नमस्कार .....मंडळी ...मी मिपा ची नियमित वाचक असून सुद्धा कधी काही लिहिले नव्हते ....पण मुळातच,,,पदार्थ बनवण्याची आणि पक्की खवैय्ये(खादाड)असल्याने आज एक नवीन पाककृती सांगते....
बघा आवडतंय का.....पहिलीच पाककृती मांसाहारी टाकतेय....शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...
चिकन क्रिस्पी
साहित्य:
अर्धा किलो चिकन(बर्यापैकी बोनेलेस असलेले),
एक अंड ,
एक चमचा काळी मिरी पूड,
आलं लसूण पेस्ट एक ते दीड चमचा ,
मीठ,एक चमचा लाल तिखट,अर्धे लिंबू
एक ते दोन चमचे कॉर्नफ्लोर
कॉर्नफ्लेक्स मोठा बाउल .
कृती:
सर्वप्रथम तर चिकन धुवून त्यला आलं लसूण पेस्ट ,लिंबाचा रस ,मीठ,लाल तिखट,काळी मिरी पूड ,आणि अंड फोडून घालावे आणि हे मिश्रण २ तास फ्रीज मध्ये मरिनेट होऊ द्यावे .मधल्या वेळात कॉर्नफ्लेक्स मिक्सर मधून काढून भरड होईपर्यंत बारीक करून घ्या.दोन तासांनी चिकन मध्य कोर्नफ्लोउर मिक्स करून घ्यावे.मग चिकन कॉर्नफ्लेक्स च्या चुऱ्यात घोळून सोनेरी होई पर्यंत डीप फ्राय करून घ्या .झाल..अरॆए हाय काय नाय काय....झटपट starters तयार......
(....घरी केलेल्याचा फोटो नाही आहे आता..नेट वर चिकन क्रिस्पी टाकल्यावर ज्या काही images येतील तसेच होतात हे क्रिस्पी......नक्की करून बघा.....)
वाचने
10730
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
फ्लॉवरचे करण्यात येइल
फ्लाॅवरचे करून बघीतले ...
In reply to फ्लॉवरचे करण्यात येइल by hitesh
एक बात कहना तो हम भूल ही गये !
In reply to फ्लाॅवरचे करून बघीतले ... by सामान्यनागरिक
फोटु नाहीत त्याचा फाऊल...
मस्त्.चिकनचे छोटे तुकडे केले
मस्त्.चिकनचे छोटे तुकडे केले
In reply to मस्त्.चिकनचे छोटे तुकडे केले by एकविरा
छानच..
शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...?????
शेखसाहेब आले की घालतील हां
In reply to शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...????? by माम्लेदारचा पन्खा
ये ब्बात...............
In reply to शेखसाहेब आले की घालतील हां by कॅप्टन जॅक स्पॅरो
खूपदा करते हा प्रकार, मस्तच
खूपदा करते हा प्रकार, मस्तच
In reply to खूपदा करते हा प्रकार, मस्तच by उमा @ मिपा
मस्त रेसिपी