
हे छायाचीत्र १९९३ मध्ये प्रसिध्द छायाचित्रकार केविन कार्टर यांनी उपासमारी आणी कुपोषणाने ग्रासलेल्या इथियोपियाच्या एका आयोद नामक गावात काढला होता. येथे दिलेले छायाचित्र हे एका इथियोपियन (स्त्री) बाळाचे छायाचीत्र आहे, जी रांगत-रांगत आपल्या आई-वडिलांच्या झोपडीत जाण्याचा प्रयत्न करत आहे.. आणी जिचे आई-वडील उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी जंगलात गेले आहेत. भुकेने त्या बाळाला अगदी बेचैन करून टाकले आहे.. त्या बाळावर पाळत ठेवत एक गरुड बसले आहे आणी तिच्या मरणाची वाट पहात आहे. केविन कार्टर यांनी खूप वेळ या दृश्याचे निरीक्षण केले आणी आपल्या कॅमेरात बंदिस्त केले. त्यानंतर त्यांनी त्या गरुडाला तिथुन हुसकून लावले.
तसे त्यांनी या छायाचित्राशिवाय इथियोपियातील इतर संकटांची देखील छायाचित्रे काढली होती परंतु त्यांना हे छायाचीत्र विशेष वाटले.. नंतर केविन यांनी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' ला विकले.. आणी हे छायाचीत्र सर्वप्रथम २६ मार्च १९९३ च्या 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाले. आणी छायाचित्राबरोबरच्या ओळी होत्या "metaphor for Africa’s despair"-"आफ्रिकेच्या नैराश्याची लक्षणे"
केविन यांना या छायाचित्रासाठी प्रतिष्टीत आणी मानाचा असा 'पुलित्झर' पुरस्कार मिळाला.. हे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर हजारो-लाखो लोकांनी केविन कार्टर यांच्यावर या इथीयोपिअन बाळाबद्दल हजारो अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला.. आणी त्यांच्यावर आरोप लावण्यात आले कि त्यावेळी त्यांना त्या रांगणाऱ्या बाळाला वाचवण्याऐवजी तिचे छायाचित्र काढणे श्रेयस्कर वाटले. पण त्या लोकांना हे ठाऊक नव्हते कि त्या वेळी इथियोपियामध्ये अनेक संसर्गजन्य रोग पसरले होते आणी पत्रकारांनी जखमी किंवा आजारी इथियोपियाच्या नागरिकांपासून कटाक्षाने दुर रहावे. असा आदेश यु.नो ने दिला होता. आणी म्हणूनच केविन कार्टर त्या बाळाला उचलून कडेवर घेऊ शकले नाहीत.
केविन कार्टर त्या प्रतिष्टीत आणी मानाचा असा 'पुलित्झर' पुरस्काराचा आनंद बिलकुल नाही घेऊ शकले.. त्यांना सतत त्या इथीयोपियन बाळाची आठवण येत राहीली.. लोकांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे त्यांना बेचैन वाटू लागले. त्यांना त्यांचे मन खात राहिले कि त्यांनी त्या बाळाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले नाहीत.. आणी हेही नाही पहिले कि ते बाळ जिवंत आहे कि नाही.. याच अपराधी भावनेने आणी सत-सत् विवेक बुद्धीमुळे ते एकलकोंडेपणाच्या दरीत लोटले गेले.. आणी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या महान छायाचित्रकाराने आपला जीवन प्रवास संपवला.
मिसळपाव
प्रतिक्रिया
केविन कार्टर यांनी खूप वेळ या
केविन कार्टर यांनी खूप वेळ या दृश्याचे निरीक्षण केले आणी आपल्या कॅमेरात बंदिस्त केले. त्यानंतर त्यांनी त्या गरुडाला तिथुन हुसकून लावले.या बद्दल एका डॉक्युमेंट्रीमध्ये वेगळी माहिती मिळाली होती. डॉक्युमेंट्रीबद्दल फारसे आठवत नाहीये. सापडली की सांगेनच!त्यांना सतत त्या इथीयोपियन बाळाची आठवण येत राहीली.."सुदान" मध्ये घेतला गेला होता तो फोटो.आणी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या महान छायाचित्रकाराने आपला जीवन प्रवास संपवला.बरोब्बर १ वर्ष चार महिने आणि एक दिवसांनी केवीन कार्टरने आत्महत्या केली. अवांतर - विकीच्या सौजन्यानुसार केवीन यांची सुसाईड नोट.. "I am depressed ... without phone ... money for rent ... money for child support ... money for debts ... money!!! ... I am haunted by the vivid memories of killings and corpses and anger and pain ... of starving or wounded children, of trigger-happy madmen, often police, of killer executioners ... I have gone to join Ken if I am that lucky." या आधी सुचवलेले बदल थोडेफार प्रमाणात या लेखामध्ये उतरले आहेत - पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा!!धन्यवाद
In reply to केविन कार्टर यांनी खूप वेळ या by मोदक
जालावर आणि विकिवर hooded
धन्यवाद
In reply to जालावर आणि विकिवर hooded by इनिगोय
चान चान.. नवीनच माहिती मिळाली
धन्यवाद
In reply to चान चान.. नवीनच माहिती मिळाली by शैलेन्द्र
एकुण धागा तुम्ही काढलाय अन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
In reply to एकुण धागा तुम्ही काढलाय अन by स्पंदना
ते "र..र..रिप्लायचा" राहिलं
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. by मोदक
मोदका
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. by मोदक
कुपोषण आणी उपासमारी अशा भयंकर
जेव्हा एखादा चांगला विषय
अगदी सहमत.
In reply to जेव्हा एखादा चांगला विषय by दशानन
+१
In reply to अगदी सहमत. by इनिगोय
विचारांचे खिडक्या-दरवाजे उघडा
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
विचारांचे खिडक्या-दरवाजे उघडा. ज्ञानाची, चांगल्या कल्पनांची नवी नवी दालने आपोआप खुली होतील, नवी क्षितिजे खुणावू लागतील.श्रीयुत धन्या वाकडे (दवणे पाटील) यांच्या विचारमौक्तिकाच्या प्रतिक्षेत...दवणे असतील तर पाटील नाहीत नि
In reply to विचारांचे खिडक्या-दरवाजे उघडा by मोदक
ओ तुम्ही गपा हो..
In reply to दवणे असतील तर पाटील नाहीत नि by प्यारे१
र र रिप्लायचा
ये बात, यशोधनबुवा! असाच
In reply to र र रिप्लायचा by यशोधन वाळिंबे
कोई रोटी भी न दे सका
फार लांब कशाला जायचं आपल्याच
धन्स रे गणपा.
In reply to फार लांब कशाला जायचं आपल्याच by गणपा