Skip to main content

सहज आणि सोपे फुड कार्व्हिंग - भाग २

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 18/01/2016 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
Apple 1 नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण सफरचंदाचा फॅन किंवा स्वीर्ल पाहणार आहोत. १. फॅन कितपत मोठा हवाय त्या नुसार सफरचंदा मधून एक भाग कापून घ्या. कापलेल्या भागाचे फार जाड नाहि आणि फार पातळ नाहि असे काप करुन घ्या. Apple 2 Apple 3 २. सुरवातीचा आणि शेवटच्या भागातून एक-दोन स्लाईस काढा. आता शेवटच्या भागापासून जरा वरती टुथपीक आरपार खोचा. बेस साठि सफरचंदामधून एक छोटा तुकडा कापून घ्या Apple 4 ३. कापलेल्या तुकड्यावर टुथपीकचा एक भाग खोचा. आता टुथपीकचा वरचा उरलेला भाग बोटाने ताठ पकडून ताठ पकडून पाकळ्या अलगद चक्राकार फिरवत विलग करा. शेवटि वरच्या टुथपीकची जी जागा उरेल त्यात आधी वेगळे केलेले स्लाईस चक्राकार खोचा. Apple 5 ४. वेगवेगळ्या रंगीत सफरचंदाचे रंगीत फॅन/स्वीर्ल करुन डायनींग टेबलची शोभा वाढवा. Apple 6 टीप: एक तर हा फॅन झटपट होतो पण आधीच करुन ठेवणार असाल तर तयार झाल्यावर अलगद लिंबूमिश्रित पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन फॅन ऑक्सीडाईज होउन काळा पडणार नाहि. हॅप्पी कार्व्हिंग.

वाचने 8536
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

झक्कास.. पुढच्या भागात आणखी एक दोन प्रकार द्या. हा भाग वाचायला सुरू करण्याआधीच संपला. ;)

किती सुरेख फॅन ! बघूनच गार झाल्या गेले. हा भाग फारच छोटा आहे.

सुंदर आहे ही कलाकृती.

मस्त आहे!