Skip to main content

चहा नक्की कसा करावा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 03/08/2014 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ??? कुणी काही प्रयोग करते का ?? मी जनरली अर्धा लिटर दुधाची पिशवी फोडून त्यात अर्धा कप पाणी घालून तापवायला ठेवतो त्यात 'वाह ताज' ३-४ चमचे तयार ठेवतो ...आणि दुध तापायला लागले कि थोडा थोडा चहा घालून हलकेच ढवळतो मधून मधून ...(साय पण विरघळली पाहिजे) ...GAS मंद करून हळूहळू एक हलका बदामी रंग येईस्तो प्रक्रिया चालू ठेवतो आणि मग गाळून (वरील चोथा थोडासाच दाबून...फार नाही) मग तो वाफाळता चहा २ पातेल्यात चढवतो (वरून ओततो ...) जरा छान फेस झालं कि २ मोठ्या मग्स मध्ये भरून कलत्रासहा पितो ... कधी फारच म्हणजे अर्ल ग्रे च्या २ टी bags फक्त २-३ वेळा बुडवून काढतो (एकूण डुबकी चा वेळ ५-६ सेकंद इतकाच)... फारच मस्त लागते ... आता तुम्ही सांगा ...

वाचने 64761
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला. चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

>>चहा 'नक्की' कसा करावा ?? मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!