Skip to main content

मिपा वरील आद्य काथ्याकुट कर्त्या रा.रा.एका ताईंना नमण करुण.

लेखक lakhu risbud यांनी शनिवार, 05/11/2011 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील आद्य काथ्याकुट कर्त्या रा.रा.एका ताईंना नमण करुण. अनादी काळी,जेव्हा मिपा बाल्यावस्थेत/कुमारावस्थेत होते त्या काळात शतकानुशतकातून निर्माण होणारा,साऱ्या विश्वाच्या चिंतेचे कारण ठरणाऱ्या अत्यंत गहन अशा विषयावर होणाऱ्या "गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचे काय करावे ?" अशा धाग्यावर,त्यातील आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या प्रतिक्रियांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. आणि या जन्माचे सार्थक झाले.तैंच्या मौलिक अशा वैचारिक माणकांनी सजलेला, असंख्य वेळा पारायणे झालेला हा धागा संकेतस्थळावर सध्या या पामरास दृष्टीस पडत नाही. मज पामराकडून असा काय प्रमाद झाला की हा मौलिक असा धागा मला दिसत नाही? चिंतेने मला पोखरले आहे.कोणतातरी दयाळू अवतार हा धागा आम्हास शोधून देईल का ? अशीच अधिक विचार सुमने आणि गहन असे प्रश्न http://www.misalpav.com/node/९०६१ http://www.misalpav.com/node/8205

वाचने 4199
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

प्रस्तुत काथ्याकुट नामे य:कश्चित प्रस्तावात दिलेल्या पहिल्या दुव्याचे अवलोकन करु गेले असता असा साक्षात्कार झाली की पहिल्या दुव्यातील शेवटचा क्रमांक देवनागरीत न देता आंग्लभाषेत दिला असता चंद्रदर्शन होते... करिता चंद्रदर्शनेच्छूंनी तो आंग्लभाषेत संस्कारित करावा.

शोधा म्हणजे 'सापडेल'!

उर्लेला पाक चमचाभर ग्लासात ग्यावा.त्यात लिंबु पिलुन सरबत बनवावे:;)

काय पण राव तुम्ही गुलाबजाम तळून सोडायचे त्या पाकात.... ;)

In reply to by धनुअमिता

वो ती नीट पघायचं ना तुमी. मी मिपा वरील आद्य काथ्याकुट कर्त्या ताईंचा हुल्लेक केला.आपले भौगुनी सायेब तै कंदीपासून झाले वो ? त्या तैंचा एक धागा,आंदी नीट आला नवता. http://www.misalpav.com/node/9061

लखू रिस्बुड म्हनजे टार्झन्दादा का? ते गुलाबजामच्या पाकावर खूप तळमळीने लिहायचे.

लखू रिस्बुड म्हनजे टार्झन्दादा का? ते गुलाबजामच्या पाकावर खूप तळमळीने लिहायचे. ताईंना नम करु. हा प्रश्न फारच विचार करुन विचारलात काय ? ;) बाकी चालु द्या... ;)