Skip to main content

वन्दे मातरम का नाही??

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 10/10/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... २-३ दिवसापुर्वी श्री शरद पोन्क्शे यान्च्या व्याख्यानाला जायचा योग आला होता. अतिशय तळमळीने त्यानी जन गण मन आणि वन्दे मातरम मधला फरक आणि त्यामागचे भयानक राजकारण समोर आणले. ऐकुन रक्त खवळले आहे. नेहरु आणि गान्धी घराणे देशाचे मातेरे करण्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेच...आई भवानीने सर्व दानवान्चा नाश करण्याची शक्ति आमच्या बाहूत निर्माण करावी हीच प्रार्थना.... बातमीचि लिन्क खाली डकवली आहे..... http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/---/arti…

वाचने 40432
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? :-P मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही. आपत्तीकाळात चमकोगिरी करणारे काहीजण असतात त्यातला हा प्रकार दिसतोय. ;-) एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ???? स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत :-P :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

"चड्डीवाले आपत्तीकालात मदत करतात ?? Blum 3 मी तरी कधी बघितले, ऐकलेले नाही." संघवाले मदत करतात ही बातमी आपल्या पर्यंत आली नाही का? मग एक काम करा.आत्ता उत्तर भारतात पुर आला तेंव्हा कोण कोण गेले होते त्याची जरा माहीती घ्या.माझ्या माहीतीप्रमाणे संघ वाले गेले होते. "एवढाच देशसेवेचा पुळका आहे तर सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करायचा विषय निघाल्यावर या तथाकथित राष्ट्रसेवकांना पोटशुळ का उठतो ????" मुळात मी सच्चर आयोग वाचलेला नाही त्यामुळे मला माहीत नाही.आणि मी काही संघाची धोरणे वगैरे ठरवत नाही.त्यामुळे आपणच ह्या बद्दल जास्त सांगू शकाल. "स्वतःच्या भावाच्या मनीऑर्डरमधले दहा रुपये कापून घेणारे ज्यांचे आदर्श आहेत ते चड्डीवाले आपत्तीकाळात मदत करायला जातात... वा रे मदत" ही पण कहाणी मला माहीत नाही.त्यामुळे आपण म्हणता तसे पण असेल.मान्य करतो.पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?

In reply to by मुक्त विहारि

संघवाले उत्तर भारतात पुरग्रस्तांच्या मदती साठी गेले होते ही चांगली गोष्ट आहे ...तसेच औदार्य त्यांनी इतर धर्मीयांच्या बाबतीतही दाखवावे तरच ते राष्ट्रीय होतिल. एक शंका... हे संघाचे प्रचारक इतरांच्या घरी वार लावू जेवतात असे बघितले आहे ,हिंदूनी हे असले हजारो प्रचारक अनेक वर्षं फुकट खायला घातलेत/ घालत आहेत, त्यांनी पूरग्रस्तांना मदत दिली तर लगेच त्याचा बोभाट कशाला करायचा?

In reply to by ग्रेटथिन्कर

त्या पहिल्यांदा विचारलेल्या शंकांची उत्तरे न देता असे नविन नविन मुद्दे कशाला हो काढता?

In reply to by मुक्त विहारि

ते मनसोक्त ट्रोलींग करताहेत आणि तुम्ही रक्त तापवून घेताय आणि टंकन श्रम वाया घालवताय. तरी आमच्या संघप्रेमी विक्षिप्त भगिनी अजून आल्या नाहीत. त्या आल्या तर तुमचे अजून १०-२० प्रतिसाद नक्की.

In reply to by मुक्त विहारि

संघवाले मदत करतात ही बातमी आपल्या पर्यंत आली नाही का? मग एक काम करा.आत्ता उत्तर भारतात पुर आला तेंव्हा कोण कोण गेले होते त्याची जरा माहीती घ्या.माझ्या माहीतीप्रमाणे संघ वाले गेले होते.
बातमी कानावर आलेली नाही,आणि केदारनाथला मदतीला गेले नाहीत तर लोक त्यांच्या तोंडात गोमय घालतील हे ठाऊक आहे त्यांना.संघटना' राष्ट्रीय' आहे तर मदत फक्त हिंदूंचीच का??? मुस्लिम शीख ख्रिस्ती हे भारतीय नाहीत असा संघवाल्यांचा समज आहे काय?? असल्यास तो का करुण दिला असावा
मुळात मी सच्चर आयोग वाचलेला नाही त्यामुळे मला माहीत नाही.आणि मी काही संघाची धोरणे वगैरे ठरवत नाही.त्यामुळे आपणच ह्या बद्दल जास्त सांगू शकाल.
वाचा मुस्लिमांच्या सबलीकरणासाठी तो अहवाल लागू करायला हवा असे आयोग ख्रिस्ती शीख बौद्ध यांच्यासाठी नेमल्सास आपण ते वाचावे व त्याचे 'राष्ट्रीय' या नात्याने स्वागत करावे :-P
काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो?
खरंय परंतु हेच फक्त का सांगायचे ?हिंदूराजे महाराजे गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात रहायचे ,असा आपला इतिहास आहे काय?? :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

पण अद्द्याप आपब आधीच्या शंकांबाबत काही मत व्यक्त नाही केले,,, ते पण एकदा लिहून टाका... तुम्ही असे नेहमी नका करू ना गड्या...

In reply to by मुक्त विहारि

तूमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अवतारकार्य नाहे. :-P :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

'तूमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अवतारकार्य नाहे." मग तुम्हाला पण शंका विचारायचा अधिकार नाही रहात ना गड्या.... कारण त्याचे काय आहे गड्या... आपण जर इतरांना शंका विचारत असू तर .. इतरांनी विचारलेल्या शंकांची उत्त्रे पण आपण द्यायला हवी ना......गड्या.....

In reply to by मुक्त विहारि

पण काय हो? औरंगजेब आणि शहाजहान स्वतःच्या भावांचे खून करून गादीवर आले होते ही गोष्ट खरी आहे का हो? अगदी खरे.... त्या औरंग्याने आणि शहाझानने स्वतःच्या भावाचे खून कर, तुरुंगात टाक असले धंदे केले. किती ते क्रूर नै का? आणि ही असली कामं करुन त्यान्नी इतिहासाची मझाच घालवली राव! भावाने दुसर्‍या भावाशी इस्टेटीसाठी भांडायचं तर कसं सिस्टिम्याटिकली भांडायचं .. म्हणजे आधी दोघानी द्युत खेळायचं . जिंकेल त्यानं हरणार्‍याची बायको नागडी करायची. मग त्यात मिटवामिटवी झाली की पुन्हा त्याच द्युताची खाज भागवायला पुन्हा खेळायचं .. मग हरलं की १४ वर्षे वनवास, मग अज्ञातवास .. मधल्या काळात एका भावानं दुसर्‍या भावाचं घर जाळायचं .. दुसर्‍यानं भुयार खणून पळून जायचं आणि त्याआधी कुठल्या तरी निष्पाप लोकाना मारुन त्यांची मढी फसवायला ठेवायची. मग शेवटी त्या दीडदमडीच्या राज्यासाठी अर्धा भारत हिकडे आणि अर्धा तिकडे असं युद्ध करायचं . मग त्या युद्धात औरंगजेब अचानक धनुष्य टाकून खाली बसणार. त्याचा रथ हाकणारा मौलवी सांगणार : औरंग्या, उचल ते धनुष्य आणि लढ. मग मुडदे, मढी, हातमोडके लोक, विधवा बाया, मग कुणीतरी कुणाची तरी छाती फोडून रक्त पिणार .. कुणीतरी कुणाचं तरी रक्त बायकोच्या केसात घालणार , अन काय , अन काय! :) तो औरंग्या अन त्याचा भाऊ बिनडोक, त्यानी असले काही नाही केले ना!

In reply to by उद्दाम

बा ट्रोलभैरवा, आपण तर बॉ बेहद्द खूष झालो तुमच्या ट्रोलपाटीलकीवर. ट्रोलिंगचे क्लासेस लावणारे तुमच्याकडे .

In reply to by मुक्त विहारि

त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ... हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..

In reply to by मुक्त विहारि

त्यांनी चांगले उत्तर दिलेय मुक्तबिहारी! तेच मी दिलेय ... हिंदूराजे हम साथ साथ है शिणुमा सारखे राहयचे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला अमी तरी काय कर्नार..

In reply to by ग्रेटथिन्कर

पण त्या पहिल्या प्रश्नांचे काय? का ती पण उत्तरे दुसर्‍या कुणीतरी द्यायची वाट बघत आहात? का आपल्याला अजून पण पदर लागतो?

In reply to by मुक्त विहारि

मुक्तविहारी आण्णा, हा मुक्त फोरम आहे. इथे कुणालाही कुणीही प्रश्न विचारु शकतो आणि उत्तरही देऊ शकतो. प्रायव्हेट प्रश्नोत्तरे करायची असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावेत.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहार करायला यापेक्षा उत्तम जागा आहेत , कुठे त्यांच्या स्वप्नात जाता? उद्या ते म्हणतील . मुक्तविहारी माझ्या स्वप्नात आले, त्यात संघाचा हात आहे! त्यातून त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, तेव्हा स्वप्न इल्ला !

In reply to by मुक्त विहारि

हा मुक्त फोरम असून कुणीही प्रश्न विचारत किंवा उत्तर देत मुक्तपणे विहार करु शकतो. खाजगी सवाल जबाब खेळायचे असतील तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत देत बसावे. ----- मुक्तविहारी उद्दाम.

In reply to by ग्रेटथिन्कर

संघवाले आपत्तीकाळात टीव्ही चॅनेलची वाट बघत थांबत नाहीत हो ग्रेथीं . ते बिना पब्लीसीटी काम करतात. बिनडोकच लेकाचे. टीव्ही आल्याशिवाय काम सुरु करायच नाही असा विचारच नाही त्यांना. ह्या! बा द वे ते पुर्वभारत..जे चिनच्या अगदी जवळा आहे ते...तिथली माणस सुद्धा जेनेटीकली चिनी लोकांसारखी दिसतात ते...ते पुर्वांचल कोणामुळे भारताला जोडुन आहे जरा विचारुन या. मग गावा गाणी हाताची.

In reply to by स्पंदना

प्रचंड सहमत. राहुल, सोनिया गांधीनी पत्रकार, विविध वाहिन्यांचे छायाचित्रकार वगैरे बोलवुन हिरवा झेंडा वगैरे दाखवुन ट्रक रवाना केले ते बघुन तर प्रचंड संताप आला.

In reply to by स्पंदना

बा द वे ते पुर्वभारत..जे चिनच्या अगदी जवळा आहे ते...तिथली माणस सुद्धा जेनेटीकली चिनी लोकांसारखी दिसतात ते...ते पुर्वांचल कोणामुळे भारताला जोडुन आहे जरा विचारुन या. 
आमच्या माहिती आणि अकलेप्रमाणे, भारत सरकार जो भरपुर पैसा ओतते (जो की खर्च करणे पण जमत नाही आम्हाला :-( ) त्यामुळे.. संघाचे लोक इथे एवढ्या कठीण परीस्थितीत काम करत असतात, ह्याचं कौतुक आहे.. पण त्यांच्यामुळे हा भाग देशाशी जोडलेला आहे, हे जरा जास्तच होतंय.. भाजपाचा ह्या भागातला परफाॅर्मन्स पाहीलात, तरी कळेल हे..

तुम्ही फारच विनोदी लिहिता बुवा ! शक्यता आहे, त्यालाच ग्रेटथिंकिंक म्हणत असतील ! गडागडा लोळण्याची स्मायली !

In reply to by ग्रेटथिन्कर

अहो त्या माझ्या बाळबोध प्रश्नांचे काय करताय? हे असे अर्ध्यावर सोडून कसे काय चालेल?

In reply to by मुक्त विहारि

अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का? हा धागा आता बरेच दिवस पेटता राहील ,हे तूमाला 'वंडे मॅटरम्' वाटले काय? :-P चला,' शब्बाखैर वंदे मातरम'

In reply to by ग्रेटथिन्कर

अहो शिक्षक "अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का?" हो, लिहून टाका. आम्ह्ला झेपेल... " हा धागा आता बरेच दिवस पेटता राहील" राहू दे हो.त्याची चिंता आपण कशाला करायची. तुम्ही शिक्षक व्हा आणि आम्हाला शिकवा... " शब्बाखैर वंदे मातरम'" असे नाही चालायचे ना गड्या...प्रश्न असे अर्ध्यावर ठेवले की काय होते ते माहीत असेलच शिक्षक साहेब,,

इयत्ता सहावीमध्ये असताना एकदा गुरूजींनी संपूर्ण वर्गाला प्रश्न विचारला की आपण राष्ट्रगीत म्हणताना खालिल कडवे इतर कडव्यांपेक्षा हळू आवाजत का म्हंटले जाते? 'तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा' या प्रश्नाचे उत्तर कुणालाच ठाऊक नव्हते. प्राथमिक शाळेपासून इतर लोक ज्या प्रकारे म्हणतात त्याच प्रकारे म्हणायची सवय प्रत्येकाला होती. हा प्रश्नही कुणाला तोवर पडला नसावा. उत्तर देण्यासाठी कुणीच हात वर केला नाही हे पाहून गुरूजींनी स्वतःच उत्तर सांगितले. स्वातंत्र्यापूर्वी कधीतरी इंग्लडचा राजा पंचम भारतभेटीवर आला होता. त्याच्या स्वागत समारंभात गाणे म्हणायला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना पाचारण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात जे गीत त्यांनी म्हंटले तेच आपण रोज राष्ट्रगीत म्हणून म्हणतो. त्या कार्यक्रमाच्या वेळी राजाला त्याचा दुभाषी इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगत होता. सदर गीत जरी स्वागत समारंभामध्ये गायले गेले असले तरी ते सर्वशक्तिमान इश्वराला उद्देशून होते. सुरूवातीच्या कडव्यांतील भारताचे वर्णन संपल्यावर राजालाच आशीर्वाद मागतोय असे समजायला नको म्हणून गुरूदेवांनी ते जाणूनच हळू म्हंटले. तेव्हापासून हे कडवे हळूच म्हंटले जाते. शाळा सुटून अनेक वर्षे झाली त्यामुळे रोज राष्ट्रगीत म्हणायची वेळ येत नाही. पण जेव्हाही (सार्वजनिक कार्यक्रम, चित्रपटगृह, दूरचित्रवाणी) ते ऐकू येते तेव्हा जे रोमांच उभे राहतात ते जगातले इतर कुठलेही गीत ऐकून उभे राहत नाहीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

आणि अतिशय धागोचित ( धाग्यासाठी उचित ) म्हणु या ! असे रंगवून शिकवणारे आणि ऑफ दी बीट शि़कवणारे मास्तर लोक होत म्हणून काही चांगले संस्कार घडत असत. याबाबतीत आमची पिढी भाग्यवानच म्हणायची! मी सातवीत असताना आमच्या गायकवाड सरांनी इतका रंगवून इतिहास शिकवला की ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याचा धडा शिकवला , तेव्हा वर्गात सर्व मुलांनी उभे राहून टाळयांचा कडकडाट केला. आमची पोरं याबाबतीत तितकीशी भाग्यवान नाहीत !

जन गण मन हे राष्ट्रगीत आहे आम्ही त्याचा सन्मान करणारच. बा द वे इथे संघ कुठे आला. संघाच्या स्थापनेपूर्वीच वंदे मातरमचा जन्म झाला. दुसरी गोष्ट गांधीजींबद्दल संघाला पूर्ण आदर आहे. किती पुरावे द्यावेत. संघाच्या कार्यालयात गांधीजींचा फोटो असतो. संघाच्या प्रातःस्मरणात 'दादाभाई गोपबन्धुः तिलको गांधिरादृता' अशी ओळ आहे. अर्थात गांधीजी हे संघाला प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे कुणी आपल्या नाटकातून गांधीजींवर टीका करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जाता जाता - शरद पोंक्षे हे विचारवंत म्हणून परिचित नाहीत. दुसरी गोष्ट ते संघाचे प्रवक्तेही नाहीत.

In reply to by आशु जोग

शरद पोंक्षे हे विचारवंत म्हणून परिचित नाहीत
केलात धाग्याचा समारोप? अहो, अजून शतक बाकी आहे ;)

रविंद्रनाथांनी भारत आणि बांग्लादेश अशा दोन राष्ट्रांची राष्ट्रगीते लिहिली आहेत. जगाच्या पाठीवर हा विक्रम फक्त त्यांच्याच नावावर आहे.

व राष्ट्रकवी सतिश यांचे "मोकलाया दाहि दिशा" हे गीत राष्टगीत म्हणुन जाहिर करावे अशी मी आग्रही मागणी करतो. हे गीत गाताना त्याचा पुर्ण आदर राखला पाहिजे. एका जागेवर स्थीर उभे राहुनच हे गीत गायले पाहिजे असा कायदा करावा व कायदेभंग करणार्‍यांवर कडक कारवाई करावी.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आणि या राष्ट्रगीताच्या मूळ पाठात बदल करून जर कोणी शुद्ध म्हणू पाहील तर त्यच्य(तिच्य पन म्हतले असते पन मग उगिच विशय तिस्रिकदे गेल असत) पर्श्वभग्वर पोक्ल बबुम्चे फतके दिल्य जतिल.

In reply to by बॅटमॅन

ना ई ना चोलबे,तरिच तुमका असा सान्गुक होया,ईतको सन्स्क्रुत चो अब्यास बरा नवो कारण त्या राष्ट्रगीत नोया तर राष्टगीत होया,नायतर पयला लम्बर तुमचोच लागतलो.

In reply to by अनिरुद्ध प

रस्त्रगित म्हनयचय कं? मग थिक. पन तरिहि अधिच सन्गुन थेव्लेले बरे अस्ते, उगिच कोनि शुद्द शुद्द म्हनेल तं तेला पोकल बंबुचे फतके दिल्य जतिन.

In reply to by मुक्त विहारि

मोकलाया दाही दीशा ची लीन्क द्या ना राव !! आम्हाल पण मजा घेउद्या ना.. (अरे ये पीएसपीओ नही जानता असे म्ह्णू नका)

In reply to by खटपट्या

ही घ्या लिंक. http://www.misalpav.com/node/6332 येंजाय!!!! मिपावर तरी उगा त्या वंदेमातरम किंवा जनगणमनपेक्षा मोकलाया दाही दिशा हेच राष्ट्रगीत म्हणून योग्य आहे हे आमचे मत पुन्हा एकद मांडून आपली (फुल पेड) रजा घेतो.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

"मोकलाया दाहि दिशा" राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिश्चनांना मनाचा खुपच जास्त मोठे पणा दाखवावा लागेल. नकाहो असा दुष्टपणा करु

मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे ?????. मूळात हिंदुबहुल असा हा देश त्यांनी आपला म्हणुन स्वीकारला हेच त्यांच्या मोठेपणाचे द्योतक आहे असेही म्हणता येइल.

In reply to by मृत्युन्जय

हिन्दुबहुलानी त्याना ईथे गुण्यागोविन्दाने राहु दिले याला काहीच महत्व नाही का?पर्शियन, ज्यु यान्नातर या देशाचा खुपच अभिमान आहे जेव्हडा येथिल हिन्दु बहुलाना सुद्धा नसेल असे ऐकले आहे.

जन गण मन हे गेले साठ एक वर्षे राष्ट्रगीत बनले आहे आणि ते बदलणे अशक्य आहे. पण हे शल्य विसरता कामा नये की वंदे मातरम ह्या गीताचा राष्ट्रगीतपदावर अधिकार होता पण मुसलमान लोकांना घाबरुन कुठलाही आगा पिछा नसलेले, स्वातंत्र्य लढ्यात कुठलाही सहभाग नसणारे गाणे राष्ट्रगीत म्हणून लादले गेले. जेव्हा हे घडले तेव्हा खास मुसलमानांकरता देशाचे दोन लचके तोडले गेले. ज्यांना भारतीय संस्कृतीचा तिटकारा आहे आणि धर्माच्या ताठरपणामुळे वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही त्यांना "त्या" देशात जाण्याची मुभा होती. पण आपल्या शेपूटघाल्या नेत्यांनी इथेही शेपूट घातले. वंदे मातरम ला राष्ट्रीय गीत असा सरकारी दर्जा दिलेला आहे. पण अर्थात मुस्लिमांचा विरोध आता जास्त कडवा झाल्यामुळे हे गीत पुन्हा सन्माननीय होणे शक्य नाही. जनगणमन हे राष्ट्रगीत असल्यामुळे त्याचा आदर करणे आवश्यकच आहे. पण एक काव्य म्हणून ते अत्यंत सुमार आहे असे माझे मत. त्यातील राज्यांची नावे तर अत्यंत वादग्रस्त आहेत. मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते. देशाचे गुणगान नसून देश कुणाचे तरी गुणगान करतो आहे असेच त्या ओळींमधून सूचित होते. असले काव्य राष्ट्रगीत बनावे हे आमचे दुर्दैव दुसरे काय!

In reply to by हुप्प्या

मी पण हेच विचारले की... भो पंचम जॉर्ज साठी रचलेले काव्य राष्ट्र गीत होवू शकते का?

In reply to by मुक्त विहारि

जनगनमन तेंव्हा वंदे जॉर्जला उद्देशून होते का आणि आज कुणाला उद्देशून आहे, याची चर्चा 'वैदिक' मंडळीनी करायची म्हणजे अजबच आहे! ऋग्वेदातील एके काळचे ब्रह्मणस्पतीचे सूक्त गणपतीसाठी आजचे वैदिक दुकानदार वापरतात. ऋग्वेदातील इंद्राच्या डाव्या आणि उजव्या हाताचे सूक्त हेदेखील आज गणपतीच्याच सोंडेचे वर्णन आहे, असेही हेच दुकानदार सांगतात आणि ते देखील बिनदिक्कतपणे आज गणपतीसाठी वापरतात. ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात. आणि , समजा, ते जनगनमन पंचम जॉर्जलाच उद्देशून असले , तर न्हेरु मात्र ते भारताला/ विधात्याला का वापरतात ? असा प्रश्न विचारुन हीच वैदिक मंडळी इंटरनेटावर गळाही काढतात !!!!

In reply to by उद्दाम

घरात कुठले धर्मकृत्य करताना कुठले तरी धार्मिक स्तवन गायले जाते म्हणून पंचम जॉर्जचीही भक्ती करायला काय हरकत आहे? वा! काय तर्कट आहे! कोंबडीचे अंडे खाल्ले जाते मग पिसे आणि शिटाही खायला काय हरकत आहे ह्या तर्कटाइतके आपले तर्कट तर्कशुद्ध वाटते! धन्य आहात. भारताला/विधात्याला? भारतभाग्यविधाता म्हणजे भारताचे भाग्य घडवणारा कुणी (म्हणजे अर्थातच पंचम जॉर्ज). मुद्दे खोडताना आपले विचार मुद्देसूदपणे मांडता आले तर बघा. नुसती डोक्यात राख घालून आकांडतांडव करून उपयोग नाही.

In reply to by उद्दाम

रुद्रसुक्त ऋग्वेदात ? मी आजपर्यन्त यजुर्वेदात आहे असे ऐकुन होतो चु भु द्या घ्या.

In reply to by हुप्प्या

मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते. अहो महाराज, हे गीत लिहिले गेले तेंव्हा भारतात आजची राज्ये आस्तित्वात नव्हती. ती त्या काळात असलेली प्रांतांची नावे आहेत.

तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे.... पण त्याचे काय आहे.... बायबल मध्ये प्रुथ्वी स्थिर आहे आणि सुर्य तिच्या भोवती फिरतो असा उल्लेख आहे.कुठल्या तरी एका शास्त्रज्ञाने सुर्य स्थिर आहे आणि प्रुथ्वी तिच्या भोवती फिरते असा शोध लावला. त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य करायला चर्चने ३०० का ४०० वर्षे घेतली.पण शेवटी त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य केला. इथे होणार्‍या चर्चेने आपले सरकार पण कदाचित राष्ट्रगीता बबतीत योग्य तो निर्णय घेईल असे वाटते. हातच्या कंकणाला आरसा कशाला?एक तर हात दाखवून तसेही अवलक्षण केले आहेच.आता जे काही हातात मिळेल ते योग्य मानून घेवुया...

Rajendra Prasad, who was presiding the Constituent Assembly on 24 January 1950, made the following statement which was also adopted as the final decision on the issue: “ ...The composition consisting of words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations as the Government may authorise as occasion arises, and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy members. (Constituent Assembly of India, Vol. XII, 24-1-1950) ” बाकी चालू द्यात.

the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy अच्छा अस हाय काय ! मग वंदे मातरम ला विरोध करणार्‍यांच्या दाढ्या कुरवाळ्याव्यात का उपटाव्यात ? ;)

In reply to by मदनबाण

हाय हाय ये जालीम तुम अब तीर को मत छूवो हो सके तो देखो भी मत... ऐसे तीर मारते हो के ... आदमी तो मरता ही है और मरने पर अम्रुत भी जिंदा नही कर सकता....

ग्रेट थिंकर यांचे प्रतिसाद वाचले. ते विरोधी वाटत असले तरी तसे नाहीत. ते फक्त हालवून खुंटी बळकट करण्याचे काम करीत आहेत.