मला पडलेले काही प्रश्न
फार दिवसापासून काही प्रश्न पडलेत बुवा. काही वर्षापूर्वी मिळालेली उत्तरं पुरेशी वाटेनात; आता पुन्हा नव्या दमाच्या गड्यांसमोर, काही जुन्याजाणत्यांसमोर सादर करतोय.
.
१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
१०)कोर्या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्या खुर्या भूतकाळाशी निगडित?
.
तुम्हालाही असे अचाट प्रश्न असतील तर अवश्य मांडा. मिपाची ब्यांडविड्थ फुल्ल टू वापरुन घेउया.
प्रश्न नसतील पण उत्तरं असतील तर तीही अवश्य द्या. ह्याला सुटेबलासतील तर अतृप्त आत्म्याच्या ष्टायलित स्मायल्याही द्या.
.
--मनोबा
वाचन
5689
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
ढकलपत्रावरून साभार... हे
In reply to ढकलपत्रावरून साभार... हे by राजो
सारेच ढकलपत्रातील नाहित
मस्त्च
उत्तरे
माझाही एक प्रश्न
In reply to माझाही एक प्रश्न by पुण्याचे वटवाघूळ
हे सगळं एकदम एकाच व्यक्तीला
In reply to हे सगळं एकदम एकाच व्यक्तीला by इनिगोय
पोळी ज्याने शोधली त्याने शोधू
तोपर्यंत टेल मी व्हाय वाचत बस
१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे
आमचे प्रश्न नंतर वि४रु
काहि उत्तरं ...
असीम त्रिवेदी या
(No subject)
झोपेत मेलेल्या माणसाला आपण
दारु खराब गोष्ट आहे एवढे लोक
In reply to दारु खराब गोष्ट आहे एवढे लोक by आशु जोग
ह्म्म्म्म
In reply to दारु खराब गोष्ट आहे एवढे लोक by आशु जोग
द्विरुक्ती
In reply to द्विरुक्ती by सोत्रि
दारु खराब आहेच ज्येष्ठ
मला एकाच प्रश्नाच उत्तर माहिती आहे.
१४)पक्षी
झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
हा हा हा ह्या.......