Skip to main content

पंतांच्या सहनशीलतेचा झाला अंत

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 21/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी वाचली , डोळे भरून आले. नाकर्त्या राज्यकर्त्यांचा अन्याय सहन केला जाणार नाही. Angry NO दहशतवादी व्हा म्हणजे नक्की काय करायचे, हाच प्रश्न डोक्यात पिंगा घालायला लागला मागच्या आठवड्यात नवीन प्रेशर कुकर विकत घेतला आहे , त्याचा वापर फक्त शिधा रांधण्यासाठी करावा कि त्यातून अजून काही................ असा प्रश्न आला. इतके दिवस सहनशीलता , मार्दवता , विद्या विनयतेने शोभते ह्या ब्रीदाशी जागणारे आमचे सर आज एवढे कमालीचे आक्रमक का झाले, आज साहेब असते तर ...... ह्या विधानाचा चेपू वर निषेध न होता चेष्टा ,खिल्ली उडवण्यात आली. खर तर प्रसार माध्यमांना अश्या काही सनसनाटी बातम्यांची खरी गरज आहे, त्यांनी चार विचार जंत बोलवून ह्या बातमीवर एव्हाना चर्चा सुरु झाली असेल, जेवढा निषेध त्रीव तेवढे पंतांना राष्ट्रीयस्तरावरील राजकारणात प्रसिद्धी मिळणार. अचानक एका रात्रीत त्यांची छबी प्रसार माध्यमे त्यांना हवी तशी तयार करणार त्यात कुठे बिघडले , अडगळीत पडून राहण्यापेक्षा हे केव्हाही चांगले तुम्हाला काय वाटते.

वाचने 2173
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जर हे विधान एखाद्या मुस्लिम नेत्याने किंवा गेला बाजार संभाजी ब्रिगेड च्या नेत्याने केले असते तर इथे आतापर्यंत हाउसफुल चा बोर्ड लागला असता. बहुदा हे नेते 'पंत' असल्याने हे विधान पण देशप्रेमाच्या तळमळीतून आले आहे असे बहुतेकाना वाटण्याचा संभव आहे.

In reply to by पिंपातला उंदीर

तुमची प्रतिक्रिया आंधळ्या जातिद्वेषाच्या मळमळीतून आली आहे असे बहुतेकांना वाटण्याचा संभव आहे :-). माझ्या मते पंत हे भूतकाळात जमा झाले आहेत. त्यांनी काय वाट्टेल ते म्हटले तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. मूळात शिवसेनेलाच थोरल्या ठाकर्‍यांच्या निधनानंतर घरघर लागली आहे असे वाटते आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या एका कालबाह्य नेत्याच्या विधानाबद्दल गदारोळ उठला नाही तर फार तर्क लढवायची गरज नसावी! उलट सत्ताधारी लोकांकडे निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि तो अशा वादग्रस्त प्रकारे घेतला तर सामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो.