Skip to main content

शाहरुख खानची धर्म परायणता...............

लेखक मंगेशपावसकर यांनी बुधवार, 24/02/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरुख खानची धर्म परायणता............... मी शाहरुखचा प्रशंसक आहे, त्याची योग्यता त्याची अदाकारी ह्या बद्दल मला यत्किंचित ही शंका नाही . मला माय नेम इज खान हा चित्रपट देखील आवडला. आपल्या धर्माबद्दल प्रत्येकास आदर हा असलाच पाहिजे. पण अर्थातच आपल्या देशा विरुद्ध कारवाया करणाऱ्या आतंकवाद्यांना खुले वा छुपे समर्थन देणाऱ्या वा सध्या आपल्या भिकेवर जगणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व क्रिकेटपटू यांना आपल्या देशात काही स्थान नसावे. असे माझे वैयक्तिक मत आहे. कलेला धर्म जात बंधने नसतात हे जरी खरे असले तरी इथल्या काही पाकी कलाकारांचे मानधन रुपी पैसा हा पाकिस्तानात अल्ला च्या कामासाठी (जेहाद ) वापरण्याचे उद्योग चालू असतात, आणि त्यात "इथले ही" गुंतलेले असतात. ज्याचा नातेवाईक यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ठार झाला नाही. त्यांना शाहरुख ची बाजू घेणे सोपे असते. आणि मोठे मोठे राग देणे ही सोपे असते. तटस्थ होऊन विचार करा आणि कमीत कमी जे निरपराध स्फोटात वा चकमकीत ठार झाले. त्यांचा आत्म्याला कसे वाटत असेल ते जाणवा. जो पाकिस्तान मुंबई वा कुठल्या ही ठिकाणी झालेल्या हल्ल्यावर सरळ हाथ वर करतो, चीन च्या मदतीने बनावट मुद्रांक, नोटा आपल्या देशात सोडून आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करतो, महागाई वाढवतो त्याचाशी गुजगोष्टी करण्यात त्यांना मांडीवर बसवण्यात काय स्वारस्य इथल्या नेत्यांना वाटते हे मला अजून समजलेले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव असू शकतो. पण आपले निर्णय आपण घेण्याचा अधिकार प्रत्येक राष्ट्राला असतो असे माझे ठाम मत आहे. माझी वाचकांस विनंती आहे की मला कुठल्या पक्षाशी संलग्न समजू नये मी तटस्थ आहे. आणि माझे वैयक्तिक मत मांडत आहे. मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com

वाचने 1620
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मी शाहरुखचा प्रशंसक आहे, त्याची योग्यता त्याची अदाकारी ह्या बद्दल मला यत्किंचित ही शंका नाही . मला माय नेम इज खान हा चित्रपट देखील आवडला. अभिनय आणि शाहरुख यांचा दुरान्वयानेही संबध असावा असे आजतागायत वाट्ले नाही ....अपवाद फक्त स्वदेश,चक दे या चित्रपटांचा आहे.. काल वाचलेल्या बातमीनुसार शाहरुखने काल कलकत्ता येथे "लक्स कोझी "सोबतचा आपला करार मोडित काढला....सदरची कंपनी ही रिझवान उर रेहमान याच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असणार्‍या अशोक टोडी याच्या मालकिची आहे व शाहरुख त्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर होता.पण पश्चिम बंगाल मधिल मुसलमानांनी शाहरुखच्या या भुमिकेला आक्षेप घेतल्यावर त्याने लगेच आपला करार मोडीत काढला.....निधर्मीवादाचा पुरस्कर्ता असलेल्या शाहरुखचे हे वागणे किती दुट्टपी आहे हे लक्षात येते...........यावर एकच प्रश्न मनात येतो..."आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडूंना न घेऊन त्यांच्यावर अन्याय झाल्याची बोंब मारणार्‍या शाहरुखने आपल्या नाईट रायडर्स च्या संघ सदस्यांना त्यांचे पाकिस्तानी खेळाडूंच्या बाबतीतले मत विचारात घेण्याचा उदारपणा दाखवला होता का?"२६/११च्या पार्श्वभुमीवर कुणीही सच्चा भारतिय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंच्या विरोधातच बोलला असता.....कारण पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्यावर पाक खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहता त्यांच्या भारताबद्दलच्या भुमिकेत किती विखार भरला आहे हे लगेच लक्षात येते. http://www.youtube.com/watch?v=_2IL-6YaCk0 "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।