औषधोपचार/माहीती या भागामध्ये हा लेख टाकत आहे कारण हा लेख प्रायोगिक मानसशास्त्राशी निगडीत आहे.
CONFORMITY या शब्दाला मला मराठी शब्द न सुचल्याने तोच इंग्रजी शब्द वापरला आहे. कृपया शब्द सुचवावा.
_________________________________________________
असे समजा की काही लोकांचा गट आहे. या गटाचा तुम्हीदेखील एक हिस्सा आहात. या गटातील सर्व व्यक्तींना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रश्नाचे स्वरूप असे आहे की या प्रश्नाला अचूक उत्तर नाही. उत्तर संदिग्ध आहे. आता गटातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही उत्तर देते. तुमची पाळी येते. समजा तुमचे उत्तर आधीच्या लोकांच्या उत्तरापेक्षा नाट्यमयरीत्या वेगळे आहे. तरीही गटाचा तुमच्यावर नाही म्हटलं तरी प्रभाव पडतोच आणि तुम्ही आधीच्या उत्तरांच्या जवळ जाणारे उत्तर देता.
वरील जी प्रक्रिया आहे तिला प्रायोगिक मानसशास्त्रात "CONFORMITY" असा शब्द आहे.
थोडक्यात व्याख्या करायची तर - कोणताही दबाव असताना अथवा नसताना, स्वतःची वागणूक बदलून , आपली प्रतिक्रिया, अन्य लोकांच्या प्रतिक्रियेशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे CONFORMITY.
१९३७ मध्ये शेरीफ(Sherif) नावाच्या शास्त्रद्न्याने पुढील प्रयोग केला -
(१) एका व्यक्तीला (ज्याला गिनीपिग म्हणू या) , १५ फूटावरील दिव्याकडे पहावयास सांगीतले.
(२) तो दिवा हलला व थोड्या वेळाने दिसेनासा झाला.
(३) शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
गिनीपिग - मला नक्की सांगता येणार नाही पण ८ इंच दूरवर गेला असावा.
(४) २ रा दिवस - आता ३ अन्य लोक या प्रयोगात सामील झाले आहेत.
परत तोच दिवा तितकाच लांब हलवला व नाहीसा झाला.
शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
पहीली व्यक्ती - २ इंच
दुसरी व्यक्ती - १ इंच किंवा २ इंच
तीसरी व्यक्ती - छे छे १ पेक्षा जास्त नाही.
गिनीपिग - मला वाटतं ६ इंच हलला दिवा.
सगळेजणं त्याच्याकडे तो वेडा असल्यासारखे पहातात.
(५) ३ रा दिवस
सगळं २ र्या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - ४ इंच
(५) ४ था दिवस
सगळं २ र्या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - बहुतेक २ इंच
म्हणजे ८ इंचावरून तो २ इंचावर आला आहे केवळ गटाच्या प्रभावामुळे.
________________________________________________
वरील प्रयोगात निदान उत्तर तरी संदिग्ध होते पण .....
पुढे १९५१ साली ऍश(Asch) या शास्त्रद्न्याने दुसरा प्रयोग केला यामध्ये त्याने कंपूचा आपल्यावर कळत/नकळत पडणार्या दबावाचा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला उत्तर जरी अगदी १००% माहीत असले तरी "गटामध्ये/कंपूमध्ये" रहाण्याकरता म्हणून आपण निखालस चूकीचे उत्तर देऊ शकतो.
___________________________________________________________________
पुढे १९५५ मध्ये क्रच्फिल्ड (Crutchfield) हा शास्त्रद्न्य या निष्कर्षाप्रत आला की - जे लोक "CONFORM" करतात ते बौद्धिकदृष्ट्या कमी परिणामकारक असतात. त्यांच्यामध्ये अहंची नभावना आणि नेतृत्वनैपुण्य हे गुण कमी आढळतात.असे लोक सामाजिक नात्यांमध्ये कमी प्रगल्भता असलेले तसेच न्यूनत्वाची भावना जोपासणारे असतात. ते संकुचित मनोवृत्तीचे, दबलेले, शरणागत वृत्तीचे अधिक असून त्यांना स्वतःबद्दलचे द्न्यान अत्यल्प असते.
त्याला हेदेखील आढळून आले की सामान्यतः स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक "CONFORM" करतात.पुरुष हे पारंपारीक रीत्या स्वातंत्र्य आणि झगडा ह्या दोन गोष्टी स्पर्धात्मक अभिव्यक्ती म्हणून व्यक्त करताना आढळतात याउलत स्त्रिया हीच अभिव्यक्ती अधिक जुळवून घेण्यातून व्यक्त करतात.
_____________________________________________________________________
संदर्भ -
दुवा १
दुवा २
याद्या
9060
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याला हेदेखील आढळून आले की
.
In reply to त्याला हेदेखील आढळून आले की by मृगनयनी
कशावरुन
In reply to त्याला हेदेखील आढळून आले की by मृगनयनी
गिनिपिग्ज....!!
'अनुरूपता'पेक्षा
In reply to गिनिपिग्ज....!! by इन्द्र्राज पवार
अनुगामिती/अनुगम....!!
In reply to 'अनुरूपता'पेक्षा by विसुनाना
धन्यवाद इंद्र. होय मला वाटले
In reply to अनुगामिती/अनुगम....!! by इन्द्र्राज पवार
विषय छानच आहे. इंद्राज
१२ अँग्री यंग मॅन चा उल्लेख
अतिशय संदर विषय आहे.. म्हणून
चांगला चर्चाविषय
मिलग्रअॅमचा तुम्ही दिलेला
In reply to चांगला चर्चाविषय by सेरेपी
भिती
In reply to मिलग्रअॅमचा तुम्ही दिलेला by शुचि
सटल कनफॉरमिटी
In reply to भिती by सेरेपी
१. लोक (अमेरिकेत तरी....जिथे
In reply to सटल कनफॉरमिटी by शुचि
संकल्पनेचा दबाव...!!
In reply to भिती by सेरेपी
>> कोणत्याही छळाचा वापर न
In reply to संकल्पनेचा दबाव...!! by इन्द्र्राज पवार
चार चांद...!!
In reply to >> कोणत्याही छळाचा वापर न by शुचि
"म्यानातून उसळे तलवारीची पात"
In reply to चार चांद...!! by इन्द्र्राज पवार
इन्द्रा, जवळचे नाते आहे ते
In reply to संकल्पनेचा दबाव...!! by इन्द्र्राज पवार
Inglorious Bastards
In reply to संकल्पनेचा दबाव...!! by इन्द्र्राज पवार
ते उदाहरण....!!
In reply to Inglorious Bastards by आत्मशून्य
आपला आशय लक्षात आला पण उदाहरण चूकीचे वाटले इतकेच
In reply to ते उदाहरण....!! by इन्द्र्राज पवार
शोशन्ना...!!
In reply to आपला आशय लक्षात आला पण उदाहरण चूकीचे वाटले इतकेच by आत्मशून्य
असो...मुख्य मुद्दा
In reply to शोशन्ना...!! by इन्द्र्राज पवार
एक शंका
In reply to मिलग्रअॅमचा तुम्ही दिलेला by शुचि