मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीय पासपोर्ट क्रमांक

मेघवेडा · · काथ्याकूट
काल ऑफिसात बसल्या बसल्या असंच सहजच म्हणून विचार करता करता माझ्या बावळट मनाला एक प्रश्न पडला. खरंतर एका गोर्‍याचा पासपोर्ट पाहिला मी आणि तेव्हापासून हा प्रश्न मनात रूंजी घालतोय. ब्रिटिश पासपोर्ट पाहिल्यावर एक गोष्ट लगेच ध्यानात आली ती म्हणजे त्यांची पासपोर्ट क्रमांकाची रचना. यांचा पासपोर्ट क्रमांक ११/१२ आकडी संख्या आहे. वाटलं, काय बावळटपणा आहे. आपला पासपोर्ट क्रमांक बरा, एक अक्षर आणि सात आकडे. लक्षात ठेवायला सोपे! आणि तेव्हाच डोक्यात किडा वळवळला, युनायटेड किंगडमची लोकसंख्या आहे फक्त ६-७ कोटी आणि यांच्या पासपोर्ट क्रमांकाच्या कमाल संरचनांची संख्या (कॉम्बिनेशन्स ला मराठी शब्द नाही मिळाला!) आहे १०^११ म्हणजे १०० अब्ज!! आता आपल्या भारतीय पासपोर्ट क्रमांकाची रचना लक्षात घेता, (एक अक्षर आणि सात आकडे) कमाल संरचनांची संख्या (पुन्हा कॉम्बिनेशन्स!) पुढीलप्रमाणे: २६ अक्षरांतून १ अक्षर आणि १० आकडे, ७ जागा म्हणजे २६ x १०^७ = २६ कोटी. ( सध्या अपवादांकडे दुर्लक्ष करूया!) आता भारताची लोकसंख्या कोटींचे शतक केव्हाच पार करून गेली आहे. अशा परिस्थितीत पासपोर्ट क्रमांकांचा घोळ नाही होणार का? वेळ आल्यास (आणि कधीतरी येणारच!) या क्रमांकाच्या संरचनेत बदल करावा लागल्यास ते मोबाईल अथवा टेलिफोन नंबर बदलण्याइतक्या सहजतेने होऊ शकते का? काहीतरी मार्ग असलाच पाहिजे नाही का? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. -- (संख्यांच्या घोळात हरवलेला) मेघवेडा.

वाचन 4201 प्रतिक्रिया 0