Skip to main content

म्हटलं तर अनावश्यक..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 04/03/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण... इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी. म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया.. एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत.. ...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या.. कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या.. कोणाच्या तडकावणार्‍या.. उदाहरणे पुरेत.. :) ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल. .... .. .. तर मूळ काथ्याकूट विसरलोच.. ...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता... कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस. पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्‍या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला. हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं. पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही. ..............................

वाचने 20323
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

बी जे पी कड पन ध्यान द्या हो आमचे वरुण

कोण श्रीमंत? धन्यवाद. अवांतरः जर्मनीत ओमाला आजी म्हणतात' तसेच ओबामाला आजोबा म्हणतात काय? कृपया राग मानू नये,..किंवा कसेही... रोकडिया -- प्रत्येक कंपूद्वेष्टा हा .............,... नसतो पण प्रत्येक .............,... हा कंपूद्वेष्टा असतो..

. प्रतिक्रिया संपादित केलेली आहे

अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा होईल -- रजनीलकांत
श्री. स्पा वरती नीलकांत ह्यांची सूचना वाचली नसल्यास खाली पुन्हा देत आहे, ती अजुन एकदा निट वाचावी. ह्या धाग्यावर काय गोंधळ झाला हे माहिती असताना पुन्हा अशी प्रतिक्रीया कशासाठी ? तुम्ही ह्या असल्या प्रतिक्रीया देता आणि मग विनाकारण टार्‍याचे बघुन इतर पण प्रतिसाद देतात असे उगा त्या टार्‍याचे नाव खराब होते. आपण समंजस असल्याने आपली प्रतिक्रीया बदलाल हि अपेक्षा. त्यामुळे बुच मारलेले नाही. धन्यवाद.
अनावश्यक प्रतिक्रिया प्रेषक नीलकांत दिनांक Sat, 05/03/2011 - 00:18. नमस्कार, या धाग्यावर टारझनने अनावश्यक प्रतिक्रिया देत. मिसळपावच्या व्यवस्थापकीय धाग्याची चेष्टा केली आहे. सदर बाबीची मिपा व्यवस्थापन अत्यंत गंभीर दखल घेत आहे. आणि ती प्रतिक्रिया व त्यासोबतच अन्य उपप्रतिसाद उडवण्यात येत आहेत. याच सोबत टारझन यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल. चेष्टा मस्करी एका मर्यादेपुढे जाऊ नये हेच उत्तम होईल.

पैसा आहे .. उडवा कसाही. ह्याना कोण आहे विचारायला. जनता उपाशी मेली तरी ह्यांचे काय जातेय. नशीब निदान केटरर , कुरीअर, मंडप वल्यांची तरी कमाई होतेय. सगळे मेले सारखेच! - मिपा ग

हा प्रतिसादावर स्वानुभवाने सांगतो . आंधळा नी पांगळा अनुयय करून अंकाचा पाऊस पाडून आपण एखाद्या व्यक्तीच्या मित्र मंडळीत शिरू असा गैरसमज टाळावा. मला उमजेलेल शांतता कोर्ट सांगतो . आपण आभासी जगतात जेव्हा एखाद्याला काल्पनिक लक्ष्य समजून टार्गेट करतो. तेव्हा आजूबाजूचे त्याला पाठिंबा देतात (अंकाचा पाऊस किंवा वाक्यास अनुमोदन मग तिसरा त्या टार्गेट विषयी बोलतो .त्याला ही पूरक प्रतिसाद मिळतो . मग नाटकातील काल्पनिक न्यायाधीश म्हणतात तसे '' खेळ थांबवू नका चालू राहू दे , मजा येत आहे . हळू हळू टार्गेट वर बोलणारे वाढत जातात त्याच वेळी ह्या आभासी खेळत टार्गेट च्या मनस्थितीची कोणी कल्पना करत नाही . त्याने उत्तर दिले कि नव्या दमाचा इसम नव्या मुद्यांसह येतो .( कारण आता आपण काहीही लिहिले तरी त्याचा खरे खोटे पणा सिद्ध करण्याची गरज नसते ) त्याच लिहिण्याच्या अनुषंगाने कथा पुढे चालत जाते . थोडक्यात टार्गेट चा बेणारे बाई होण्याशी शक्यता असते .( माझी येथे बेणारे बाई झाली असे मी विधान करत नाही आहे .पण एखाद्याचा होण्याचा शक्यता असते .) येथे काल्पनिक खेळात कैफ चढल्याने तो थांबवणे कुणाच्याही हाती रहात नाही . झुंडीचे मानसशास्त्र हेच सांगते ह्यात झुंडीला विशेष फरक पडत नाही त्यांना फक्त एक बोलणारा लागतो .पण बोलणारा मात्र चटकन लोकप्रिय होतो व मात्र त्याच्या पडत्या काळात हेच पाठीराखे गायब होतात . येथे नाट्याला थोडे वेगळे वळण लागले . आपण लिहितो त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे हे .पाहून मग मस्करी ची कुस्करी कधी झाली हे लक्षात येत नाही . हा संधर्भ आपल्यात इतके दिवस चाललेल्या सुसंवादावर आहे . .( आपण केलेली साधी मस्करी हि एखाद्या व्यक्तीला ह्या बाबतीत मला साधी वाटत नाही . .ह्यात दोन शक्यता असतात १) तुमचा दृष्टीकोन हा त्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो .२) दुसर्यावर जेव्हा मस्करी केली तेव्हा ती साधी वाटते पण स्वतावर अशी कोणी केली तर ती साधी वाटत नाही उदा .( कंपूबाजी व (अनावश्यक शेरे ) हे मिपावर आढळतात तेव्हा का एवढा त्रास करून घेता / फिरून या असा सल्ला देणे ही एक गोष्ट .व स्वतावर कोणी खरड केली ( व ती त्या व्यक्तीस अनावश्यक वाटली .कि केवढा मनस्ताप होतो . हे माझी खरडवही पाहिल्यास कळून येईन .) तात्पर्य - ज्याचे जळते त्यालाच कळते ) स्पा आणी इतर काही सदस्यांनी आमच्या खेळात सांमत ह्यांची भूमिका वठवावी लागली .. जेव्हा आपण आंधळा अनुयय करून एखाद्याच्या विधानांवर अंकाचा पाऊस पडतो तेव्हा आपण त्या व्यक्तीस नुकसान पोहचवू शकतो. .त्याचा राजेश खन्ना करू शकतो .( ही उपमा खिल्ली उडवण्यासाठी नसून एका मासिकाच्या संपादकाने माझ्याकडून फुकटात ३ पिग रिचवून झाल्यावर अवांतर गप्पा खूप वर्षापूर्वी केल्या होत्या ( सदर पेग हे हॉटेल मधून दिले होते .माझ्या खिशातून नव्हे) .त्याने राजेश खन्ना ह्याला त्याच्या भवतालच्या चमच्यांनी कसा संपवला हे सांगितले होते .) ह्या लेखात टारझन ह्यांना मित्र व आंधळे अनुयायी दोन्ही दिसून आले असतील . मला नेहमीच उस्फुर्त पणे सल्ला किंवा प्रतिक्रिया देणाऱ्या मित्र परवडतील. ( आमचा आंधळा अनुयय कोण करणार म्हणा ?) हा सल्ला किंवा विनंती उपदेश अजिबात नसून मला उस्फुर्त पणे जे लिहावेसे वाटले ते लिहिले .

In reply to by निनाद मुक्काम …

हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे पटले. शांतता... मधील परिस्थितीशी केलेली तुलना पण छान आहे, पण इथे प्रतिसाद दुसऱ्याच्या शैलीत लिहिणे अपेक्षित होते ना रे. वरून हे मुद्दे पण इथल्या चर्चेला गैरलागू आहेत (लग्न किंवा धोरणात बसतील अशा प्रतिक्रिया देणे). पण तुला काय म्हणायचे आहे याचा अंदाज आला.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहंदळे साहेब आपला मुद्दा मान्य .तरी मी अवांतर केले .कारण परा ह्यांच्या प्रतिसादात पूरक असा प्रतिसाद देऊन माझी बाजू /भूमिका मांडली .माझ्या अनेक मित्र /मैत्रिणी माझ्या पासून दुरावतील तेही शुल्लक गैरसमजामुळे .हे मला मान्य नव्हते ( आधीच मी मायभूमीला दुरावलो आहे .तेच ...)म्हणून आपणास खव केली . ती जर संबंधित मान्यवर पाहतील तर माझी भूमिका अजून स्पष्ट होईन व इतर कोणाच्या लेखावर मी फक्त विषयाला अनुरूप लिहीन

आताच्च मटा वर ही. लिंक मिळाली आता या खर्चाने. . बर्‍याच लोकाना पैसा मिळाला असेल हे खर पण पइश्याची एवढी उधळपट्टी पाहून ज्या लोकना मिळाला नाही त्यांची.......... . मी परदेशात असताना फाईव स्तार होटेलात मोठमोठे लग्न सोहळे पाहिले पण ते शक्यतो. खाजगी . स्वरूपाचे असतात आणि सामान्य माणसाला ते जळवत नाहीत. या भडक प्रदर्शनाने खर्चाच्या उपयोगा पेक्षा त्यातून होऊ घातलेला सामाजिक भडका जास्त उपदरवकारक आहे .