पॉन सॅक्रिफाईस
- Read more about पॉन सॅक्रिफाईस
- 28 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
.
.
.
.
.
.
.
.
सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली
डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे
चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली
छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे
मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले
नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे
वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले
या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे
देखणी ती
(चित्रः प्रतिमा खडके)
त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता.