Skip to main content

सासुलीचा योगी श्री सावत्या

लेखक रुस्तुम यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

header
"लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!"असा काहीसा आवाज बसमध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचणार, किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार? सावत्याच. आमचे बसमधले घड्याळच म्हणा. फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक असा की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर नकळत उमटायची.

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - जस्टिस चौधरी

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2

लेखक :- आदिजोशी

अभिवाचन :- चिन्मय शिंत्रे

पार्श्वसंगीत ऊर्फ ढींच्याकीकरण :- वेल्लाभट


दौलत की चाट

लेखक जुइ यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

कोणे एके काळी दिल्ली नावाचे एक महानगर होते. तेथे दौलत नावाचा एक व्यापारी राहत होता. हिवाळ्यात त्याचा एक नेम होता. नेमाला तो काय करी? तर म्हशीचे घट्ट दूध घेई. त्याबरोबर मलई घेऊन ते एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करी. मग ते भांडे झाकून रात्री बाहेर ठेवी. त्यावर बर्फाची लादी ठेवी.

दृकश्राव्य विभाग :- कर ना कर, बांड्या बैलनी शेपटी धर (अहिराणी कथा)

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2



जयंत काका म्हणजे एकदम सळसळता उत्साह! एक खुमासदार कथा त्यांनी आपल्या खास अहिराणी भाषेत त्यांनी दिवाळी अंकासाठी सादर केलेली आहे. मिपाकरांना नक्कीच आवडेल!

Footer

पतीची आरती

लेखक शीतल डोळस यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2

गणपतीबाप्पा गेले आणि सकाळ-संध्याकाळच्या पूजा, आरत्या, घंटानाद, सगळे बंद झाले. घर एकदम शांत शांत झाले. मी गमतीने बायकोला म्हणालो, "अगं, गणपती वर्षातून फक्त १० दिवस येतो, तरी तू इतक्या मनोभावे सकाळ-संध्याकाळ त्याची आरती करतेस. मी तुझा गणपती नसलो, तरी'पण'पती आहे, पण तू कधी माझी आरती केली नाहीस." त्यावर बायकोने तिरस्कारिक नजरेने बघून "आरती? अन तुमची? तोंड बघा आरशात!" असे खेकसून वर "झोपा आता गुपचूप" असा आदेश दिला.

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू!)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2

 बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.) मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्‌भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्‌भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात असे कोणी मला आत्ता सांगितले, तर मी त्याला निश्चितच मूर्खात काढेन. 

...उर्फ सुगरणीचा सल्ला : पोळ्या - एक अर्वाचीन छळ

लेखक मेघना भुस्कुटे यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2

माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.

आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.

दृकश्राव्य विभाग : डिजिटल दिवाळी पहाट

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2



१. श्री. राजेश परांजपे - शास्त्रीय गायन

राग :- बिलासखानी तोडी
रचना आणि संगीत :- राजेश परांजपे

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - मुंगोटे

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

Header2



आम्ही म्हणलो होतो ना, एक मांगो दोन देंगे... ! अरे दोन काय, तीन देंगे!
एक व्हिडीओ काय मागता, तीन घ्या!! असं म्हणत हा अजून एक खमंग व्हिडीओ सविताच्या किचन मधून.

नेहमीच्या फराळातून जरासा बदल हवाच हो. म्हणून ही जरा वेगळी पाककृती.