Skip to main content

झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 23/07/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
. कोल्हापूरी मसाल्याच्या अनेक पाककृती आंजावर, पुस्तकांमध्ये शोधल्या आणि मग माझ्या अंदाजाने , आमच्या चवीत बसेल अश्या प्रमाणात तो बनवला. कोल्हापूरी मसाला साहित्यः १०-१२ लाल सुक्या मिरच्या ३-४ तमालपत्र २ टेस्पून सुके खोबरे ३-४ लसूण पाकळ्या ३-४ कढीपत्ता ४ हिरवे वेलदोडे १ दालचिनीची काडी १/२ टीस्पून काळीमिरी ३ मसाला वेलदोडे १/२ टीस्पून लवंगा १ नागकेशर १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून हिंग १ टीस्पून खसखस ( पांढरे तीळ माझ्याकडे नव्हते, असल्यास ते ही १ टीस्पून घ्यावे) १ टीस्पून धणे थोडेसे दगडफूल १ टीस्पून शहाजीरे मीठ . पाकृ मसाला: एका नॉन-स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेलावर काळीमिरी, हिरवे वेलदोडे, मसाला वेलदोडे, दालचिनी,धणे, शहाजीरे, दगडफूल, नागकेशर, खसखस, लवंगा परतवून घ्यावे. एका ताटात हा खडा-मसाला काढून घ्यावा व त्याच पॅनमध्ये थोड्या तेलावर सुक्या मिरच्या व तमालपत्र खमंग परतवून घ्यावे. ते ही त्याच ताटात काढून पॅनमध्ये आधी कढीपत्ता कुरकुरीत तळून घ्यावा व त्याच पॅनमध्ये लसूण + सुके खोबरे खमंग भाजून घ्यावे. . सर्व मसला एकत्र करावा व पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवर बारीक दळावे. वाटलेल्या मसाल्यात थोडे हळद, मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे. ( हळद, मीठाबरोबरच आता हवे असल्यास एक चमचा काश्मिरी मिरची पावडर ह्यात मिसळु शकता) तयार मसला हवाबंद डब्यात भरून ठेवावा. लागेल तसा उसळी, चिकन, मटणात वापरु शकता. . साहित्य चिकन रस्सा: १ किलो चिकन साफ करुन आले + लसूण + हि. मिरची पेस्ट लावून मॅरिनेट करावे. १ छोटा कांदा बारीक चिरलेला २-३ लसूण पाकळ्या १/२ वाटी खोवलेला ओला नारळ थोडीशी कोथींबीर १/२ छोटा कांदा चिरलेला फोडणीसाठी ३ टेस्पून तयार कोल्हापूरी मसाला (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार . पाकृ: एका पॅनमध्ये थोड्या तेलावर लसूण पाकळया परतवून घ्यावा. त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबीसर परतवून घ्यावा. आता त्यात ओला नारळ घालून तांबुस रंगावर परतणे. थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात सगळे एकत्र करावे, त्यात थोडी कोथींबीर घालावी व थोडे पाणी घालून मुलायम वाटून घ्यावे. . मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्यावे. वाटलेला मसाला घालून चांगले परतावे. त्यात मॅरिनेट केलेले चिकन, हळद, कोल्हापूरी मसाला घालून एकत्र करावे व परतावे. आवश्य्कतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवावे. चिकन शिजत आले की चवीपुरते मीठ घालावे व झाकून पुन्हा शिजू द्यावे. . झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे. आवडीप्रमाणे भाताबरोबर, भाकरी, वडे, आंबोळी, घावन्यांसोबत गरम सर्व्ह करावे. .

वाचने 31602
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया