गावांची नावं
काही गावांची नावं विचित्र असतात. ती कशी पडली असावीत असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी एक फार चांगलं पुस्तक वाचनात आलं. गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' या नावाचं. त्यात इंधनाच्या तेलाच्या इतिहासापासून सध्या त्यावरून सुरू असलेले राजकारण याचे अतिशय माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे रंजक भाषेत विवेचन केले होते. त्यात एक छान माहिती मिळाली. आसाममध्ये असलेल्या दिग्बोई या गावाचे नाव कसे पडले याविषयीची. या भागातून गेलेल्या हत्तीच्या पायाला तेल लागल्याचे ब्रिटिश अधिकार्याला कळले. त्याने त्या भागातील खोदकामाचे हक्क हाती घेतले. मग खोदायला सुरवात झाली. खोदायला अर्थातच स्थानिक माणसे ठेवली होती. तो अधिकारी त्यांना 'डिग बॉय, डिग बॉय' (खण अशा अर्थी) असे म्हणायचा. त्याचेच पुढे डिग्बॉय व दिग्बोई असे पडले. अशी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा.
वाचने
9942
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कलकत्ता
In reply to कलकत्ता by विकास
कै च्या कै
बॉम्बे
नागपूर
In reply to नागपूर by लिखाळ
लेणी
In reply to नागपूर by लिखाळ
आयला...
भेंडीबाजार
काही
गीरगाव
काही गावांच्या कपोलकल्पित कथा
In reply to काही गावांच्या कपोलकल्पित कथा by विसुनाना
"आई, चल करंजी कर"
काय ऐकाव ते नवलचं !!!
कोल्हापूर
लाहोर , बॉम्बे आणि लखनौ