Skip to main content

विज्ञानवाद्यांना खुल्लमखुल्ला आव्हान!! बोला करताय?

लेखक गुंडोपंत यांनी गुरुवार, 03/06/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या एका चर्चेत गुरफटलो होतो. तेथे मला एका सदस्यानी शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल. असा सल्ला दिला. पण मला असे जर्नल्स मराठीमध्ये कुठेही मिळाले नाहीत. मी डोळे फुटेस्तोवर शोधले, काहीही मिळाले नाही. जे आहे ते सगळे काही इंग्रजी भाषेत आहे. मराठीत काहीच मिळाले नाही. हे तर फार म्हंजे फार लांबची गोष्ट झाली! मला साधे लहानमुलांना विज्ञानातील साध्या साध्या कल्पना समजावून सांगणारे मराठी स्थळही मला दिसले नाही. आता बोला! मराठी मध्ये फक्त फालतू श्रद्धा प्रतिसादरुपी कंदीलाचे कागदावर चित्र काढून देतात, आणि म्हणतात, 'घ्या!! आता पडेल प्रकाश!!!'. हे ही नसेल तर विनोदाच्या नावाखाली फक्त टिंगल टवाळी! तुम्ही मला सांगा, अश्या लोकांचे कोरडे सल्ले काय कामाचे हो? या लोकांना याला त्याला कोरडी अक्कल शिकवण्यापेक्षा काही तरी करून दाखवण्याचे खुले आव्हान मी देतो. मी म्हणतो, कॅच देम यंग - लहान मुले बुवा बाबाच्या नादी लागण्याआधीच त्यांना विज्ञानाच्या नादी लावा! विज्ञानासाठी खरोखर काही करायचे असेल तर, मराठी भाषीक लहानांसाठी, शालेय मुलांसाठी एक विज्ञान आणि गणित समजावून सांगणारे मराठी स्थळ या विज्ञानवाद्यांनी काढावे. हे असे करता येईल -
  • - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
  • - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
  • - तसे त्या शाळांना कळवावे
  • - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
  • - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
  • - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
  • - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
  • - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
  • - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
  • - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
  • - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
  • - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
  • - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत. विज्ञानवादी प्रकल्प म्हंटल्यावर याची अडचण होऊ नये!
बोला करताय? आहे हिम्मत प्रकल्प तडीस नेण्याची? नाहीतर मराठी शाळेतली मुलांनी काय फक्त ट्रिपल एक्स साईट्सवरच आपली संगणकीय तहान भागवायची का? तुम्ही नाही द्यायचे तर कोण देणार आहे हे हे प्रशिक्षण? तुमच्यात हिम्मत असेल तर गुंडोपंत स्वतः मदतीला तयार आहेत. काहीही विधायक मराठी मध्ये करत असाल, तर मदतीला हजार हात तयार होतील याची मला खात्री आहे! बोला घेताय हे खुल्लमखुल्ला आव्हान? आपला गुंडोपंत

वाचने 23024
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

विज्ञान, गणित, याविषयावर मराठी भाषेत लेखन व्हावे, असलेले मराठीत यावे. या विषयावर मराठी भाषेत संकेतस्थळे निर्माण व्हावीत. शाळेतील मुलांना त्यात सहभागी होता यावे, शिकता यावे, यासाठीची आपली तळमळ आणि उपक्रम योग्यच आहे. आपल्या उपक्रमात मला काही मदत करता येत असेल तर, खारीचा वाटा नक्कीच उचलेन...! -दिलीप बिरुटे [गुंडोपंताचा भक्त]

गेज व इन्स्ट्रुमेन्टस या विषयीच्या विज्ञान /ज्ञान या मधे आम्ही अधिकारवाणीने मदत करु शकतो.....

http://mavipamumbai.org/ इथें आपण मराठी विज्ञान परिषदेशीं संपर्क साधून या संस्थेंतून भरीव कार्य करूं शकाल अशी आशा आहे. फक्त कार्याच्या केंद्रस्थानीं स्वत: न राहातां स्वत:चा इगो वगैरे बाजूला ठेवून काम करावें लागेल. कार्यासाठीं मनापासून शुभेच्छा. सुधीर कांदळकर.

आहे http://mavipamumbai.org/ या स्थळाला भेट देऊन त्यांच्याशीं संपर्क साधून आपण भरीव कार्य करूं शकाल. फक्त व्यक्तिगत इगो दूर ठेवावे लागतील आणि कार्याचें केंद्रस्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भरीव कार्यासाठीं शुभेच्छा. सुधीर कांदळकर.