प्रेरणा स्त्रोत : http://misalpav.com/node/22376
राम राम मंडळी
अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं.
कुठल्या तरी लिंका असतात.
काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात,
काही मजेशीर असतात.
काही गंभीर असतात.
अशीच एक लिंक नुकतीच मिळाली.
त्यात तुमचा दिवस उत्तम जाण्यासाठी काय करावे ही माहिती होती.
त्यात इसबगुल चांगले की कायम चूर्ण या विषयी सल्ले होते.
तसेच वेगवेगळ्या रेचकांसंबन्धी रोचक अशी काही माहिती त्यात दिली आहे.
मिपावर अनेक सदस्य रेचक विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे.( इनो आणि त्याचा स्टॉक याबद्दल तर हमखास)
तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे.
या यादीत पेरु ,पपई . चिंच , टॉमॅटो ,चेरी , सफरचंदाचा रस ,जर्दाळू ,चिकोरी , आंबा , चिंगम ,द्राक्षे , बदाम, संत्री , खजूर, आमटी ( कढी?) , चहा या सर्वांचाच उल्लेख रेचक म्हणून केला आहे . यातच पाम ट्री( नारळाचे झाड?) याचाही उल्लेख रेचक म्हणून केलेला आहे. ( नारळाच्या झाडाचा रेचक म्हणून कसा वापर करायचा ते कोणाला ठौक आहे का? त्याचे काही पथ्य आहे का?
(एकोळी धागा समजून रेचकीय कारवाई होऊ नये म्हणून दोन चार ओळी सुद्धा टंकल्या आहेत )
वाचने
3753
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजुभो................
अत्यंत रेचक आपलं, रोचक
नारळाच्या झाडाचा रेचक म्हणून
नारळाच्या झाडाला कल्पव्रुक्ष
सध्या
अरेरे.इतक्या जिव्हाळ्याच्या
रेचक म्हणिजे काय, मज निरोपावे.
एक फणसाची गोष्ट आठवली.
ओ विजुभाऊ
हे नाना चेंगट आता का लिहित