Skip to main content

हिंदु धर्म आणि शाप

लेखक उद्दाम यांनी मंगळवार, 22/10/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु धर्म आणि शाप हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. स्मित शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित. प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही? कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात? अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल. १. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल. २. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप. ३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .) ४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.) ५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.) ७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.) ८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय) ९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. ) १०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.) ११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.) १२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल. १३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?) १४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?) १५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो. १६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे. १७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या लफडे प्रकरण ) अँड सो ऑन ............ शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया.

वाचने 33481
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

वेदवतीने असे का केले/ अथवा केले नाही याची मला काही कल्पना नाही. आणि तिला त्याबद्दल विचारून शंका निरसन करता येणे शक्य नाही आता.

In reply to by मनीषा

तत्कालीन पुष्पक विमानात ऐर होस्टेस असतील का ? असतील तर त्या मानविणी,यक्षिणी का राक्षशिणी असतील ? फ्लाईट डोमेस्टिक असेल कि विंटरन्याश्णल ?

In reply to by मालोजीराव

त्ये ईमान बायांना होस्टेज बनवाय काढल्यालं, तिथ ऐरहोस्टेस कशाला झक माराय जातीला.. यडा कि खुळा रं तु.?

In reply to by मालोजीराव

म्या आटोबोट न्हाय गालबोट हाय...आस ब्हार्या म्हणत हुता कालपास्नं ...कुट पांगलं काय म्हैत..ब्हार्या आर्र गड्या कुट हाय तू.. जम्नीत ग्येला का ,येताळाना धर्ला तुला..

In reply to by म्हैस

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण) वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- .... ( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)

In reply to by उद्दाम

तुम्ही लोकांना का पेपर घालता आहात? तुमचा काय आभ्यास आहे ते पण सांगा ना. ( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.) असेल असेल .. शेवटी काय? पुराणातली वांगी सगळी ....

In reply to by म्हैस

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . कैतरीच बै! नवरा कायम घरातच सापावर झोपलेला असताना पुन्हा त्याचीच तपस्या करायला बायकोने भूलोकात का यावे?

In reply to by उद्दाम

या देवांना कंटाळा कसा येत नाही, अनादी अनंत काळ एकाच सापावर बसुण राहणे(त्यो साप अमर आहे कि त्याचाही नंतर' अन्थोनी' होतो?) वीणा खाजवत एकच वाक्य बडबडत बसणे, मेनका आणि उर्वशी अनादी काळ नाचत्यात.. त्येच बघत बसणे..अरे काय चेंज हाय की नाय...

In reply to by ग्रेटथिन्कर

हा प्रश्र्न मला पण पडला होता... पण मिपावर आलो आणि उत्तर मिळाले... एकाच मुद्द्यावर टंकत राहणे,(तो मुद्दा पण नंतर अमर होतो की त्याचा पण नंतर "गाढव" होतो?) काय असे तो पाव्/अर्धा मेंदू खाजवत एकच धोशा लावत बसणे.वगैरे वगैरे.... बाकी अजून तुम्ही पथ्य सुरु केलेले दिसत नाही.... असो.... बाकी चालू द्या...

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या बिहारी स्वभावावर औषध म्हणून नथुगुग्गुळवटी आणि विदारीष्ट काढा पाठवत आहे... आनंद मानुन घ्या तो... आपला बिहारी मित्र प्वॉट साफ नसल्याने खंग्रीगिरी करतोय हे आस्मादींकाना(म्हंण्जी मी स्वोत्ता) बघवत नाय.. ढसा ढसा ढसा ढसा..

In reply to by ग्रेटथिन्कर

असे काय करता... परवा तर आपण स्वतःच कबूल केलेत की आपण नक्की कोण आहात? आणि हे परत परत सिद्ध कशाला करत आहात? कारण पोटाचा आणि खंग्री पणाचा पण काही संबंध नसतो हो.. कारण,,, मागे एका लेखात पण आपण नगू ची चर्चा केली होती.तुम्ही नुसतेच नगू घेता पण पथ्य पाळत नाही असे दिसत आहे. असो.... बाय द वे ,,,, तुम्ही पो.पा. मॅडमचे माजी विद्यार्थी दिसता....

बलगनदहर्व / बयातमयान / इते तुमी तनकन्याच परयतन करतय पन नककी कय हओअतय कई कल नहई. पन असए तनकनयात बहरईच वएल जतओ. अआणई नककई कय तनकलेय ते क्ल्त नहई. मातर वचनआअरालआ मतर बहरपऊअर कशट पदतआत. लईच मजजा यएतए. अएअक शनका : बलगनधर्व्.तऊमई तऊमचई सवकशरई कओणाकडऊन तनकौन गहेतली?

In reply to by विजुभाऊ

विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच इद्म्बन करत येना) हि भस बघुन मरथिचच जुन रुप असव अस वततयल्ल लगल्लय. परकऋत भशेचे अत लुपतपर्रय झहलेले रुप. मोदि लिपिच कस होत नै क लिहिनरल क तर्रस नै पन वचनराआलाअ लय तरस. तसच झलय. त्यच लिप्पिच जलिय अवताआआआर्र वत्तु रहयलय.

In reply to by बॅटमॅन

खालील पैकेजेस बाजारात लवकरच येत आहेत. मोकलाया लीपी वर्जन १.० मोकलाया लीपी वर्जन २.० विथ सर्वीस पैक

In reply to by बॅटमॅन

"परकऋत भशेचे" "मोदी लिपी"
ठ्यॉ.....=)) ;) परकर या वसतराचा य इथ कय समबनध? "मोदी लिपी" मोदीनी तवडहच करयचए बकई हओअतं?

In reply to by विजुभाऊ

तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर क वसतर...घलयच कि केस कपयच? अन मोदिनि पन्तप्रधन व्हयच त इतक केलच पहिजे. बकि मोदि लिपि हि अलिकदच्य गुज्जु लिपिशि थोदि सिमिलर पन अहे.

हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस स्च्रिप्त वोर्क्स इन थिस रेप्ल्य? विथ थिस स्च्रिप्त ओने चन व्रिते लोत्स ओफ बूक्स इन मरथि

In reply to by विजुभाऊ

अन्द मन्य विल बे फूलेद इन्तो बेलिएविन्ग थिस इस सोमे सोर्त ओफ चोदे =)) थिस इस थे पेर्फेच्त स्च्रिप्त फोर व्रितिन्ग नोत ओन्ल्य मरथि बुत अल्सो एन्ग्लिश इन थिस फोरुम.

भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय ह्यांनी सनत कुमारांचा (हे ४ सनत कुमार त्यावेळी प्रजापती दक्षाच्या शापामुळे लहान मुल झाले होते ) अपमान केला . त्यांना वाटले हि लहान मुले भगवान विष्णूंना भेटायला जातात म्हणजे काय? त्यांनी त्यांची टिंगल केलि. वारंवार सांगून हि त्यांनी ऐकले नाही तेव्हा सनत कुमारांनी त्यांना शाप दिला कि श्री हरींचे द्वारपाल आहात म्हणून एवढा माज आलाय का तुम्हाला ? आता तुम्ही तुमचं हे द्वारपाल म्हणून करत असलेलं कार्य आणि भगवान विष्णू दोघांनाही विसरून जाल आणि राक्षस होवून राहाल हा गोंधळ ऐकून श्रीहरी बाहेर आले आणि त्यांनी स्वतः सनत कुमारांची क्षमा मागितली तेव्हा जय विजय घाबरले आणि क्षमा मागू लागले तेव्हा त्यांची दया येवून त्यांना उशाप दिला कि ३ जन्म तरी तुम्हाला भूलोकावर रहावच लागेल . तेव्हा जय विजय नि श्रीहरींना विनंती केली कि ३ हि जन्मात त्यांना श्रीहरीन च्या हातून मृत्यू यावा . त्या नंतर जय हिरण्याक्ष झाला . विजय हिरण्य कश्यपु. पुढच्या जन्मामध्ये दोघे रावण आणि कुंभकर्ण झाले . त्याच्या पुढच्या जन्मात शिशुपाल आणि दुसर्याचा नाव आठवत नाहीये पण शेवटची २ अक्षरे 'दुर्ग ' अशी आहेत

In reply to by म्हैस

इतक्या लवकर अशा कथा देवू नका. अति सत्य (संक्षिप्त रूप अ.सत्य) कथा लवकर पचत नाहीत काही लोकांना... त्यांचे अजून नथूगुग्गुळ औषध सुरु आहे...... अजून ते शाप आणि बायका ह्यांतच अडकलेले आहेत.तिथून सुटका झालीच (म्ह्नजे स्वतःहून केलीच तर) की मग ते वर आणि नर ह्यांच्या कडे वळतील.

In reply to by म्हैस

कलयुग सुरु झाले की काय? मी हंबरण्याचा आवाज "हम्म हम्मा" असा ऐकला होता....आज काल "कुई SS कुई SS कुई SS" असा झाला की काय? का म्हशी रोडावल्या आणि कोल्ह्याच्या आकारच्या झाल्या?

९ वा शाप शापच चुकलं कि वो !

शापाच्या चर्चेत उ:शापाची चर्चा असावी का? उ:शाप मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे? तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे... अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला, तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे... कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या, धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे... आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने, हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का टाप आहे... खुंटल्या यत्नास जेंव्हा मार्ग दावाया कुणाच्या युक्तिचा आधार लाभे, आदराची छाप आहे... साथ देण्या भावनांना, जाणुनी त्या पातळीने, जीव लावी हेच मोठे सख्यभावा माप आहे... या मनाला गुंतवाया मोहुनी सर्वस्वभाना, भामिनीच्या डोळियांचा कामदेवी चाप आहे... एक धागा हा सुखाचा लाभतो प्रेमात मोठा, जीवनी संगीत वाटे, घेतसे आलाप आहे... सर्व संबंधांस साधा, भावनेला साथ देती, नाचतो त्यांच्याप्रमाणे, लागते रे धाप आहे... ना कधी होते मनाचे मानल्या इच्छेप्रमाणे, वेळ येता दे दगा ते आपुले, हा ताप आहे... ज्या भरोशाने जगाला लाविलेले ऊरपोटी, तो तुटे, हा भावनेला वेदनेचा राप आहे... शास्त्र सांगे सोडुनी द्या, मोहमायेचा पसारा, वागणे ना त्याप्रमाणे, कोण जाणे पाप आहे... काव्य देई या मनाच्या भावनांना वाट सोपी, लेखणी हाती धरावी, एवढा उ:शाप आहे...

In reply to by चौकटराजा

धाग्यात दमच तेव्हढा आहे... मुदाम फार गहन विचार कर्रुन काढलेला धागा आहे हा.

In reply to by मुक्त विहारि

अजून वर्गणी नाही मिपाला म्हन्ताना लेखन व्याप आहे एकदा पैशे झाले सुरू की काय कुणाची टाप आहे .... ? ऑ

मुक्त विहारि तुमच्या बर्‍याच प्रतिसादांना 'लाइक' करायचे आहे पण बटनच दिसत नाही

श्रावण बाळाच्या आईबापांनी दशरथाला "पुत्रवियोगाने मरशील" असा शाप दिला तो त्याला "पुत्रप्राप्तीचा वर" वाटला ही गंमत पण वाटेल.

एक सूचना या सगळ्या पौराणिक कोथा डेटाबेस स्वरुपात साठवल्यास आपल्याला पाहिजे तशा क्वेरीज चालवता येतील शाप - म्हटले की शापाच्या कथा, उ:शाप - की त्या अहिल्येच्या कोथा कुमारी माता- की तसल्या कोथा कथा + भाष्ये कुमारी माता & इरावती कर्वे यांचे भाष्य झालच तर कुमार पिता हेही यात येऊ शकतील असं बरच काय काय अजूनही काय काय अ‍ॅट्रीब्युटस् टाकायला हरकत नाही, म्हणजे आपला आपणच अभ्यास वाढवता येइल असं नीट ष्टोअर केलं तर 'तुमच्यासाठी काय पण' माहिती शोधून काढता येइल

In reply to by आशु जोग

असा डेटाबेस बनवला तर लै बरे होईल. कितीक वादांचा जागेवरच कंडका पडेल.

मला वाटतं.. ज्या प्रमाणे आशिर्वाद अथवा वरदान खरी ठरतातच असं नाही तसच शापाचं पण म्हणून शापाचं महत्वं कमी होत नाही. ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगल्या भावना तुमच्या मनात असतील आणी त्या व्यक्तीचे भले व्हावे असे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर तुम्ही आशिर्वाद देता. किंवा त्याचे मंगल होवो असे मनात आणता. तसच एखाद्याबद्दल अत्यंतिक तिरस्कार वाटत असेल तर तुम्ही त्याला शिक्षा व्हावी अशी मनोकामना करता ना? तोच शाप. आता त्याचा उच्चार केल्याने कुणाला थोडेफार समाधान मिळत असेल तेव्हढेच त्या शापाचे महत्वं बाकी काही नाही.

फुल्टु कल्ला चल्लेला दिस्तोय.

धागा अमर रहे.

आधुनिक काळातील शाप राहिला. गोहत्या प्रतिबंध्क कायद्यासाठी साधूंनी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी इंदिराजींनी लाठीमार की गोळीबाराचे आदेश दिले होते. तो दिवस गोपूजेचा होता ( म्हणजे नेमका कोणता दिवस?) त्यावेळी एका साधूने शाप दिला की तुमच्यावरही ( म्हणजे इंदिराबैंवर) असाच शस्त्रहल्ला होईल. इंदिराजींची हत्या झाली. तो दिवसही तोच म्हणजे गोपूजेचा होता ( म्हणे) ( साभार - सनातन वांगमय , चुभुदेघे)

In reply to by उद्दाम

आता बाकीचे गांधी म्हणजे महात्मा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी ह्यांच्याबद्दलही काही कथा असल्यास लिहाव्या.. ;-)

In reply to by चिगो

गाय गेली वासरू आले वाघाने पण बछडा आणला हत्तीने ही पिल्लू आणले तरीही आपण सगळे झोपलेले "अंगठा" मुवि

कोणे एके काळी एका आयडी ने एकोळी धागा काढला म्हणून त्याला शाप दिला होता .. आजकाल तो आयडी शापामुळे ट्रोलिंग करत फिरतो..

हिंदू धर्मात निधर्मान्ध निपजतील आणि 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' या उक्तीप्रमाणे ते आपल्याच धर्माच्या मुळावर येतील असा हिंदू धर्माला शाप आहे.

In reply to by श्रीगुरुजी

चूक.... हिंदूंना जातीत विभागणारे, कर्मकांड माजवणारे जन्मतील आणि धर्माचे ठेकेदार बनतील असा हिंदूना शाप आहे.

पुराणातल्या कथांमधे लॉजिक शोधायला क्ष मूर्खपणा लागतो. पुराणांतील कथांवरून आजच्या समाजावर भाष्य करायला क्ष चा वर्ग मूर्खपणा लागतो.

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते
शाप हे फक्त हिंदू धर्मातच दिले गेले आहेत का?
हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील
जोक of the millenium
कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?
चुकून कोणाकडून हि आपलं थोडाजरी नुकसान झालं तर लगेच आपल्या तोंडात शिव्या येतात . शाप हा त्याचाच सभ्य प्रकार . खून, दरोडे , बलात्कार आणि अजून भयानक अपराध करणार्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील म्हणून कोर्ट , पोलिस ह्या गोष्टी बंद केल्या तर चालतील का? गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची जाणीव तिथल्या तिथे करून द्यावी आणि इतरांना जरब बसावी म्हणून शाप देण्याची प्रथा होति. सामान्य माणसांमध्ये शाप द्यायची ताकद नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने पोलिस, कोर्ट कचेरी ह्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं ज्याच्यामध्ये ती ताकद आहे तो कशाला ह्यांची वाट बघत बसेल

भारत हा एकंदरीत शापित देश आहे. आधी मुस्लिम, नंतर ब्रिटिश आणि नंतर काँग्रेसच्या राजवटीचा महाशाप भारत व भारतीयांना मिळालेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आरेसेस भाजप बजरंग दल मोदी पेशवाई जातीव्यवस्था वर्णव्यवस्था ही वरदानं आहेत! .. हो की नै रे गुर्जी!

In reply to by श्रीगुरुजी

व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला कॉंग्रेसचा फास गळी असे आचार्य अत्रेंच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते

शाप देणे फक्त हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये नाही .ग्रिक कथांतही "Cursed" आहे . हिंदू धर्मातली जन्मलेली व्यक्ति नि:संकोच धर्मावरच टिका करते ते खपवून घेतले जाते (तसे इतर धर्मांत नाही अथवा दगड मारून ठार करतात)ही सहिष्णूता . निसर्गातले चांगले चमत्कार( पाऊस वगैरे)अथवा वाईट ( भूकंप ,पूर ,रोगांच्या साथी ,मृत्यू इत्यादि )यांचे वैज्ञानिक कारण मानवाला देता येत नव्हते त्यावेळी त्याने पौराणिक कथा पुष्टीसाठी केल्या .यामागे असलेल्या काही गूढशक्तिंना संतुष्ट केल्यास (पुजा ,बळी वगैरेने) आपल्याला त्रास देणार नाहित या विचाराने ही रीत सुरू झाली .तरीही आपत्ती आली की त्याला कोप म्हणायचे .सर्वच धर्मांमध्ये वाईट प्रवृत्ती आहेतच फक्त त्यांना व्यक्त करता येत नाहित .

खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.
तुमची लायकी प्रमाणेच तुम्ही विनोद करणार . तुमच्या बुद्धीची कुवत दाखवून दिलित.

हिंदू धर्मात निधर्मान्ध निपजतील आणि 'कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' या उक्तीप्रमाणे ते आपल्याच धर्माच्या मुळावर येतील असा हिंदू धर्माला शाप आहे.
मलाही आता असंच वाटू लागलाय

अतिशय त्रासाने दिलेली शापवाणी खरी होते हे काही खरे वाटत नाही.... जर हे खरे असते तर आपल्या देशात सर्वसामान्यांचे शाप खरे होऊन न्यायाचे आणि कायद्याचे राज्य आले असते....