उकडशेंगोळे
काल गप्पा मारताना मी उकडशेंगोळे केलेत म्हणाले तर प्रश्न आला म्हणजे काय ? हा मराठवाड्यातला एक वन
डिश मील का काय म्हणतात तसला पदार्थ. इतरत्र शेंगोळे म्हणून करताना कोणी कुळिथ तर कोणी नाचणीचं पीठ
वापरतात. हे शेंगोळे नुसते वाफवुन मग कमी तेलावर परतून कोरडेही खाता येतात. थालिपिठाची पिल्लंच म्हणा ना.. !
पोटभरीचा पदार्थ म्हणून करताना तो असा वरणफळाच्या स्टाइलने करतात.
आजकाल रेशिपी देताना ती पण रंजक करण्याची आपल्या मिपावर फ्याशन आहे म्हणे. बघते मला जमतेय का. काल
एकाला याचा थ्रीडी फोटु हवा होता खायला ! असली दरिद्री स्वप्नं नकोत म्हणून ही घ्या रेशिपी....
(आजी मोड ऑन )
घरात चार कार्टी असली की गिळायला जरा जास्तच लागतं. मी आपली सक्काळ संध्याकाळ त्या चुलखंडाजवळ शेकून
निघते. सुना बर्या आहेत पण सुगरणपणा जरा कमीच. शिवाय त्यांच्या नौकर्या सांभाळत गाडं काही पोळी भाजीच्या
पुढं जात नै. वेळच नै हो... मग काय.. आपल्या जिभेला शेवाळ आलं की आपणच चार वेगळे जिन्नस करायचे न
पोरांच्या नावाने गिळायचे. त्यात यांची डायटची फ्याडं सांभाळून केलं तर बरंय. नाहीतर नाकं उडवितात. पाकिटातली
गोमूत्राच्या वासाची म्यागी नि सुपं ( फुळ्ळुक पाणी नुसतं) गिळताना ही फ्याडं आड येत नाहीत याकडे मीही
कानाडोळाच करते. ;)
तर आमच्या धाकट्याच्या थोरलीचे जिभेचे चोचले फार. त्यात तो पास्ता का फास्ता म्हणजे जीव ! म्हणलं अगं त्या
पास्त्याच्या पुंगळीसारखी होशील ! जरा घसघशीत खावं... तर म्हणे आज्जी मग तु दे असं चटकमटक... म्हणलं बरं..
जन्म गेला यांच्या जिभेची कौतुकं करताना. आता नातवंडांसाठी मागं हटले तर नावाची लक्षुम्बाई नाही !
झालं. तरातरा गेले सैपाकघरात. ज्वारीचं पीठ घेतलं २ वाट्या, अर्धी वाटी बेसन आणि उगीच चिकटपणाला थोडिशिक
कणिक. त्यात घातलं चमचाभर लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि मीठ. घसाघसा मळलं नि
ठेवलं बाजूला. कढईत बचकाभर लसणाची फोडणी केली, त्यात पण तिखट मीठ हळद घातलं नि तांब्याभर पाणी
ओतलं. उकळी येऊस्त्वर वाट बघावी म्हणलं तर देवळापासच्या येश्वदाबाई आल्या गावभरची धुणी बडवायला. ( ते
तुमचं गासिप कि काय तेच ) मग तिंबलेलं पीठ घेतलं न बसले त्यांच्यापुढं. कडबोळ्यासारखे शेंगोळे वळायला तसा
वेळ नाही लागत. पण म्हटलं या बाईला मी रिक्कामटेकडी नै वाटू.. ! येश्वदेच्या तोंडच्या पट्ट्यावाणीच भराभरा शेंगोळे
वळले. तवर फोडणीच्या पाण्याला आधण आलं होतं. खळ खळ उकळीत एकेक शेंगोळे टाकले. तेवढ्यात १०८ वेळा
रामचं नाव पण घेऊन झालं. कामात काम करायचं झालं ! मग येश्वदेला चहा करुस्तोवर शिजले चांगले. बोटानी
चेपले तर आतपर्यंत शिजलेले दिसले. हो... मला नै बै उठसुठ तोंडात घालत बसायला आवडत ! मग येश्वदेला खाय
म्हणलं तर तिला प्रदोष ! धाकट्याची थोरली बसली होती गप्पा हाणत फोनवर. तिला हलवून बोलावली. म्हणलं ये
तुला गावरान पास्ता केलाय. "पास्ता?" म्हणत लेकरु टुण्ण्कन उडी मारून आलं जवळ. अशी माया आली लेकराची...
गुळाचा सुपारीएवढा खडा घेतला न टाकला शेंगोळ्यात. उगाच उकडलेलं खाऊन पोट नको फुगायला. तेवढ्यात खमंग
वासानं की काय बाकीची पोरंटोरंही आली. बसली खायला न काय सांगू सगळी कढई १० मिनिटात फस्त की वो...
"अमेझिंग पास्ता आज्जी" ! मला काय ते कळलं नाही. तरी पदर तोंडाला लावून कवतुकानं हसले झालं.
तर आसं झालं. साधं मेलं जवारीचं पीठ. त्याचे थोडे लाड केले की गप पोटात गेलं लेकरायच्या. अशा भाकरी बडवून
खाल्ल्या असत्या व्हय ???
आमच्या सुना कधी असं शिकायच्या रामाला ठावुक ! येते हो आता. दिवेलागणीची वेळ झाली.
एक राहिलंच. मला माहीत व्हतं तुम्ही फोटु मागणार. पण मला बै तसं सांगायची लाज वाटली. पण पोरं पटापटा बोटं
चाटत सुटली तेव्हा थोरल्याच्या रांगत्याला म्हणलं काढ बाबा फोटु. अस्सा साजरा फोटु काढला माझ्या लेकरानं.
अर्धाच देत्ये. कारण उरलेल्या अर्ध्या फोटोत त्याची ढेरी आलीय. दृष्ट नको लागायला. ( आजी मोड
ऑफ) ;)
आता यातली नेमकी रेसिपी आपापल्या जबाबदारीवर शोधून करणे ;) :)
उत्तर द्या
वाचने
47900
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
कारण उरलेल्या अर्ध्या फोटोत
कुळ्थाच्या पिठाने नेह्मीच
करुन बघण्यात येईल!
आजी बाई जोरात Smile मस्त
हाहाहा!
आज्जे...
स्टाईल लाजवाब! आम्ही वरणातली
In reply to स्टाईल लाजवाब! आम्ही वरणातली by मनिष
मनिष, वरणातली फळं वेगळी.
In reply to मनिष, वरणातली फळं वेगळी. by मितान
हो! पण ती साधारण अशीच दिसतात,
आता मात्र वरणफळाची रेशीपी
झकास
आवडता पदार्थ..
अाजीची रेशिपी लई भारी
खुप दिवसांनी पाहिले उकड
In reply to खुप दिवसांनी पाहिले उकड by निखिल देशपांडे
निखिल, तुझी आठवण आलीच हे
In reply to निखिल, तुझी आठवण आलीच हे by मितान
मस्त पाकृ, आजी स्टाईलपण!
मस्त रेसीपी...
मितान
शेंगोळे पण मस्त आणि त्यांची
आहा...
आजी आणि नातवंड लई भारी !
यम्म यम्म यम्म … विकांताच्या
मस्त.
In reply to मस्त. by एस
दाण्याच्या आमटीसारखा काहीसा
In reply to दाण्याच्या आमटीसारखा काहीसा by मितान
नक्कीच!
मस्त... नक्की करण्यात येतील .
भारी प्रकार दिसतोय...
भेंडी नेमका लंच हवर च्या आधी
मस्त वर्णन मितान.माझ्या
+१
आजीच्या नातवंडांनी त्याचा
वावा..
रेशिपिच्या मूळ चवी पेक्षा,ती
पाकिटातली
In reply to पाकिटातली by गवि
खरंय गवि
एकच नंबर !! आज्जी मोड आवडला.
मस्तच गं मितान!
मस्त रेसिपी. ज्वारीच्या
चटकमटक पदार्थ आणि फोटो आणि
लइच झ्याक हाय की व ही रेशिपी
फोटू बी लई मस्त हाय
आमच्या ढेरीला घरातल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }मस्त लिहिलय!
मस्त लिहिलंय
बाकी लसूण अगदी उजव्या हाताने
खुप छान लिहलंयस मितान.मी
जबरी दिसतेय पाकृ
उकड शेंगोळ्यांसोबत वर्णनही
मस्त
करून बघितले शेंगोळे ..चव
मस्त पाकृ आज्जी..करून बघीन..
वीकांती करुन पाह्यले. पण
In reply to वीकांती करुन पाह्यले. पण by सूड
फार छान ! मी पण तुमच्या
एक नाव सोडलं तर हा पदार्थ
In reply to एक नाव सोडलं तर हा पदार्थ by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी..
हा पदार्थ करून पाहिला. छान
बनवले आज!!
आजी मोड आणि पाकृ दोन्ही आवडलं
वाह..
हीतेस भाय फोटु जरा बारीक करके
..
वॉव
In reply to वॉव by दिपक.कुवेत
.
हा पदार्थ करून बघणारांचे आणि
In reply to हा पदार्थ करून बघणारांचे आणि by मितान
http://www.maayboli.com/node/52479
काल व्हॉट्सअॅपवर ही पोस्ट
हो हो
तुझा आज्जी मोड व्हॉटसअपवर
भारी !!
लेखनशैली जबरदस्त!