मला सन्त तुकाराम महाराजान्च्या दोन गोष्टी सान्गाय्च्या आहेत. प्रथम्दर्शनी त्या दोन्ही परस्पर विरोधी सन्देश देताहेत असे वाट्ते:
१. महाराज दर वर्षी आप्ल्या शेजार्याला वारीला येण्याबद्दल विचारत असत आणि दर वर्षी तो शेजारी काही न काही प्रापन्चिक कारण सान्गून नकार देत असे. एकदा महाराज अन्गणात्ल्य झाडाच्या फान्दीला लटकून ओरडाय्ला लाग्तात की मला सोडवा, मला सोडवा ... तो शेजारी येउन म्हणतो कि महाराज झाडाने तुम्हाला धरलेले नाही तर तुम्हीच झाडाला धरलेले आहे, तुम्ही हात सोडा, म्हणजे आपोआपच सुटाल ... मग महाराज लगेच खाली उतरून त्या शेजार्याला सान्ग्तात कि तुझे पण असेच आहे, तू प्रपन्चाला धरले आहेस, प्रपन्चाने तुला धर्लेले नाही. तेव्हा तू ठरव्शील तर वारीला येउ शक्शील नाही तर कधीच येउ शक्णार नाहीस ...
२. गावातले सर्व ज्येष्ठ लोक एक्दा महाराजाना भेटून तीर्थयात्रेला त्यान्चेबरोबर येण्यासाठी विनन्ती कर्तात. महाराज एक भोपळा त्यान्ना देतात व म्हण्तात कि जेथे जेथे तुम्ही पुण्यस्नान कराल तेथे तेथे माझे ऐवजी या भोपळ्याला तीर्थस्नान घाला. मग परत गावी आल्यावर त्य भोप्ळ्याची भाजी आपण प्रसाद म्हणून सर्व गावात वाटू या ... ते लोक त्याप्रमाणेच करतात व परत आल्यावर त्या भोपळ्याची भाजी करतात. पण ती अतिशय कडू झालेली असते. मग महाराज सान्गतात की पहा अनेक तीर्थस्नाने केलेला हा भोपळा आतून कडूच राहिला आहे. तसेच आपले मन निर्मळ नसेल तर कितीही तीर्थयात्रा केल्यात तरी काहि उपयोग नाही , तुम्हाला पुण्य काही लाभणारच नाही.
या दोन गोष्टीन्मधे थोडी विसन्गती वाटत नाही का?
ज्या ज्या तथाकथीत ज्येश्ठाना हा प्रश्न विचारला त्या सर्वानी, नीट उत्तर न देता उलट माझ्याच विचार्क्शमतेबद्दल व योग्यतेबद्दल आग्पाखड केली ...
थोडा ऊहापोह केलात तर बरे होइल ....
वाचने
6711
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सन्त श्रेश्ठ तुकाराम महाराजान्च्या दोन गोष्टी
मराठी
In reply to सन्त श्रेश्ठ तुकाराम महाराजान्च्या दोन गोष्टी by केतन अघोर
काय राव..
In reply to मराठी by तिमा
+१
In reply to सन्त श्रेश्ठ तुकाराम महाराजान्च्या दोन गोष्टी by केतन अघोर
यात्रेचा हेतू
कदाचित..
अति प्रपंच
माझ्या माहीती प्रमाणे
आधी
महाराज म्हणतात
मुळात ह्या
खरे तर