संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.
साहित्यः अर्धा कि.गूळ, दीड वाटी काळे तीळ, पाऊण वाटी दाण्याचे कूट, एक मध्यम वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी बेसन, पाब वाटी तेल, वेलची पावडर. हे सारणाचे साहित्य.
पारीसाठी साहित्यः अडीच वाट्या मैदा, अडीच वाट्या कणिक, अर्धी वाटी बेसन, चार चमचे तेल, मीठ. लाटण्यासाठी तांदूळ पिठी
कृती: पारीसाठी: मैदा, कणिक, बेसन चाळून घ्या. त्यात मीठ घाला. ४ चमचे तेल गरम करून पिठात घाला. पीठ घट्ट मळून, झाकून ठेवा.
सारणासाठी: गूळ किसून घ्या. खोबरे किसून घ्या. बेसनात पाववाटी तेल घालून बेसन तांबूस रंगावर भाजून गार करायला ठेवा. तीळ, खसखस,शेंगदाणे खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्या. तेलावर भाजलेले बेसन, तीळ, खोबरे, दाण्याचे कूट, खसखस हे सर्व गुळात नीट मिसळून घ्या.
पिठाची आणि तयार सारणाची सारखी गोळी करून घ्या. पिठाला वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरून वाटी बंद करा.
तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटावी. यापोळीची एक काळजी घ्यावी लागते, पोळी भाजताना मध्यम आचेवर भाजावी. तिळाच्या रंगामुळे पोळी करपलेली लक्षात येणार नाही.
मस्त तुपाच्या गोळ्याबरोबर पोळीचा आस्वाद घ्या.

तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटावी. यापोळीची एक काळजी घ्यावी लागते, पोळी भाजताना मध्यम आचेवर भाजावी. तिळाच्या रंगामुळे पोळी करपलेली लक्षात येणार नाही.
मस्त तुपाच्या गोळ्याबरोबर पोळीचा आस्वाद घ्या.
वाचने
16358
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच...
मस्तच ग!! तू काय शेकड्यानी
वाह, छानच , करुन पाहायला
जिन्नसांचं हेच प्रमाण पांढर्
जसं काय
In reply to जिन्नसांचं हेच प्रमाण पांढर् by सूड
अरे वाह, मस्तं. काळे तीळ
हो हेच प्रमाण चालेल
धन्यवाद. :)
In reply to हो हेच प्रमाण चालेल by अनन्न्या
मस्त प्रकार!
आई गं
वाह.
भयानक आवडतात गूळाच्या पोळ्या.
अहाहा! काळे तीळ आणणे आले!
या बरं इकडे पोळ्या खायला!
क्या बा...........त!
काळ्या तिळाची आयडिया खूप
मस्त! काळ्या तीळाच्या पोळ्या
मस्तं दिस्तायत गुळाच्या
सर्वांचे आभार!
क्या बात है!
वाह!
करंजीच्या कातण्याने
In reply to वाह! by स्मिता.
ह्या वेळी तुम्ही
भारी रे!
In reply to ह्या वेळी तुम्ही by सूड
आर्टिश्टीक पोळ्या आहेत त्या!
In reply to भारी रे! by चतुरंग
अगदी !! =))
In reply to आर्टिश्टीक पोळ्या आहेत त्या! by यशोधरा
मस्त झाल्यात पोळ्या!
अन्यना,क्या बात हे.एकदम सही.
अनन्न्या
आवडल्या,वा वा!
अनन्या, सूड दोघांच्याही
मस्त!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- Refugee