"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन... "
कदाचीत हे शिर्षक बघून गोंधळला असाल... पण हा प्रश्न माझा नसून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलेला प्रश्न आहे, "What the hell is going on in this country,"
टाईम्स ऑफ इंडीया मधील या बातमी प्रमाणे, पुण्यातील उद्योजक हसन अली यांच्या पन्नासहजारकोटी रुपयांच्या करचुकवेगिरी संदर्भात न्या. रेड्डी आणि न्या. निज्जर, वरील शब्दात आपला उद्वेग दाखवत पुढे (दम देत) म्हणाले की, फक्त करचुकवेगिरी म्हणत काळ्या पैशाकडे असे दुर्लक्ष जर सरकार करू लागले तर न्यायालयाला चौकशीप्रक्रीयेवर नियंत्रण ठेवावे लागेल. सकाळ मधील या बातमी प्रमाणे, "हसन अली याने विदेशी बॅंकांत सुमारे आठ अब्ज डॉलर ठेवले असून त्याचे आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यावसायिक अदन खशोगी याच्याशी संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी, पंजाबचे माजी पोलिस प्रमुख के.पी.एस.गिल, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि इतरांनी या काळ्या पैसा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत त्यांनी परदेशात असलेला 70 लाख कोटी रुपये काळा पैसा देशात परत आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती."
आजच्याच वृत्तपत्रात अजून एका महत्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढत, पी.जे. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य आयुक्तपदावरील नियुक्ती सरकारला रद्द करण्यास भाग पाडले आहे.
एकूणच या सर्व प्रकरणांचे आणि कोर्टाच्या न्यायनिवाडा पद्धतीबद्दल वाच्य करताना टाईम्सने "चळवळी न्यायव्यवस्था" अर्थात "जुडीशिअल अॅक्टीव्हिजम" असे म्हणले आहे. जे काही काळ अस्तित्वात होते. पण मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमुर्ती बालकृष्णन असताना तीन वर्षे गप्प झाले होते. हेच माजी न्या. बालकॄष्णन आता मानवी हक्क आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या जावयासकट अगदी जवळच्या नातेवाईकांवर कोट्यावधी रुपयांच्या करफसवेगिरी आणि इतर प्रकरणात आरोप आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला देखील चालू आहे.
पण, सधारण दहा महीन्यांपुर्वी न्या. एस एच कापाडीया हे प्रमुख न्यायाधिश झाले आणि परत 'योग्य' जनहितकारी अर्जांना प्राधान्य मिळू लागले. जर "अयोग्य" जनहीतकारी अर्ज असेल तर ते करणार्यांना दंड... "I come from a poor family. I started my career as a Class IV employee and the only asset I possess is integrity." हे न्या. कापडीयांचे शब्द वाचले आणि भारताला खरेच "अधुनिक रामशात्री" मिळाला अशी आशा वाटली.
तरी देखील हे वाचताना अस्वस्थता आली. न्यायालयाने खर्या अर्थाने "आंधळ्या न्यायदेवतेच्या" आदेशाने जरी प्रामाणिक निर्णय घेतले असले तरी, अशी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हतबल अवस्था येणे, म्हणजे अखेरचा पर्याय वाटतो.
मात्र या संदर्भात डोक्यात प्रश्न आले:
- न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
- जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
- जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले काम करत नसतील, अशा लोकप्रतिनिधींचे सरकार जर एका पाठोपाठ एका भ्रष्टतेच्या प्रकरणात अडकत असेल आणि म्हणून जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का?
वाचने
6527
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
पुण्यातील उद्योजक हसन अली
हे एवढाले आकडे वाचूनच डोकं
आम्ही बी
पिडां काकाला राष्ट्रपती
>>न्यायालयाने दिलेले निर्णय
आगाउ शंका.
मुद्दा इतके पैसे कसे वसुन
मुद्दा इतके पैसे कसे वसुन
1-2 वर्षांपूर्वी या हसन अलीला
In reply to 1-2 वर्षांपूर्वी या हसन अलीला by श्रीरंग
आता
In reply to आता by विकास
मनावर
क्वात्रोचीवरील खटला मागे
In reply to क्वात्रोचीवरील खटला मागे by नितिन थत्ते
प्रश्न
In reply to प्रश्न by विकास
माझा प्रतिसाद क्वात्रोची
In reply to माझा प्रतिसाद क्वात्रोची by नितिन थत्ते
मुद्दा
In reply to मुद्दा by विकास
सीबीआय आणि रॉ या नेहमीच
In reply to सीबीआय आणि रॉ या नेहमीच by नितिन थत्ते
सहमत
In reply to सीबीआय आणि रॉ या नेहमीच by नितिन थत्ते
उलट न्यायालयीन दिरंगाई हीच या रॉटला मुख्यतः कारणीभूत आहे. गुन्हा
In reply to उलट न्यायालयीन दिरंगाई हीच या रॉटला मुख्यतः कारणीभूत आहे. गुन्हा by समंजस
न्यायालयांची आणि
In reply to न्यायालयांची आणि by नितिन थत्ते
थत्तेसाहेब...
In reply to थत्तेसाहेब... by प्रसन्न केसकर
याच संदर्भात
In reply to याच संदर्भात by विकास
न्यायदानातल्या विलंबाबाबत...
व्हॉट द हेल इज गोइंग ऑन =
अॅक्टीव्हिझम आहे किवा नाही, देशाच्या
In reply to अॅक्टीव्हिझम आहे किवा नाही, देशाच्या by समंजस
काहींच्या म्हणण्या प्रमाणे
In reply to काहींच्या म्हणण्या प्रमाणे by पिवळा डांबिस
बरोबर + सहमत
In reply to बरोबर + सहमत by विकास
यातला जर..
कळीचा मुद्दा
कायदेशीर/बेकायदेशीर हे स्वतःच ठरवणार.
एक शंका : अली हसन च्या