मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘भीमथडी जत्रा’ - काही प्रश्न

लई भारी · · काथ्याकूट
‘भीमथडी जत्रा’ हा बचत गटांना उभारी देणारा उपक्रम आहे यात शंकाच नाही. राज्याच्या सर्व भागातून आलेल्या बचत गटांचे स्टॉल बघून निश्चित बर वाटलं पण काही प्रश्न मात्र पडले. बचत गटांच्या बरोबरीने मोठ्या व्यावसायिकांना स्टॉल देण्यामागचे प्रयोजन काय? विशेषतः खाद्य जत्रेमध्ये. उदा. वेन्कीज, सुहाना, कुशन चेअर, आईस्क्रीम, मिनरल वॉटर कंपन्या, हुरडा इ. जालना, लातूर, हिंगोली, सोलापूर इ. ठिकाणच्या दुरून आलेल्या बचत गटाच्या प्रतिनिधींकडून चांगला अनुभव मिळाला आणि काही ठिकाणी छापील किमतीपेक्षाही कमी किमतीला उत्पादने मिळत होती. पण बऱ्याच स्टॉल वर अवाजवी किमती होत्या. त्यातही असे जाणवत होते की व्यावसायिक स्टॉल वर असे प्रकार जास्त होते(उदा. एक्वा रंग मिनरल वॉटर, एस.एस. फिश, हुरडा, साठे नाचणी लाडू). व्यावसायिकांच्या बरोबरीने जाहिरात/बॅनर लावणे बचत गटांना परवडणारे नाही. मग एकीकडे बचत गटांच्या सबलीकरणा बरोबर दुसरीकडे व्यावसायिकांची स्पर्धा का निर्माण केली जातेय? अशाने ‘बचत गटांना व्यासपीठ देणे’ ह्या उद्दिष्टाला हरताळ फासला जात नाही का? आता याला असा प्रतिवाद होऊ शकेल की बचत गटांच्या मानाने व्यावसायिकांचे स्टॉल कमी होते. पण जर दोघांची उलाढाल बघितली तर व्यावसायिकांची उलाढाल लक्षणीय होती.

वाचन 7633 प्रतिक्रिया 0