साहित्यः
आप्प्यांसाठी
- एक वाटी चणाडाळ
- अर्धी वाटी मूगडाळ
- पाव वाटी उडीद डाळ
- एक इंच आलं, दोन मिरच्या, व तीन ते चार लसणीच्या पाकळ्या
- दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
- चवीनुसार मीठ
चाटसाठी
- गोड चटणी (जी शेवपुरीला बनवतो तीच)
- पुदीन्याची चटणी (तिखट)
- शेव
- बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
- सर्व डाळी एकत्र करून धुवून घ्याव्यात व त्यात साधारण दुप्पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवाव्यात
- दुसर्या दिवशी सकाळी त्या डाळी व आलं, लसूण, मिरच्या एकत्रित मिक्सरवर वाटून घ्यावे
- मिश्रण साधारण इडली पिठापेक्षा घट्ट ठेवावे
- त्यात चवीनुसार मीठ व चिरलेला बारीक कांदा घालावा
- शक्य असल्यास तासभर हे मिश्रण असेच ठेवावे ज्यामुळे आप्पे हलके होतात व छान फुगतात. सोड्याची गरज लागत नाही
- आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्यात तेल सोडावे
- गरम झाल्यावर त्यात हे मिश्रण चमच्याने घालावे व वरून झाकण ठेवावे
- अंदाजाने काही वेळाने आप्पे उलटावेत. उलटलेली बाजू सोनेरी रंगाची दिसायला हवी.
- याचप्रमाणे दुसरी बाजू सोनेरी झाली की आप्पे काढून घ्यावेत.





आप्पे तर रेडी झाले. आता चाट करताना:
- एका बाऊलमधे दोन ते तीन आप्पे कुस्करावेत.
- त्यावर दोनही चटण्या मुबलकपणे घालाव्यात
- वरून शेव कोथिंबीर पेरावी व चाटमसाला भुरभुरवावा
- आवडत असल्यास डाळिंबाचे दाणेही घालता येतात

आप्पे चाट ताव मारण्यास तयार आहे !
बाकी या पदार्थाचा जो मी स्टॉल लावला होता एका प्रदर्शनात, त्याचा अनुभव फारच छान होता. लोकांचा प्रतिसाद एकदम भारावून टाकणारा मिळाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
अरे वा!
आप्पॅअॅई़ईएपग्फप्पॅअॅई़ईएपग
अरे वा! शुभेच्छा!
स्टॉलसाठी शुभेच्छा!
छान !!
टक्कूची पाकृ म्हणजे छानच
लहान बाळ असुन स्टाल लावणार
हेच म्हणते! अभिनंदन व कौतुक!
In reply to लहान बाळ असुन स्टाल लावणार by palambar
प्रोत्साहनाबद्दल खूप धन्यवाद.
सुरेख पाकृ व फोटू. ग्रेट!
वाह सुंदर रेशिपी, झकास फोटो,
झक्कास,टक्कू.पाककृती आवडली.
फोटो दिसत नाहीयेत..
यावर गोडे दहीपण मस्त लागेल.
वा मस्त !
मुळात आप्पेच आवडता पदार्थ .
छान..
काय छान टुम्म फुगलेले आप्पे
आवडता पदार्थ
मस्त चाट
कॉम्बीनेशन मस्त
आप्पेपात्रासाठी एक पर्याय
मिनी मफिन मेकर किंवा मिनी
In reply to आप्पेपात्रासाठी एक पर्याय by आदूबाळ
पॅनकेक पॉपर्स ग्रिडल किंवा
In reply to आप्पेपात्रासाठी एक पर्याय by आदूबाळ
वाह.. टक्कूताई लय भारी..
झक्कास! प्रदर्शनास भेट देऊ
वा नावीन्यपूर्ण पाककृती!!
अप्पे पळवले ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari+१
In reply to अप्पे पळवले ? by मदनबाण
अप्पे चाट.... वाह...
अप्पे चाट.... वाह...
https://bolmj.wordpress.com