यांनाच करदात्याचे पैसे त्यांना या मार्गाने द्यावे लागणार... असो. बघू काय काय घडते ते...