एक मुलगी भरीतप्रेमी.. पहिल्यांदाच दुधी भोपळ्याचे भरीत केलं , भोपळा गॅसवर भाजल्यावर मिक्सरमधून गरगट्ट केला आणि चिरलेल्या टोमॅटो फोडणीत,तिखट- मीठ घालून परतून घेतल.मुलीला नाश्ताला दिले.भोपळ्याला नाक मुरडणारी परत परत मागून हे भोपळा भरीत खात होती..बरोबरीला भरताच्या वांग्याचं भरीत आहेच .चुटुकदार डाळिंब दाणे बरोबर.
अशाच पद्धतीने पडवळ,दोडके,घोसाळ्याचे भरीत करून लहान मुलांना चटकदार पर्याय देऊ शकतो.
'भोपळ्याचे भरीत' मस्त. दिसतंय भारी. बाकी, भरीत म्हणजे फक्त 'वांग्यांचे' अशी श्रद्धा असलेल्या माझ्या सारख्या माणसाला भोपळ्याचंही भरीत छान लागतं समजून घ्यायला वेळ लागेल.
अजुन येऊ द्या...!
-दिलीप बिरुटे
मागे हे भरीत कुठूनसे बघून (बहुधा तूनळी) करून पाहिले होते. पण चव काही लक्षात राहण्यासारखी नव्हती. ठीक ठाक होती. म्हणजे त्यात फार काही विशेष नव्हते. ( म्हणजे स्पष्ट असे की बोअरिंग टू से द लीस्ट.. )
ही पाककृती मात्र कदाचित वेगळी दिसते आहे. एकदा या प्रकारे करून बघावी असे वाटते. दुधी भाजून झाल्यावर सोलणे हा किचकट प्रकार ठरला होता असे आठवते.
दुधीचे याहून अधिक टेस्टी प्रकार म्हणजे लौकी के कोफ्ते (कोफ्ता करी) आणि दुधीचे घावन.
हे दोन्ही नेहमी घरी बनवतो.
मिपावर आगोदर आलेली अशाच स्वरूपाची जरा हटके रेसिपी, जी करून पहिली आणि बेहद्द आवडली होती ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचे सार. कोणाची होती ते शोधावे लागेल.
अर्थात असे प्रयोग करत राहिले पाहिजे.
मिपावर आगोदर आलेली अशाच स्वरूपाची जरा हटके रेसिपी, जी करून पहिली आणि बेहद्द आवडली होती ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचे सार. कोणाची होती ते शोधावे लागेल.
दुधी भाजून झाल्यावर सोलणे हा किचकट प्रकार ठरला होता असे आठवते.
हो खुप किचकट आहे तेव्हा खोल भांड्यात पाणी घेऊन भाजलेला दुधी घासून जळकट काळे आवरण काढायचे.
पण चव काही लक्षात राहण्यासारखी नव्हती.
होय ठीक ठाकच पण लेकीला भाज्या चावण्याचा भयंकर कंटाळा आहे.फोडी असलेल्या भाज्या तिच्यासाठी बाद होतात.नाहीतर खुपच बारीक कराव्या लागतात.त्यापेक्षा थेट मिक्सरमधून भरीतच सोपं वाटलं :)
अहो, (मराठवाड्यातील) मराठीत या फळभाजीला कद्दूच म्हणतात!*
हा कद्दू -
हे काशीफळ -
हे देवडांगर / डांगर
---
*बाकी, महाराष्ट्रातील इतर काही भागांतील काही लोक या फळभाजीला दुधी / दुधी भोपळा असेही म्हणतात.
अरे वा, छान आहे!
वाह, दुधीच्या भाजीला उत्तम
_/\_
मस्त.
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
मागे हे भरीत कुठूनसे बघून
In reply to मागे हे भरीत कुठूनसे बघून by गवि
शेवग्याचे सार
In reply to शेवग्याचे सार by वामन देशमुख
हो हो. अगदी. धन्यवाद.. !!
दुधी भाजून झाल्यावर सोलणे हा
कदृदूचे भरीत हा प्रकार कधी
कद्दू हा हिंदी शब्द माहिती
In reply to कद्दू हा हिंदी शब्द माहिती by Bhakti
अहो, कद्दूच!
मगर...
In reply to मगर... by कर्नलतपस्वी
हा हा!
भोपळ्याचे भरीत (तांबड्या
In reply to भोपळ्याचे भरीत (तांबड्या by गवि
गौरींच्या जेवणात तर असतेच
In reply to भोपळ्याचे भरीत (तांबड्या by गवि
दही वापरलं की ते रायतं उर्फ
फोडणीला काय काय वापरलं
In reply to फोडणीला काय काय वापरलं by आंद्रे वडापाव
घरातले काही लोक सध्या कांदा