Skip to main content

नोकरी कि धंदा ?

लेखक स्वतन्त्र यांनी रविवार, 22/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बर्याच ठेकेदारा मार्फत काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५ वर्ष आहेत त्यंनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे कि आपण सामान्य माणस फक्त कल्पनाच करू शकतो. या वरून मला पडलेले काही प्रश्न. सध्या अधिक पैसा कशात आहे ? नोकरी कि धंदा ? शिवाय आज शिकून सुद्धा लोक इतके पैसे मिळवू शकत नाही जेवढे पैसे हे लोक थोडा जम बसल्यावर सहज मिळवू शकतात. मग शिक्षणाचा फक्त Investment म्हणून विचार केला.तर आज शिक्षण माणसाला किती पैसा मिळवून देऊ शकते ? आज माझे असे बरेच मित्र आहेत जे ५ वर्ष कष्ट करून देखील पुरेसा पैसा मिळवू शकत नाहीयेत जेणेकरून ते स्वतःच घर घेऊ शकतील. आणि शिक्षण नोकरी शिवाय दुसरा पर्याय देत नाहीये. शिक्षण तुम्हाला काय देऊ शकते,जर प्रगती फक्त पैश्यातच मोजल्या जात असेल तर ?

वाचने 4060
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

नोकरी हा एकप्रकारचा धंदाच असतो. धंद्यात अनेक ग्राहक तुम्हाला पैसे देतात, नोकरीत तुमचा पैसे देणारा ग्राहक एकच असतो.

खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. नोकरी एकदा लागली मिळणारे पैसे निश्चित असतात. त्याहून जास्त मिळणार नाहीत. पण कामाची क्वालिटी टिकवून ठेवलीच पाहिजे असे नसते. त्यामुळे ताणतणाव कमी. अर्थात तुम्ही किती पैसे मिळवाल यालाही मर्यादा असतात. तुमच्या मनाची ठेवण जर जोखीम सहज घेण्याची असेल तर धंदा सुरू करावा. नाहीतर स्थैर्य हवे असेल तर नोकरी पकडावी. पेठकर काकांनी नोकरी आणि धंदा दोन्ही गोष्टी यशस्वीपणे केल्यात. ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

In reply to by पैसा

खूप मेहनत आणि काळज्या असतात. सतत चांगले काम करत राहणे आवश्यक असते तर तुम्ही स्पर्धेत टिकाल. >>> ++++++११११११११

अल मख्तूब … मख्तूब … जे व्हायचे ते लिहिलेलेच असते… त्यामुळे जे आहे त्याचा आनंद घ्या. तरीही ज्यांना वाटत असेल की आपल्या ठरवण्या- न- ठरवण्याप्रमाणे घडते, त्यांनी त्यातल्या त्यात समाधान आणि आनंद देणारा पर्याय निवडावा आणि त्याचे जे फळ पदरी पडेल त्याचा आनंदाने स्वीकार करावा.

नोकरी करणार कि धंदा, हे लिहिलंय ज्याचं त्याचं … वाचता येण्या- न- येण्यानं काय फरक पडणार जे लिहिलंय त्यात? ते कुणी वाचावं, म्हणून थोडीच लिहिलेलंय.

नोकरी म्हणजे ८ तासांचा धंदा आणी धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी. ;)

सध्या अधिक पैसा कशात आहे ? नोकरी कि धंदा ?
काय उत्कृश्ट जमते त्यावर अवलंबुन. पण प्रांजळ उत्तर हवय तर भ्रष्टाचार.
शिवाय आज शिकून सुद्धा लोक इतके पैसे मिळवू शकत नाही जेवढे पैसे हे लोक थोडा जम बसल्यावर सहज मिळवू शकतात.
कारण शिक्षण धंदा करायला शिकवतेच असे नाहि कि माणसाचे नशिब वा अनुकुलता/प्रतिकुलता ही बदलु शकत नाहि.
मग शिक्षणाचा फक्त Investment म्हणून विचार केला.तर आज शिक्षण माणसाला किती पैसा मिळवून देऊ शकते ?
रग्गड. पण जर टॉप रेंकिग मधेच असाल तरच. उगा का आपल्या तान्हुल्यां/सोणुल्यांना इनफंटावस्थेतच रेसिंग साठि प्रिप्येर केल्ये जात्ये ? पन हाफ नॉलेज इस देंजरस उदाहरणार्थ अभिमन्यो.