साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल, पाणी
कृती : उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा.
एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला.
कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो.
चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या.
साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते. मिश्रण अजिबात ढवळायचे नाही.
इडलीपात्राला तेलाचा हात लावून घ्या व चमच्याने वरवरचे पीठ घेऊन पात्रात घाला.
इडल्या वाफवून काढाव्यात व चटणी, सांबाराबरोबर सर्व्ह कराव्यात.
वरील साहित्यात लहान आकाराच्या ३० इडल्या होतात.
ही पाककृती माझ्याकडच्या पुस्तकातील आहे. थोडे बदल केले आहेत.
वाटल्यास आपण वरील पिठात थोडे मटार, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर व मिरीपूड घालू शकता.
हे जिन्नस पीठ वाटल्यावर मिसळावे लागतात.
रेवती
रेवती
वाचने
27940
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व प्रतिसादकांचे आभार.