Skip to main content

अन्नसुरक्षा आणि निधर्मीवाद (?)

लेखक इष्टुर फाकडा यांनी सोमवार, 14/10/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपले केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री थॉमस यांनी अन्नसुरक्षा बिलाचा गोषवारा असलेली एक पुस्तिका नुकतीच व्हेटीकन मध्ये जावून पोपच्या पायावर घालून आणली म्हणे. याला आपली हरकत असायचे कारण नाही. आपणही दिवाळीला हिशोबाच्या वह्या भवानीला दावून आणतोच कि ! क्याथोलीकांची श्रद्धास्थाने व्यक्तीस्वरुपातही आहेत एवढेच. म्हणून फक्त हे सरकारी प्रेस रिलीज मध्ये सापडते, माध्यमांमध्ये नाही. याची बातमी व्हायचे कारणही नाही, मान्य. http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=99965 गोची तेव्हा होते जेव्हा आपण याच घटना एखाद्या मंत्र्याच्या आणि शंकराचार्यांच्या बाबतीत घडल्या अशी कल्पना करून ब्रेकिंग न्यूज चे मथळे विज्युअलाइज करायला लागतो… आपला निधर्मीवाद/सर्वधर्मसमभाव सापेक्ष असतो का किंवा का असतो ? अन्नसुरक्षा बिल हे सोनियांचे स्वप्न असायचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर कदाचित या घटनेतून मिळू शकेल का ? (बालबुद्धी- इष्टु)

वाचने 19567
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by सुनील

संपूर्ण परिषदेत पोप हे कुठल्याही 'देशाचे' प्रतिनिधी म्हणून उपस्थित न्हवते. त्यामुळे थॉमस यांनी धार्मिक भावनेतूनच पुस्तिका पोपना अर्पण केली (म्हणून पायावर घालून आणली- जसे आपण अपत्याला देवीच्या पायावर घालून आणतो तसेच). जसे मी लेखात म्हटले आहे कि, पुण्याच्या भावनेतून त्यांनी ते केले ज्याला वरवर हरकत असू नये. मी फक्त दुसर्या एका परिस्थितीमध्ये हीच घटना माणसे आणि धर्म बदलून कल्पना करत होतो. त्या परिस्थितीमध्ये आपल्या माध्यमांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले असते का? शिवाय जिथे पोप राहतात तिथे शिवाय बहुतेक सर्व युरोप मध्ये सरकारी धर्म ख्रिस्ती आहे. त्यांच्या सरकारी माणसाने हे केले तर त्याची वाहवा होईल. आपल्या देशाचे सरकार 'निधर्मी' आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे ते त्या मुद्द्यावरून टिर्या बडवून घेत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर या घटनेची साधी दखल सुद्धा घ्यायची नाही असे तुमचे म्हणणे आहे काय ?

In reply to by इष्टुर फाकडा

या सर्व पार्श्वभूमीवर या घटनेची साधी दखल सुद्धा घ्यायची नाही असे तुमचे म्हणणे आहे काय ?
सदर न-घटनेची मिडियाने कितपत "दखल" घेतली हे तुम्ही एव्हाना पाहिले असेलच! इत्यलम.

नॉनइश्युवरुन लोकांमध्ये भांडणं लावून द्यायची ,म्हणजे लोक मुख्य मुद्द्याकडे येतच नाहीत... लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाही, पोपच्या नावाने चुना लावत बसायचे..

In reply to by ग्रेटथिन्कर

१. तुमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा कोणता हे सांगाल का ? २. हा जर तुमच्या दृष्टीने 'नॉनइश्यु' होता तर इतक्या प्रतिक्रिया का दिल्या तुम्ही ?

In reply to by इष्टुर फाकडा

मुख्य मुद्दा -लोकांना अन्न मिळणे प्रतिक्रिया देतोय कारण खरा इश्यु वाचकांच्या लक्षात आणुन देणे.

In reply to by ग्रेटथिन्कर

हा मुद्दा "मुख्य मुद्दा -लोकांना अन्न मिळणे" तुमच्या लक्षांत आला तर...... हे मात्र लक्षात नाही आले "प्रतिक्रिया देतोय कारण खरा इश्यु वाचकांच्या लक्षात आणुन देणे." कारण तुमचा खरा इश्यु माझ्या तरी लक्षांत आला आहे... तरी पण आपले ते मूळ प्रश्र्न आहेतच ,,,, बाकी नेहमीप्रमाणे......

In reply to by ग्रेटथिन्कर

लोकांना अन्न मिळेल याचा आनंद नाही हे फक्त गृहित आहे. याच्यासाही खरी राजकीय इछाशक्ती आहे की नाही याकरिता "शिधापत्रिकांच्या घोळांची पाश्वभूमी + गेले शतक दोन शतके होणार्‍या गलथान साठवणूकीने होणार्‍या हजारो टन अन्नाच्या नासाडीची पार्श्वभूमी" चांगले उत्तर देत नाही. किंबहुना "अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी योग्य गोदामे तयार करा आणि शिधापत्रिकेवरून नीट अन्न्वाटप होईल अशी व्यवस्था करा... इतर काहीही करण्याची गरज नाही" हा सल्ला तज्ञांकडून सरकारला अनेकदा दिला जातो आणि त्याकडे सतत डोळेझाक केली जाते. यात या योजनेतून काय साधायचे आहे ते दिसतच आहे... डोळे उघडे असल्यास. सद्याचे पुरावे हे फक्त गृहितच राहील किंवा भ्रष्टाचारासाठी अजून एक कुरण होईल असेच पुर्वानुभव आहे. जर सरकारला खरंच गरिबांच्या पोटाची काऴजी असेल तर ती (१) थोड्या काळासाठी भ्रष्टाचारमुक्त शिधापत्रीकेवरील अन्नचे वितरण आणि (आ) कायम स्वरूपी देशव्यापी रोजगार योजनेचे नियोजन यानेच होऊ शकेल. हे करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी भ्रष्ट सबळांना काबूत ठेवून दंड करण्याची कुवत असल्याचे पुरावे अजूनपर्यंत उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळा पुस्तिका वाटुअन किंवा अगदी कायदा करूनही (शिधापत्रिका कायदा आहेच की अनेक वर्षे) लोकाना ना अन्न मिळेल असा आनंद व्यक्त करायचा असेल तर स्वतःच्या बँकेच्या खात्यात एकाएकी करोडो रुपये जमा झालेत असाही आनंद व्यक्त करायला हरकत नाही... शेवटी सगळा खयालोंमे हंगामा. पोपच्या नावाने चुना लावत बसायचे... प्रतिसाद नीट वाचले तर असे दिसून येईल (किंवा खरे हे आहे की तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे) की बहुतेक जण असेच म्हणत आहेत की हा पोपबद्दलचा मुद्दा नाही तर "परदेशी माणूस किंवा कोणीही धर्ममार्तंड*" यांना आपल्या देशातल्या कायदाव्यवस्थेत दखल देण्याची अथवा सामील करून घेण्याची परवानगी सरकारला आहे काय? याचं उत्तर नाही असे आहे (हे माहित नाही असे दिसत आहे म्हणून मुद्दा भरकटवण्याच्या प्रयनाअगोदरच ते देऊन ठेवतो.) * :यात सगळे-- हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, इ. --- धर्म येतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद आवडला. फक्त रेशन कार्डांबद्दल बोलायचे तर २०११ ची ही बातमी बघा. २०११ च्या जनगणनेत गोव्याची लोकसंख्या १४.५९ लाख असताना तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीत गोव्यातल्या रेशन कार्डधारकांची संख्या १६ लाखावर पोचली होती!!! अजूनही पर्रीकर सरकार नेपाळी आणि बांगलादेशी घुसखोरांना कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे! संपूर्ण अवांतरः सरकारी गोदामांमधे लाखों करोडों टन अन्नधान्य कुजून वाया गेल्याच्या बातम्या रोज उठून येत असतातच. त्याशिवाय या सगळ्या उपक्रमाला प्रत्यक्षात किती खर्च येणार आहे ते एक देवच जाणे! शिवाय करामती करून दारिद्र्य रेषा वर नेण्यात आली आहे. मग आता गरीब कुटुंबे कुठून उत्पन्न झाली? एकीकडे सबसिडी काढून टाकायच्या गोष्टी बोलायच्या, आणि एकीकडे सबसिडी या ना त्या प्रकारे वाढवत रहायची यामागचे अर्थकारण कोणीतरी समजून सांगा प्लीज!

In reply to by पैसा

....कसे शोधून काढायचे या विवंचनेत आहे!" कठीण आहे... आसामचे उदाहरण पटकन डोळ्यासमोर आले.... अति अवांतर.... तुमच्या गोव्यात पण मुंबई सारखे आझाद मैदान आहे का?

In reply to by मुक्त विहारि

ही बाहेरून येणारी मंडळी सुरे-खुकर्‍या-कट्टे घेऊनच येतात. वरिजिनल गोंयकार फक्त तोंडपाटिलकी करणारे.

In reply to by पैसा

थोडक्यात... येत्या १०/१२ वर्षांत गोव्यात पण दंगली व्हायचा चानस दिसतोय.