Skip to main content

फेसबुकवर ज्ञानाचं थिल्लरीकरण!

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 27/06/2012 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकवरची संस्कृती ही स्वार्थी , क्षणभंगुर आणि चंगळवादी आहे. कुठलेही गंभीर प्रश्न इथे हाताळले जात नाहीत. इथल्या सुमारे ९८ टक्के लोकांना चांगलं वाचावं , संगीताचा आस्वाद घ्यावा , चर्चा करावी असे वाटत नाही. इथे ज्ञानाचं थिल्लरीकरण चालतं , अशा शब्दांत प्रख्यात आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी फेसबुक संस्कृतीवर टीका केली आहे. अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14420186.cms १) वरील आक्षेप तसेच सदर लेखात आलेले मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? असल्यास तुम्ही काय उपाय सुचवता? नसल्यास का नाही? २) वरील सर्व आक्षेपवजा मुद्दे मिपा अथवा तत्सम संकेतस्थळाला लागु पडतात का? असल्यास उपाय काय? नसल्यास का नाही? ढिसक्लेमर - माझे फेसबुकावर अकाउंट नाही. मिपावर आहे. माझे या संबंधी मत प्रतिसादातुन मांडण्याचा प्रयत्न करेन.

वाचने 14396
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

फेसबुक काय, मिपा काय आणि इतर तत्सम संकेतस्थळं काय, अति केलं तर वेळेचा दुरुपयोग आहे. (जर ते ध्येयाचा भाग नसेल तर) अधाशी उदय आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्याशी एकदम सहमत. फेसबुक फक्त मैत्री स्विकारण्या पुरताच वापरतो. कधी कोणाची भिंत रंगविली नाही की कधी कोणाला लाईक केलं नाही. पण एखादा जुना दूर असलेला मित्र आपल्या बाळाचे फोटो फेसबुकवर बघायला सांगतो तेंव्हा जातो बघायला. मिपावर तासन तास पडीक राहणही तितकंच चुकीचं. मी मिपावर येतो ते मायमराठीच्या प्रेमामुळे आणि कधी एखादा ज्ञानाचा तुकडा, कधी पाकृ, कधी भटकंती तर कधी कधी अतिशय निरर्थक धाग्यातूनपण स्मितहास्य घेऊन जाण्यासाठी. मिपा मला जास्त "लाईव्ह" वाटतं त्यामुळे इथे जास्त रमतो. मिपाला एक ठराविक वेळ देण्याचं ठरवतो खरा, पण बर्‍याच वेळा अधिक वेळ देऊनच बंद करतो.

सर्व समाजातच थिल्लरपणा आलाय त्याचंच प्रतिबिंब फेबुवर दुसरं काय !

मिपावर अध्यात्माच चिल्लरीकरण नाही का होत?

नानाभाऊ … तुम्ही एखाद्या गोष्टीकडे ज्या नजरेने पाहता, ती गोष्ट तुम्हाला तशीच दिस्ते…