Skip to main content

आझाद मैदान ते बेनगाझी, लिबिया

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 13/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी असंख्य धर्मांध मुस्लिमांनी आझाद मैदानावर दंगल सुरु केली, नासधूस, विनयभंग, जाळपोळ, मारहाण वगैरे शांततापूर्ण कार्यक्रम झाले. नंतर त्याबद्दल योग्य ते कवित्वही व्यक्त झाले. ह्या सर्व कार्यक्रमचे स्फूर्तीस्थान काय? थोडक्यात सांगायचे तर (आसाम वा म्यानमार मे) इस्लाम खतरेमे अशी आरोळी कुण्या मुल्ला मौलवीने दिली आणि यथावकाश त्यातून हा विध्वंस स्फुरला. काल लिबियातील बेनगाझीमधे अमेरिकन राजदूताला हालहाल करुन ठार मारण्याचा हलाल कार्यक्रम झाला. (एकंदरीत वर्णनावरून हा राजदूत अत्यंत सौम्य स्वभावाचा, आपल्या कामात कुशल असावा असे वाटते तेव्हा त्याच्या विरुद्ध वैयक्तिक आकस नसावा.) राजदूताला दूतावासावर हल्ला करून ठार मारणे हे एक भयंकर कृत्य आहे. त्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. (अगदी आपल्या कराटे कुशल* कसाबसारखे बरे का !) तर आता काही शांतताप्रेमी लोकांनी असा हल्ला का केला? तर म्हणे अमेरिकेत कुठेतरी लॉस एंजेलिसमधे कुणीतरी एक इस्लामविरोधी फिल्म बनवली आणि ती यूट्युबवर प्रकाशित केली आणि ह्याचा राग व्यक्त करण्याकरता ह्या अमनपसंद लोकांनी हे कृत्य केले. आझाद मैदानातील वड्याचे तेल वांग्यावर ओतण्याची दीनदार पाककृती लिबियातही शिजली. एकंदरीत तमाम दुनियेने इस्लाम, त्याचे धर्मगुरू, त्याचे धर्मग्रंथ याविषयी एखाद्या कट्टर मुस्लिमा इतकेच काटेकोर, जागरुक असायला पाहिजे असा आग्रह तमाम इस्लामी जगताने धरला असावा असे वाटते आहे. एकंदरीत हे अरब स्प्रिंग प्रकरण हे तमाम गैर इस्लामी जगाला गैरसोयीचे ठरणार आहे असे दिसते आहे. जुलमी हुकुमशहा होते तेच बरे म्हणायची वेळ आली आहे. *http://zeenews.india.com/news/nation/ajmal-kasab-practises-karate-to-ki…

वाचने 7652
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

लिबीयात जे घडले ते वाईट होते. अमेरीकेने या प्रकरणातून धडा घेवून वहाबी साउदींची सोबत कुठवर करावी याबद्दल काहितरी शिकवण घ्यावी. अर्था हे होणे शक्य नाही कारण तसे केले तर त्यांचे तेलाचे मळे कोण राखेल.

In reply to by विजुभाऊ

मला नाही वाटत ह्या एका* अधिकार्‍याच्या मरणावर अमेरिका वहाबी सौदींची सोबत सोडेल. असे जर असते तर अफगाणिस्तानात असंख्य सैनिक मरायला टाकले नसते. *एकाने काय होते हो ? त्यासाठी "टा" वर पाडावा लागतो म्हणे !

@एकंदरीत तमाम दुनियेने इस्लाम, त्याचे धर्मगुरू, त्याचे धर्मग्रंथ याविषयी एखाद्या कट्टर मुस्लिमा इतकेच काटेकोर, जागरुक असायला पाहिजे असा आग्रह तमाम इस्लामी *जगताने धरला असावा असे वाटते आहे.>>>> धर्माज्ञा हो धर्माज्ञा...! *काय करतिल बिच्चारे...??? सगळे हमीद दलवाई थोडेच असतात.!

In reply to by शैलेन्द्र

हा हा हा. ११ ऑगस्टवरून इथे १-२ धागे पेटले होते... नुकतिच जाळपोळ झालेली असताना लगेच साधारण त्याच विषयावर पुन्हा पेटापेटी होईल असे वाटत नाही... असो. "या 'फोरम' वरचे मेजॉरिटी पब्लिक मानसिक रुग्ण आहे आणि जग हे या 'फोरम' पेक्षा जास्त चांगली जागा आहे "असले विचार बाळग्णारे आणि दुसर्‍याना असले सल्ले देणारे लोक इतर वेळी तावातावाने भांडताना इथे या असल्या गोष्टींचा साधा निषेधही करायला पुढे येत नाहित याची गंमत वाटते.

अमेरिकेने मरिन कमांडोज लिबियात धाडले आहेत. भारताचे राजदूत ठार झाले असते तर जगभरातून 'संयम' बाळगण्याच्या प्रतिक्रिया कशा आल्या असत्या ह्याचा विचार करून हसू येते.

In reply to by चिरोटा

भारत प्रकार तर्फे....... "झाल्या घटनेचा आम्ही कडक शब्दात निषेध व्यक्त करतो. ही आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली आहे.लिबिया प्रकारने दोषींवर कठोर कारवाई करुन दहशतवादाविरुद्ध लढ्यात भारताचे जागतिक स्तरावर सहयोग द्यावा. दहशतवाद ही जगात फोफवणारी विषवल्ली आहे. तिचा समुळ नायनाट करण्यात भारत कटिबद्ध आहे. काही नेते "साखरे "यांचे पुर्वज बलिया-बिहार-लिबिया (योगायोग बघा) असे गेले.झाल्या घटनेला मुळात हेच लोक जबाबदार आहेत.

In reply to by इरसाल

एखाद्या ,मराठी संपादकीयात- हल्ल्याला हल्ला हे उत्तर नव्हे. दहशतवादा संपूर्ण बिमोड करायचा तर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. नुसत्या हल्ल्याने काय साधेल? फार तर चार दहशतवादी मरतील पण त्याच मातीतून चारशे तयार होतील त्याचे काय?

जागतिक राजकारणावर / अमेरिकेच्या राष्ट्र-परराष्ट्र संबंधांवर ह्याचा परिणाम कदाचित लगेच दिसो / नं दिसो.. ओबामा पोळी भाजून घेतील नक्की. (इथे तर आझाद हिंद मैदानासारख्या छोट्या चुलीवर इतक्या पोळ्या भाजल्या गेल्या, तिथे तर अजून मोठ्ठं मैदान आहे)

तामिळनाडूतही श्रीलंकन फुटबॉलपटूंवर हल्ला झाला म्हणे!

In reply to by ऋषिकेश

तामिळनाडूतही श्रीलंकन फुटबॉलपटूंवर हल्ला झाला म्हणे! ही बातमी माहीत नव्हती कारण त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नसावी अथवा माझ्या नजरेतून सुटली... एनीवे, आत्ता बरेच शोधल्यावरून जे काही लक्षात आले ते असे की एलटीटीईच्या बाजूने असलेल्या भारतीय तामिळींना श्रीलंकन आजही शत्रू वाटत आहेत. त्यामुळे या मैत्रिपूर्ण खेळासाठी आलेल्या खेळाडूंना जयललीता यांनी परत जाण्यास सांगितले. आता एका राज्याची मुख्यमंत्री असलेली व्यक्ती ही परदेशसंबधात कसे निर्णय घेऊ शकते आणि केंद्र सरकार कसे गप्प बसते हे काही समजले नाही... :( मात्र, तरी देखील यात आणि वरील बातमीतील हल्ले हे समान आहेत असे वाटत नाही. धर्माच्या नावावरचे तर नाहीतच नाही. त्यामुळे ही तुलना अ‍ॅपल टू ऑरेंज वाटली आणि त्यातून उगाच वरील हल्ल्यांचे डायल्यूशन केले गेले असे वाटले.

In reply to by विकास

या मैत्रिपूर्ण खेळासाठी आलेल्या खेळाडूंना जयललीता यांनी परत जाण्यास सांगितले. आता एका राज्याची मुख्यमंत्री असलेली व्यक्ती ही परदेशसंबधात कसे निर्णय घेऊ शकते आणि केंद्र सरकार कसे गप्प बसते हे काही समजले नाही...
गेल्या आठवड्यात राज ठाकरे ह्यांनी मुलाखतीत हाच प्रश्न उपस्थित केला होता. मुलाखतकाराने लगेच विषय बदलला.!!

आसाम, मुंबई घटना या पाकिस्तान नामक शत्रुराष्ट्राने भारतातल्या इमानदान (लाच वगैरे घेऊन इमानदारीने घुसखोरी करु देणारे ) संरक्षण दले व जनतेचे पालक राजकारणी यांच्या मदतीने घडवुन आणलेले शडयंत्र होत्या, तर लिबीया वगैरे घटना अमेरीकेने हात दाखवुन अवलक्षण केल्याचा परिपाक... या दोन्ही घटनांचा संबंध काय? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

काही साम्यस्थळे १. कुणीतरी इस्लामविरोधी काहीतरी केले त्याचा राग दुसर्‍या कुठल्यातरी व्यक्तीवर वा जागेवर काढणे. अमेरिकन राजदूताला त्या आक्षेपार्ह फिल्मबद्दल, विनयभंग झालेल्या महिला पोलिसाना म्यानमारमधील मुस्लिमांबद्दल अवाक्षर माहित नव्हते. पण त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. २. दोन्ही ठिकाणी मुस्लिम समुदायानेच नियोजनपूर्वक ही दुष्कृत्ये घडवून आणली. दोन्ही ठिकाणी धार्मिक नेत्यांनी डोकी भडकवण्याचे काम केले. व्यवस्थित नियोजन नसते तर हा विध्वंस यशस्वी झाला नसता. कुणी एक डोकेफिरु माणूस उठला आणि त्याने हाणामारी केली असे झाले नाही. हजारो लोकांचा जाणीवपूर्वक सहभाग होता. मला वाटते एवढी साम्ये पुरेशी आहेत. रेडी टु थिंक हे विधान सहीपुरते नसावे अशी अपेक्षा.

In reply to by हुप्प्या

>>१. कुणीतरी इस्लामविरोधी काहीतरी केले त्याचा राग दुसर्‍या कुठल्यातरी व्यक्तीवर वा जागेवर काढणे. -- असं इस्लामेतर ठिकाणी होत नाहि असं म्हणताय कि काय? >>अमेरिकन राजदूताला त्या आक्षेपार्ह फिल्मबद्दल, विनयभंग झालेल्या महिला पोलिसाना म्यानमारमधील मुस्लिमांबद्दल अवाक्षर माहित नव्हते. पण त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. -- लिबीयन जनता जे काहि भोगते आहे त्याचा राग त्यांनी अमेरीकेत जाऊन काढावा असं सुचवताय का? मुंबईत दंगलीचं मोठं षडयंत्र होतं असं तपासकर्त्यांचा रिपोर्ट आहे. मुंबईत मुस्लीमांनी आपला राग व्यक्त नाहि केला... त्यांनी दंगलेचीच तयारी केली होती. २. दोन्ही ठिकाणी मुस्लिम समुदायानेच नियोजनपूर्वक ही दुष्कृत्ये घडवून आणली. दोन्ही ठिकाणी धार्मिक नेत्यांनी डोकी भडकवण्याचे काम केले. व्यवस्थित नियोजन नसते तर हा विध्वंस यशस्वी झाला नसता. कुणी एक डोकेफिरु माणूस उठला आणि त्याने हाणामारी केली असे झाले नाही. हजारो लोकांचा जाणीवपूर्वक सहभाग होता. -- परत तेच. मुंबईत कांड डोके भडकवण्याच्या नादातुन झालेले नाहि. ते मुस्लीम समुदायाचे कृत्य नव्हते... दारापर्यंत आलेल्या भावी युद्धाची युद्धाची ति नांदी होती. भारताच्या शत्रुने भारताच्या अंगणात येऊन केलेलं शिरकाण आणि अमेरिकेने लावलेल्या आगीत त्यांचे स्वतःचे हात पोळणे या भिन्न गोष्टी आहेत. >>रेडी टु थिंक हे विधान सहीपुरते नसावे अशी अपेक्षा. -- आम्हि जेव्हढ्यास तेव्हढं द्यायचं बघतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अमेरिकेच्या कुठल्याही वकिलातीत कुणी उपटसुंभ शिरतो आणि थेट राजदूताला मारतो इतके हे उत्स्फूर्त झालेले नाही. एक तर अमेरिकन वकिलातीभोवती जबरदस्त संरक्षक कवच असते. अगदी मुंबईची कॉन्सुलेट बघितलीत तरी हे लक्षात येईल. तेव्हा ती भेदून थेट आत प्रवेश करणे हे थंड डोक्याने नियोजन करुनच शक्य आहे. मोठ्या समूहाने विचार करुन ते ठरवले आहे. अल काईदा उच्चरवाने सांगत आहे की आम्हीच हे घडवून आणलेत कारण द्रोण हल्ल्यात आमच्या नेत्याला अमेरिकेने ठार केले. हा तात्पुरत्या उन्मादातून घडलेला प्रकार नाही हेच हळूहळू उघडकीस येत आहे. तेव्हा आझाद मैदानाशी साम्य आहे.

In reply to by हुप्प्या

तुम्ही वर दिलेल्या साम्यस्थळांच्या यादीत ते बसत नाहि. हा तात्पुरत्या उन्मादाचा , भडकाऊ वक्त्व्यांचा, एकाचा राग दुसर्‍या ठीकाणी काढण्याचा बालीश प्रकार नाहि. लिबीया अमेरीकेला त्यांच्याच शब्दात उत्तर देते आहे, तर पाकिस्तान भारतासमोर प्रश्न निर्माण करतो आहे... हा मूलभूत फरक. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आसाम, मुंबई घटना या पाकिस्तान नामक शत्रुराष्ट्राने भारतातल्या इमानदान (लाच वगैरे घेऊन इमानदारीने घुसखोरी करु देणारे ) संरक्षण दले व जनतेचे पालक राजकारणी यांच्या मदतीने घडवुन आणलेले शडयंत्र होत्या, अंशतः सहमत. जे काही आसाम मध्ये झाले त्या संदर्भात आपण तसे म्हणू शकाल कदाचीत. पण त्याचा परीणाम म्हणून जे मुंबईत झाले त्याचा आणि अमेरीकन दुतावासावरील हल्ल्यात दुर्दैवाने साम्य नक्कीच दिसते असे वाटते... तर लिबीया वगैरे घटना अमेरीकेने हात दाखवुन अवलक्षण केल्याचा परिपाक... अमेरीकेच्या अनेक निर्णयाशी वगैरे असहमती दाखवता येईल. मला पण सगळे पटते असे म्हणणार नाही. पण त्यांच्यातले स्वातंत्र्य हे सर्वांना समान लाभते इतके नक्की म्हणेन. त्या स्वातंत्र्याचा केला जाणारा उपयोग पटोत अथवा न पटोत, पण येथे किमान (दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचा) आदर असावा अशी अपेक्षा असते. इस्लामवरील चित्रपट मी पाहीलेला नाही आणि त्यात नक्की काय वाईट आहे याची कल्पना नाही. जे काही असेल ते योग्य असेल असे माझे देखील म्हणणे नाही पण ते अमेरीकन स्वातंत्र्याचा भाग आहे. तेच स्वातंत्र्य येथील बहुसंख्यांच्या धर्मातील (ख्रिश्चन) श्रद्धांचा पण विनोद करायला वापरलेले पाहीले आहे. तेच हिंदू धर्मियांच्या बाबतीत देखील. त्यावर त्या त्या धर्मातील लोकांनी विरोध देखील केलेला पाहीला आहे पण संयम बाळगून. तो करायचा हक्क देखील हे स्वातंत्र्य देते पण त्यात कोणी हिंसा केलेली नाही. थोडक्यात या संदर्भात हात दाखवून अवलक्षण म्हणणे योग्य ठरेल असे वाटत नाही.

In reply to by विकास

मुंबई घटनेला आसामचे केवळ निमीत्त झाले . आसाम घटनेचा परिणाम म्हणुन मुंबई घटनेकेडे बघु नये. शत्रुने भावी घटनांचे ट्रेलर दाखवले आहे फक्त. "भडकाऊ भाषणाने उन्मादात आलेल्या माथेफिरुंचे कांड" हि मुंबई घटनेची खरी ओळख नाहि, किंबहुना ते तसं नाहिच मुळी. लिबीयाचे संदर्भ फार वेगळे आहेत. यादवीने पोळुन निघालेला , निर्नायकी, निकट भविष्यात शांती-प्रगतेची कुठलीच आशा नसलेला, गडाफीने पसरवलेल्या अमेरीका द्वेषाचे बाळकडु पिलेला, संपूर्ण मध्यपूर्व भडकवुन अशांतीच्या राजकारणाचा व्हिक्टीम लिबीया... त्याच्याकडुन व्यक्तीस्वातंत्र्य, अहिंसक आंदोलनं वगैरेंची अपेक्षा तरी कशी करावी ? मुंबई घटना थंड डोक्याने आखलेल्या लांब पल्ल्याच्या युद्धातील एक चाल आहे तर लिबीया अगोदरच पेटलेल्या प्रचंड आगडोंबाची एक ज्वाला जरा इकडे तिकडे झाल्याचा परिपाक आहे. मूलभूत फरक आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

धन्यवाद. "भडकाऊ भाषणाने उन्मादात आलेल्या माथेफिरुंचे कांड" हि मुंबई घटनेची खरी ओळख नाहि, आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजले आणि पटले. :-) लिबीयाचे संदर्भ फार वेगळे आहेत.... बरोबर आहे. पण हल्ल्याचे कारण अजून समजायचे आहे. हा हल्ला ९/११ च्या दिवशी झाला आहे. जरी अमेरीकन सरकार त्याच्याशी काही संबध नाही असे सुरवातीस म्हणाले असले तरी आता त्यांना विचार करायला लागत आहे,

अमेरीकेने आज पर्यंत जे पेरले तेच उगवत आहे.धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं अशी आता ओबामा मास्तरांची हालत झाली आहे.

ह्या प्रकरणांच्या निमित्ताने एक प्रश्न पुढे येतो आहे. जगात कुठल्यातरी कोपर्यात कुणी व्यंगचित्र काढतो, कुणी सिनेमा काढतो, कुणी पुस्तक लिहितो. त्यात काही धार्मिक इस्लामी लोकांच्या मते आक्षेपार्ह गोष्टी असतात. इन्टरनेट व अन्य आधुनिक यंत्रणांमुळे अशा गोष्टी क्षणार्धात जगभर प्रसिद्ध होऊ शकतात. मग त्याचा राग संबंधित व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या देशावर वा धर्मावर काढला जातो. ह्या कागदावरच्या विचाराची प्रतिक्रिया म्हणून खरोखरची हिंसा होऊन जीव, मालमत्ता नष्ट होतात. इथे नक्की कुणाची चूक आहे? डोके फिरवून घेणार्‍या मुस्लिमांची का अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे अशा आक्षेपार्ह गोष्टींना बंदी न घालू शकणार्‍या पाश्चिमात्य देशांची? बाकी काही लिहा पण मुस्लिम धर्माविरुद्ध लिहू नका अशा स्वरुपाचा कायदा तमाम पाश्चिमात्य राष्ट्रानी अमलात आणावा अशी काही अपेक्षा आहे का? हे तर मान्य करावेच लागेल की ह्या बाबतीत इस्लाम हा धर्मच आघाडीवर आहे. मागे हिंदू देवतांविरुद्ध अशी काही आक्षेपार्ह उत्पादने अमेरिकेत आणली होती तेव्हा सगळा निषेध हा कागदोपत्री होता. कुठे जाळपोळ वा अन्य कार्यक्रम झाले नाहीत. ख्रिश्चन धर्माची टिंगल अनेकदा झाली आहे, होते आहे पण कुणी ह्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवलेला नाही. हे असेच होत राहिले तर विघ्नसंतोषी लोकांना हे एक आयतेच हत्यार मिळेल. काढा महंमदाचे चित्र, करा इस्लामची टिंगल आणि मग बघा गंमत. आणि बर्‍याचदा मुल्ला मौलवी अशा कुरापतींविषयी बोलताना एकाचे दहा करून सांगतात. डेन्मार्कमधे जे व्यंगचित्र प्रकाशित झाले त्यापेक्षा कैक पटीने गलिच्छ चित्रे ह्या आगलाव्या लोकांनी काढली, त्या डॅनिश चित्रकाराची म्हणून खपवली आणि लोकांची टाळकी भडकवली.

In reply to by हुप्प्या

बाकी ठिक..
हे तर मान्य करावेच लागेल की ह्या बाबतीत इस्लाम हा धर्मच आघाडीवर आहे.
अमान्य! यात इतर धर्मही मागे नसावेत. पटकन आठवायचे जेम्स लेन घ्या , किंवा अगदीच धार्मिक उदाहरण घ्यायचे तर हल्ली झालेले कालीमातेचे प्रकरण घ्या हिंदूंनीही जाळपोळ केलीच आहे. मागे भुतानमध्ये नेपाळींनी केलेला दंगा, तिबेटमधले स्वतःला जाळून घेणे, डा विंची कोडनंतर केरळमधली हिंसक प्रदर्शने.. कोणताही धर्म मागे नाही याचे कारण यामागे कोणताही धर्म नसून रिकाम्या डोक्यांचा चतुर धार्मिक/राजकीय नेत्यांनी केलेला (गैर)वापर आहे. मागे कोणीतरी म्हटल्यासारखे ही तथाकथित (मुसलमान/हिंदू/ख्रिश्चन/बौद्ध/मराठी/गुजराती/बिहारी/ आशियायी/ अमेरिकन /संकेतस्थळे ;) अश्या कोणत्याही पण अश्या सार्‍याच) अस्मितांची गळवे इतकी नाजूक झाली आहेत की लहानश्या धक्क्याने फुटु लागली आहेत.

In reply to by ऋषिकेश

असे पुरोगामी आवेशाने इस्लामच्या समर्थनार्थ आपण धावणार हे अपेक्षित होतेच. पण जरा निरपेक्षपणे विचार करु या का? गेल्या दहा वर्षात खर्‍या खोट्या धर्माच्या अपमानाकरता किती हिं सा झाली ते जरा पाहू. प्रथम काही खुलासे. जेम्स लेन विरुद्ध झालेले प्रकरण हिंदुंचा अपमान ह्या नावाखाली झाले का? आजिबात नाही. तेव्हा ते प्रकरण वगळा. कालीमातेचे प्रकरण कुठले ते मला माहित नाही. जरा सविस्तर सांगा. आता आपण इस्लामकडे वळू. २००५ मधे डॅनिश कार्टुनिस्ट ने काही कार्टून काढली. जगभर मुस्लिम खवळले. जोरदार हिंसा. जगभर. नुसत्या डेन्मार्कमधे नाही. १०० लोक मेले. २००४ थेओ व्हॅन गोग ह्या डच दिग्दर्शकाने मुस्लिमांना खटकणारी डॉक्युमेंटरी काढली. एका हॉलंडस्थित मोरक्कन माणसाने क्रूरपणे त्या माणसाला ठार केले. कुठलाही पश्चाताप नाही. २०१२ अफगानिस्तानात कुराणाचा अपमान झाला म्हणून दंगली. साधारण ३० लोक मेले. १९८८ सलमान रश्दीने सॅटॅनिक व्हर्सेस लिहिले म्हणून त्याविरुद्ध मृत्युदंडाचा फतवा. संरक्षण असल्यामुळे तो वाचला पण ह्या प्रकरणाशी संबंधित हिंसेत निदान ३० लोक मेले आहेत. आता एक जरा जुने प्रकरण, १९२७ साली रंगीला रसूल या नावाचे एक पुस्तक एका हिंदूने लिहिले. त्यात महंमदाविषयी बदनामी असल्याचा समज करुन एका इल्म उद्दीन नामक इसमाने त्याचा लाहोरमधे दिवसाढवळ्या खून केला. त्याबद्दल इंग्रजांनी त्याला फाशी दिला. पण आज तो पाकिस्तानात एक मोठा सत्पुरुष समजला जातो. लाहोरात त्याच्या नावाचा उरुस साजरा होतो. पण फार जुने म्हणून हे विसरू या. साधारण अशा प्रकारची हिंदूंची, शिखांची, ख्रिस्ती वा यहुदी लोकांची कृत्ये दाखवून दिलीत तर आपल्या बोलण्याला वजन लाभेल. म्हणजे मूळ कृत्यात निव्वळ कुठल्यातरी प्रकारची अभिव्यक्ती होती, पुस्तक, सिनेमा, नाटक, संगीत वगैरे. त्यात कुणाची हिंसा, विध्वंस नव्हता. मात्र प्रतिक्रिया हिंसक, जीवघेणी, विध्वंसक होती. साधारण २० - ३० वर्षातील अशा प्रकरणांचा तौलनिक आढावा घेऊ आणि मग ठरवू सर्व धर्म सारखे का काय ते, कसे?

In reply to by हुप्प्या

१. मी इस्लामच्या 'समर्थनार्थ' धावलो आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. २. हिंसा किती याला फारसे मोजमाप नाही हिंसा ही हिंसाच असते. १०० लोक मेले तरच त्याकडे लक्ष द्यावे आणि चार-आठ रिकाम्या बसेस जाळल्या म्हणजे ते कमी समजावे हे मी अयोग्य समजतो
साधारण अशा प्रकारची हिंदूंची, शिखांची, ख्रिस्ती वा यहुदी लोकांची कृत्ये दाखवून दिलीत तर आपल्या बोलण्याला वजन लाभेल.
ओक्के.. "साधारण अशा प्रकारची " ला अर्थ नाही मात्र अभिव्यक्तीनंतर उमटलेल्या हिंसक प्रतिक्रीया दाखवून देऊ शकतो. माझा मुळ मुद्द इतकाच होता की ही तथाकथित अस्मिता आणि तिला धक्का पोचणे किती पोकळ आहे (अगदी मुसलमानांचे देखील) पण तो न कळता माझे म्हणणे कसे इस्लामच्या समर्थनार्थ आहे आणि मी कसा इतर (थोर्थोर) धर्मांच्या विरुद्ध आहे अशी अधिकची ओरड होऊ नये सध्या दोनेक उदाहरणे देतो (खरं त्याचीही गरज नाही पण असो.): हिंदू: ए.एफ. हुसैन यांनी चित्रे काढली आणि त्याची हिंसक प्रतिक्रीया अख्ख्या देश भर उमटली. अर्थातच मुळ चित्रे ही निव्वळ अभिव्यक्ती होती, प्रतिक्रीया हिंसक होती. ख्रिश्चनः तुम्हाला नॅशनल लिबरेशन फ्रन्ट त्रिपुरा माहित असेलच (नसेल तर ही एक ख्रिश्चन नक्षलवादी संघटना आहे) त्यांनी केवळ लोकांनी दुर्गेची आरती गायली म्हणून लोकांना यमसदनाला पाठवले आहे, भारतीय अधिकार्‍यांना जेरबंद केले आहे, अपहरण केले आहे. गेल्या पाच वर्षात ८०० हून अधिक हिंसक घटना घडल्या आहेत. याची सुरवात दुर्गेची आरती गाण्यावरून झाली. "डा विंची कोड"नंतर केरळमध्ये उमटलेली हिंसक प्रतिक्रीया बाकी जेम्सलेन प्रकरण, कुमार केतकरांवरील हल्ला देखील केवळ अभिव्यक्ती विरोधातील हिंसक प्रतिक्रीया या सदरात मोडते (जरी धार्मिआधिष्टीत मुद्दा नसला तॠ माझ्या मुद्द्यास पुरक आहे) हाफीसात लिमिटेड अ‍ॅक्सेस असल्याने फार खोदकाम शक्य नाही असो. माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट आहे. उगाच एका धर्माला वेगळे करून झोडपण्यात (मग तो कोणताही असो) फारसे हशील दिसत नाही. मुद्दा कळला नसल्यास / असल्यासही यावर माझ्याकडून इती लेखनसीमा

In reply to by ऋषिकेश

मुळात आपले गृहितकच आहे की हिंसेच्या बाबतीत सर्व धर्म सारखेच. त्यामुळे त्यावरील आकडेवारी वगैरे आपण विचारात घेणारच नाही हे उघड आहे. तसेही आपण वादातून सोयिस्कररित्या पळ काढून शरणचिठ्ठी लिहून दिलीतच. १. एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध संघटित, जगभर, हिंसक प्रतिक्रिया देणे ही मुस्लिम जगाचीच खासियत आहे. तसे बाकी धर्मात होत नाही. ह्याचे खंडन करणारी उदाहरणे देता आली तर बघा. २. आपण दिलेल्या आकडेवारीत इस्लाम विरुद्ध ऊर्वरित जग असा सामना चालू आहे असे वाटते. तरीही इस्लामचेच पारडे जड आहे हे उघड दिसते आहे. आपण कुठलीही आकडेवारी दिलेली नाहीत. नुसतेच थातूरमातूर पाच वर्षे चालू आहे, हिंसा झाली आहे वगैरे उल्लेख. ३. आधुनिक जगात केवळ इस्लामी देशात कुराण वा इस्लामी प्रतिकांचा अपमान झाल्यास मृत्युदंड दिला जातो. भारतात राम कृष्ण वा सीतेविरुध्द बोलल्यास मृत्युदंड नाही. कुठल्या ख्रिस्ती राष्ट्रात असा कायदा नाही. बौद्ध वा यहुदी देशात असा कायदा नाही असा माझा समज आहे. आपली माहिती वेगळी असल्यास सांगा. जर त्या धर्मावर आधारित कायदाच असा अभिव्यक्तीविरुद्ध वागत असेल तर त्या धर्माची मंडळीही तसेच करणार त्यात आश्चर्य ते काय?

In reply to by हुप्प्या

एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध संघटित, जगभर, हिंसक प्रतिक्रिया देणे ही मुस्लिम जगाचीच खासियत आहे. असेल बुवा.. पण जर तुम्ही इनोसन्स ऑफ मुस्लिम्स ला अभिव्यक्ती वगैरे म्हणत असाल तर कठीण आहे, कारण त्या न्यायाने अनिता पाटील विचारमन्च ( http://www.misalpav.com/node/22760) ला पण तुम्हाला अभिव्यक्ती म्हणावे लागेल... ;-) बाय द वे, इनोसन्स ऑफ मुस्लिम्स तुम्ही पाहीलाय का...? --सुहास

माहितीपूर्ण आणि अभ्यासू धागा.
काल लिबियातील बेनगाझीमधे अमेरिकन राजदूताला हालहाल करुन ठार मारण्याचा हलाल कार्यक्रम झाला. (एकंदरीत वर्णनावरून हा राजदूत अत्यंत सौम्य स्वभावाचा, आपल्या कामात कुशल असावा असे वाटते तेव्हा त्याच्या विरुद्ध वैयक्तिक आकस नसावा.) राजदूताला दूतावासावर हल्ला करून ठार मारणे हे एक भयंकर कृत्य आहे. त्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. (अगदी आपल्या कराटे कुशल* कसाबसारखे बरे का !) तर आता काही शांतताप्रेमी लोकांनी असा हल्ला का केला? तर म्हणे अमेरिकेत कुठेतरी लॉस एंजेलिसमधे कुणीतरी एक इस्लामविरोधी फिल्म बनवली आणि ती यूट्युबवर प्रकाशित केली आणि ह्याचा राग व्यक्त करण्याकरता ह्या अमनपसंद लोकांनी हे कृत्य केले. आझाद मैदानातील वड्याचे तेल वांग्यावर ओतण्याची दीनदार पाककृती लिबियातही शिजली.
वाक्यावाक्यातून घटनेचा केलेला चौफेर अभ्यास जाणवत आहे. अत्यंत खोलवरती, मुळापर्यंत जाऊन केलेले घटनेचे संगोपांग विशेषण आवडले.

ती अक्षेपार्ह चित्रफीत अमेरिकेत बनवली गेली आणि त्याचे पडसाद मध्यपूर्वेत उमटले , ३ अमेरिकन लोकांचे जीव गेले, भारतात चित्रफीतीवर बंदी आली. ...ओक्के पण या सिमेनाप्रदर्शनाआधी पाकिस्तानातल्या एका मुस्लीम धर्मगुरूने स्वतःच पवित्र ग्रंथाची काही पाने फाडून एका कचरा उचलणार्‍या अल्पवयीन मुलीच्या पोत्यात टाकली ( का ती जाळत असलेल्या कागदांत नंतर जाउन पवित्र ग्रंथाची पानं स्वतः फाडून अर्धवट जाळून अ‍ॅड केली ) . त्या धर्मगुरूबरोबर काम करणार्‍या त्याच्या २ सहकार्‍यांनीच अशी साक्ष दिली आहे. पण ह्या घटनेचे पडसाद, याबद्दलचा राग, पाकिस्तानी लोकांना मारहाण ( होउच नये, मी हिंसेच्या विरोधात आहे ), पाकिस्तानी वकिलाती समोर मध्य-पूर्वेत निदर्शनं, पाकिस्तानी झेंड्यांचे ज्वलन असं काहीच ऐकण्यात नाही. खुद्द पाकिस्तान मधेही या धर्मगुरू बद्दल त्याच्या गावांत राग वगैरे व्यक्त झाल्याचं ऐकीवात नाही, उलट ती मुलगीच कोर्टानं सोडून सुद्धा अज्ञातवासात आहे गेला बाजार खोट्या नाट्या फोटोंवरून गेल्या महिन्यात आपला राग व्यक्त केलेल्या हजारो लोकांपैकी काहींनी तरी आझाद मैदानावर एखादा शांततापूर्ण मोर्चा आयोजित करायला हवा होता, नाही का?

आता येमेन मधेही याची प्रतिक्रिया उमटली आहे,तिथल्या अमेरिकन वकिलातीच्या आवारात प्रवेश करून लोकांनी तेथील वाहने जाळली. ‘इनोसन्स ऑफ मुस्लीम‘’ या चित्रपटाची निर्मिती करणारा नाकुला बॅसिलेला सध्या भूमिगत व्हावे लागले आहे. अधिक माहितीसाठी हा दुवा:--- http://en.wikipedia.org/wiki/Innocence_of_Muslims

In reply to by परिकथेतील राजकुमार

चान चान... जगभर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असणारे कसे एकवटलेले आहेत बघ जरा ! ;) याला म्हणतात धार्मीक एकता ! जी हिंदूंमधे आहे ?

मुस्लिमांच्या सर्व समस्या शरियत चे तंतोतंत पालन करुनच सुटतील.त्यासाठी भारत सरकारने अर्धवट तरतूद केली आहे. घटनेने दिवाणी कायदाच इस्लामी ठेवला आहे. जर फौजदारी कायदा मुस्लिमांसाठी शरियतप्रमाणे ठेवला तर पुर्ण धर्म पालन होईल. संसदेने घटना दुरुस्ती करुन समस्त मुस्लिमांचा दुआ घ्यावा.