Skip to main content

जात कुठून आली ह्या गोष्टीत

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 14/12/2013 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ मध्ये देवयानी खोब्रगाडे यांच्याबद्दल बातमी वाचली. थोडेसे खटाकले. नाचक्की झाली वैइगेरे लिहून आले होते. पण काही गोष्टी जाणीव पूर्वक किंवा अजाणतेपणी वगळल्या होत्या. प्रतिक्रिया बघताना लक्षात आले की त्या येथे येऊन केवळ २० दिवस झले आहेत. एवढ्यात वीसा गैर व्यवहार आणी मानवी तस्करी करणे शक्या तरी आहे का? तासेही मानवी तस्करी हा शब्द भलताच जोरदार आहे. तस्करी म्हणजे, माझ्या मते, बिना वीसा चे लोका देशात घुसवणे. पण सदराहू कामवली (जिला त्या कमी पगार देत होत्या हा त्यांच्यावर आरोप आहे. माहिती नाही की २० दिवसात हा आरोप कसा लागू शकतो. पगार पण ३० दिवसानंतर मिळतो. आणी १५ दिवसांनी दिला तर चुक भूल पण असु शकते) वीसा घेऊन राज रोस पाने आलेली आहे. बर ते जौ देत. प्रतिक्रिया तर भरीच आहेत. लोकांनी लगेच नावावर घसरून जातीचा गलिच्छ उहापोहा सुरू केला. खरच गरजेचे आहे का ते? मग एका ने दुसर्याला बददणे अँड दुसर्याने पहिल्याला झोदपणे सुरू झले. ती व्यक्ती ह्या देशात नवीन आहे. तिला मदत करण्या ऐवजी, दुगण्या कसल्या झाडायच्या? हिंमत असेल तर माझ्या बरोबर म्हणा "मी जात पात मानीत नाही. जात हवीच असेल तर माझी जात इंजिनियर ही आहे (किंवा तत्सम)" नोट. सांगणे न लगे, पण तुम्हाला जर का वाटत असेल की मी आरक्षणाचा फायदा घेऊन आलो आहे, तर तसे नाही आहे. मी कोठलेच आरक्षण कधीच वापरलेले नाही आहे. आणी माझे पदवुयत्तर शिक्षण आई. आई. टी. मधून झालेले आहे. विवा.

वाचने 18962
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

हे सर्व प्रकरण हेर-प्रतिहेरगिरीचे आहे. आपण उगीचच एकमेकांना मारीत सुटलो आहोत. देवयानीबाई ह्या एक तीव्रबुद्धीच्या हुशार आणि तडफदार व्यक्ती आहेत. त्यांनी एम.बी.बी.एस. करून नंतर परराष्ट्रसेवेची परी़क्षा दिली त्यात त्या अखिल भारतात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांनी शिक्षणात आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही. त्यांनी या आधी संवेदनाशील पोस्ट्सवर काम केलेले आहे. संगीता रिचर्ड्स ही आधीपासूनच भारतीय दूतावासात अन्य अधिकार्‍याकडे कामाला होती असे अन्य एका दुव्यावरून कळते. तिची लबाडी उघडकीला आल्यापासून ती अमेरिकेत फरार होती. तिला आपल्या हवाली करण्याविषयी भारताने लिखित निवेदने अमेरिकेकडे दिली. पण त्याची दखल न घेता उलट अमेरिकेने तडकाफडकी तिच्या कुटुंबाला अमेरिकेत उचलून नेले किंवा नेवविले.(हे फक्त गुप्तहेरांच्या बाबतीतच होऊ शकते असेही त्या लेखातत आहे.) कदाचित देवयानीबाईच्या कारकीर्दीत तिची लबाडी उघडकीला आली असेल म्हणून देवयानीबाईची बढती झाली असेल. या केसमध्ये अनेक तर्क लढवता येऊ शकतील. काही गुपिते कधीच उघड होत नसतात, होऊही नयेत.

या प्रकरणात जात न आणण्याबाबत लेखकाशी सहमत. पण, आरक्षणाची सोय असूनही आरक्षण न घेणं म्हणजे ओपनमधल्या एका हुशार विद्यार्थ्याची जागा लाटण्यासारखं आहे असं माझं मत आहे. तुमची योग्यता तेवढी असेल तर कुणीही ती नाकारु शकत नाही. ती सिद्ध करायची जागा ओपन सीट्स ही नव्हे. ओपनमधील ज्या व्यक्तीची जागा जाते तिच्या अर्धीही योग्यता नसणार्‍या व्यक्तीला विनाकारण आरक्षणामधून जागा मिळते.

In reply to by पिशी अबोली

ती सिद्ध करायची जागा ओपन सीट्स ही नव्हे. ते ज्याने त्याने ठरवावे. रिजर्वेशनवाला ओपनची जागा हक्काने घेऊ शकतो.

सर्वांनी आपापल्या अंगभूत गुणवत्तेवर पुढे यावे, स्पर्धात्मक जागा जिंकाव्या, आरक्षणे हळूहळू कमी व्हावी असे वाटते. नाही तर आरक्षितांची गुणवत्ता कितीही वाढली तरी त्यांना आरक्षित तेवढ्याच जागा मिळणार, अधिक नाही, त्यांनी त्यांच्या कोट्यातच समाधान मानावे असा विचार येईल जो अतिशय घातक आहे. यातूनच मग लोकांख्येनुसार संधींची मागणीही पुढे येऊ शकते.