Skip to main content

शैक्षणिक कर्जाविषयी एक अनुभव

लेखक जोयबोय यांनी शुक्रवार, 08/06/2012 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी इंजिनीअरींग प्रवेश घेतानची गोष्ट आहे. त्यावेळी शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मी सरकारी बँकेत शैक्षणिक कर्जाविषयी माहिती घेण्याकरिता गेलो. बँकेच्या कर्ज प्रतिनीधीने मला कर्ज देनार नाही असे सांगितले. कारण विचारले असता त्याने एक वाक्य सांगितले की जे आजही मनवरती बिंबुन आहे. तो म्हनाला "शेतकर्याच्या मुलाला आम्ही कर्ज देउ शकत नाही" हा आमचा अलिखीत ठराव आहे मी सदर अधीकारयाची तक्रार मॅनेजरला केली . पुन्हा तेच पालूपद. शेवटी जमीन गहाण ठेउन सावकाराकडुन कर्ज काढले आणि शिक्षण पूर्ण केले. याला काही उपाय आहेत का की ज्याने या लोकाना काही धडा शिकवता येईल?

वाचने 14335
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

सरकार अन्नधान्न्याची निर्यात बंद करुन शेतिमाल तुमच्या आवाक्यात आणते त्यावेळी ते आम्च्या तोन्डाचा घास हिरवुन तुमचे पोट भरत असते. अतिशय ततोंतत अभिप्राय ! आजही शेतकऱ्यांना आमच्या करातून मिळणाऱ्या पैशातून सबसिडी दिली जाते. ज्याने कधी शेती बघीतली नाही किंवा शेतीत काम केले नाही तोच असे विपर्यस्त लिहु शकतो . तुम्हाला मुक्त अर्थवव्यस्था पण पाहिजे .... पण शेतकर्याचा माल मात्र मातीमोल भावाने पाहिजे .... पिझ्झा ... हाटेल...सिनेमा.... टुर... ट्रिप... दुसरीकडे ...रात्र रात्र शेतीत पाणी भरणरा शेतकरी ..... कारण दिवसा वीजच नसते.... ती असते शहरा मध्ये ...

आमच्या गावात डॉक्टरांची पतसंथा होती.. शेतकर्‍यानी कर्जे थकवली.. नोटीसा काढल्यावर संघटनेच्या लोकानी डॉक्टरांच्या आणि अधिकार्‍यांचा तोंडाला काळे फासले. ( त्यांची पुढे निर्दोष सुटका झाली.) पतसंस्था बुडाली. तेंव्हापासुन शेतकर्‍याना कर्जे द्यायला संस्था उत्सुक नसतात. http://getlocalne.ws/world/india_maharashtra_mumbai/loksatta_news_432308

आमच्या येथील काही बंअ‍ॅका शेतकर्‍याना विनातारण कर्ज देतात.. म्हणजे त्यच्याकडे शेती आहे, पिक उगवते हे माहीत असते, या बेसवर तारण न घेता कर्ज देणे.. असे कर्फ फार नसते.. साधारण २० हजार मिळतात.. पण एक शेतकरी, त्याचे आई बाप, त्याची पोरं, पोरी , सुना जावई... या सगळ्यांच्या नावानं वेगळ्या वेगळ्या बँकातुन दीड पावणेदोन लाख रुपये कसलेही तारण न देता उचलता येतात. अशी कर्जे काढायची आणि ती फेडायचीच नाहीत. बँक हात चोळत बसते. तारण तर नसते. शिवाय कर्ज फेडा म्हणून वर्षातून चार नोटीसा काढल्या तर बँकेलाच वकिली खर्च सहा आठ हजार रुपये होतो.. २० हजाराच्या कर्जात मुद्दल गेले, व्याज गेले, वर हा खर्च असली विचित्र अवस्था बँकेची होते. त्यातही लग्न झालेल्या मुलीच्या नावाने कर्ज असेल तर आणखी मजा... कर्ज काढताना माहेरचा पत्ता असतो. नंतर नोटीस आली, की ती इथे रहात नाही, म्हणून सांगितलं की झालं. कर्ज शेत तारण ठेऊन ठेवले तरी बँकेची ससेहोलपट होतेच. ऊस शेत्कर्‍याच्या नावानेच असतो.. तो ऊस गेला की बिल आली की वसुलीला माणूस येणार.. यावर उपाय म्हणजे दुसर्‍याच्या नावाने ऊस घालून त्याच्या बिलातून आपले पैसे घेऊन निवांत रहाणे.. बँकेचा माणूस आला की आमचा ऊस नव्हताच, पैसे आलेच नाही, म्हटले की झाले.. वाहनावर कर्ज दिले की बँक वाहन ओढून नेते. घरावर कर्ज असले की बँक टाळे लावू शकते.. सोने तारण असेल, तर ब्यांकेकडे सोने आधीच दिलेले असते.. पण शेतकर्‍याना कर्ज दिले तर बँकेकडे सिक्युरिटी कशाची? शेत जरी बँकेकडे असेल तरी शेतकर्‍याचे घर शेतातच असेल, तर त्याला रहात्या घारातून हाकलता येत नाही. (म्हणे!) अशी परिस्थिती असताना कुठल्या बँक शेतकर्‍याना कर्ज द्यायला धजावेल? ( आमचे एका बँकेत लाखभर रुपये बुडाले. त्यामुळे बँका कशा बुडतात, यावर सखोल संशोधन केल्याने हे वरचे मौलिक वैचारिक पिक उगवून आले.. तेच इथे तुमच्याशी शेअर केले... आमची ग्राहक न्यायालयात केस सुरु आहे.. पैकं परत मिळाले की जॉय भाऊ तुमच्या शेतात शेतकर्‍यांचा नावानं पार्टी करुया! :) )

शेत्कर्याच्या नावे खडे फोडन्यापेक्षा बँकेच्या संचालक मंडळाला धारेवर धरा. सभासद म्हणून तुम्हाला तेवढा अधीकार आहे. बँकेच्या सर्वसाधारन सभेला गेला होता का कधी? २% व्याजाच्या आमिषने स्व:ताची फसगत करुन घेतली.

In reply to by जोयबोय

हायला, बँकेचे लाखो रुपये बुडवले, त्याला हव्यास नाही का? आणि आमचेच पैसे घेऊन वर आम्हालाच म्हणायचं, हा तुमचा हव्यास...!!!!! गंमतच ... कुठलीही पतसंस्था सरकारने ठरवलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज देत नाही... फार पूर्वी , २००० पूर्वी अशी बंधने नव्हती.. तुम्ही म्हणताय ते ३-५ % चे फरक तेंव्हा असायचे.. आता सरकारने जास्तीत जास्त दर फिक्स केलेला आहे..

In reply to by जोयबोय

सहकारी आणि नॅशनल. बँका शेतकर्‍याला दारात उभंही करत नाहीत, म्हणून त्या वाचल्या. :) या बँका तितक्याच वस्ताद असतात.. आमच्याच गावचा किस्सा.. एका शेतकर्‍याने २०-२५ म्हशींवर मोठे कर्ज काढले.. आणि ते फेडलेच नाही.. बँकवालाही महावस्ताद निघाला. म्हशींची पॉलिसी बँकेच्या ताब्यात होती.. त्याने एक जनावराचा डॉक्टर म्यानेज केला आणि म्हशी मेल्या असा दाखला घेऊन इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम घेऊन कर्जाची फेड करुन घेतली.. तुम्हाला गोड बोलून कर्ज नाकारले, तोही अशा वस्तादपणाचा नमुना. अशा वस्ताद बँकाच टिकणार. शेतकर्‍याकडून कर्ज वसुली मुष्किल ही नही नामुमकीन भी है.... कोर्टात शेतकरी , विषेषतः अल्पभू धारक असेल तर, युक्तीवाद करतात.. शेती हा त्यांच्या कुटुंबाचा एकमेव अर्निंग सोर्स आहे.. कुठल्या तरी कायदा/ केसनुसार एखाद्याचा पोटभरीचा उद्योग काढून घेता येत नाही म्हणे.. ( ऐकीव माहितीवर आधारीत) अल्प भू धारक कागदोपत्री दाखवणे अवघड नाही.. घरातल्या प्रत्येकाच्या नावानं १-२ एकर डिवाइड करुन दाखवले की सगळेच अल्प भू धारक होतात.. :)

एकच माणूस.. त्याचे दोन आयडी.. दोन भिन्न विचारांच्या प्रतिक्रिया.... जाम धमाल !

In reply to by परिकथेतील राजकुमार

एकच माणूस.. त्याचे दोन आयडी.. दोन भिन्न विचारांच्या प्रतिक्रिया परा याला काही पुरावा देतोस का ? नाही म्हणजे नक्की काय चाललय/चालत ते तरी कळेल...