Skip to main content

दाल बाटी.

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 10/07/2013 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्ष झाली बरं? बाळ्या दोन वर्षाची असेल. तेंव्हा, तेंव्हा गेलो होतो आम्ही राजस्थान पहायला. ithe तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी. वेगळ काही खायचं म्हंटल की माझ्या नवर्‍याच्या कपाळावर सतराशेसाठ आठ्या पडतात. पण आता सतराशेसाठमध्ये एकसश्ठावी आठी मी असल्याने, त्याला नंदीबैलासारखी मान हलवत गपगुमानं हॉटेलमध्ये ही ऑर्डर द्यावी लागली. अर्थात त्याच नशिब जोरावर असल्याने दालबाटी अशी रोज नाही बनत अन ऑर्डर दिल्यावर अर्ध्यातासात तर नाहीच मिळणार अस पुणेरी स्टायल उत्तर मिळालं. मग दुसर्‍यादिवशी तोच रिक्षावाला आम्हाला जेथे हमखास दाल-बाटी मिळते अश्या ठिकाणी घेउन गेला, अन राखेत भाजलेल्या बाटीज विथ उडदाची आमटी अस खाण आम्ही तोंड वेडवाकड करत खाउन बाहेर पडलो. (त्यानंतर नवर्‍याने काय आकांडतांडव केला असेल तो मी येथे उधृत करु इच्छीत नाही) एकुण काय प्रकरण असतं याची चुणु़क आम्ही पाहिली अन परत या डिशकडे वळायच नाही असा अलिखीत करार केल गेला. पण मेलबर्नमध्ये किर्ती सिन्हा म्हणुन राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।) मैत्रीण भेटली. माझ चिकन हाणुन गेल्यावर तिने आम्हाला तिची दाल-बाटी खायच आमंत्रण दिलं. अर्थात आम्ही घरुन निघताना पोटभर खाउन निघायची खबरदारी घेतली होतीच, पण काय आश्चर्य? अहो चक्क खुसखुशीत अन चमचमीत निघाली ही घरची दाल-बाटी. त्यात अन ती "कायस्थ" पद्धतिने बनवल्यामुळे म्हणे खुपच वेगळी असते. मग काय? त्यानंतर घरात अधुन मधुन हा प्रकार बनायला लागला. तर मंडळी गप्पा फार झाल्या आता कामाला लागा. तसेही चारच दिवस उरले कार्याला तर अजुन नवर्‍यामुलाला केळवणाला अथवा गडनेराला नसेल बोलवलं तर दाल-बाटी बनवुन अगदी खुशाल आमंत्रण धाडा. तर पहिला साहित्यः- १/२ वाटी तुर डाळ १/२ वाटी अख्खे चणे (हरभरे) १/२ वाटी हिरवे मूग १/२ वाटी राजमा १/२ वाटी मसुर ३/४ वाटी काळे उडीद हे सगळ स्वच्छ धुवुन एक अर्धातास भिजत ठेवा. ithe अर्थात आता अर्धातास करायच काय म्हणुन मग मी असा टाइमपास केला... ithe ithe ithe अहो असं स्वच्छ उन्हं आल होत घरात म्हणुन सांगु ? तर असो. आता या भिजलेल्या डाळीत १/२ कांदा चिरुन १ टोमॅटो चविप्रमाणे मिठ, हिंग हळद अन आमचं कोल्हापुरी तिखट (माझ्या सिंगापुरच्या मैत्रीणींच्या दाल मख्खानी माझ्या या तिखटाशिवाय होत नव्हत्या. जाम डिमांड होता मैत्रीखात्यात) हे सर्व घालुन मस्तपैकी शिजवुन घ्या. ithe ithe आता फोडणी - नेहमीचीच जीरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग लसूण अन १/४ चिरलेला कांदा. ithe मोठ्या पातेल्यात तेल चांगले गरम करुन गॅस बंद करा. आता त्यात मोहरी घालुन तडतडु द्या, मग जीरे घाला मग कडीपत्ता अन लसूण घालुन गॅस पुन्हा मंद सुरु करा. आता त्यात कांदा घालुन मग शेवटी हिंग टाका. या फोडणीवर शिजलेली डाळ घालुन थोडे पाणी मिसळा. तिखट मिठ आपण डाळ शिजताना घातल्याने आता फक्त अ‍ॅडजस्ट करा. झाली दाल तयार. आता बाटी. बाटी साहित्य- गव्हाचे पिठ चार वाट्या. १/४ चमचा ओवा ३/४ ते १ वाटी तेल. वरुन लावायला कलौंजी (फ्लेवरसाठी ऑप्शनल) ithe ithe आता या पिठात ओवा अन तेल गरम करुन मोहन घाला. मोहन इतक हवे की पिठाचा मुटका करुन उडवला (हलकेच ! लगेच बॉलींग नका करु) तरी तो टिकला पाहीजे( हाच तो कायस्थ टच!!) आता हे पिठ जरा घट्टसर मळुन घ्या. त्याचे छान जरा चपटे अन आत मध्ये किंचीत हॉलो गोळे तयार करा अन ओव्हन मध्ये २०० सेंटीग्रेड्वर साधारण चाळीस मिनिट भाजुन घ्या. हे गोळे वळताना आपण मोदकाला कशी पाती तयार करत जातो तशी तयार करुन मिटवायची . ithe itheitheitheithe तयार आहे दाल-बाटी. itheithe __/\__ अपर्णा

वाचने 125274
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

@श्रुती ...मराठवाडा का ? मच्याकडे ती जरा पातळ असते व केवळ त्यां साठी तुरीची डाळच वापरतो तुमच्या पद्धतीने हि एकदा नक्की करून पाहिलं >> करेक्ट ...विषेश सांगायचे म्हणजे मी जी खाल्ली त्यात हळद टाकत नाहीत , तर ती बाटी त टाकतात :)

त्या पेक्षा तूर दाल मध्ये ज्वारी ची भाकरी कुस्करून, तूप घालून खालेल्ला बरा … स्वाद लागतो

In reply to by कर्ण

ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला सांगीतली होती? ऑ? झाली का पंचाइत? जावा आता पिठ शोधायला. आणि हे बघा भाकरीची तुलना बाकी कोणत्याही चवीशी होत नसल्याने आम्ही ती कटाप समजतो कळलं? नाव कर्ण आहे मग काय भाकरी दान करणार का काय? अन करत असलात तर कोठे दान करता तेही कळवा. उगा सक्काळी सक्काळी डोक्याला शॉट...

In reply to by स्पंदना

बुट्टीतल्या भाकर्‍या..त्यातली एखादी शिळी. त्या शिळ्या भाकरीवर तेल-तिखट-मीठ अन मेतकुट कालवून फासलेलं, सोबत झुणका नायतर पिठलं, बचकभर ठेचा/खर्डा, लसणाच्या चटणीचा गोळा, पातीचा कांदा, गाडग्यातलं कवडी-कवडीचं दही, वाटीभर काकवी, त्यात साजूक तूप....अन हे सगळं हादडून झाल्यावर गप्पा मारत चघळायला एखादं ऊसाचं कांडकं. :D

In reply to by धमाल मुलगा

कुणी हाय का? धम्याची सुपारी द्याची हाय! कोण हाय का तयार? धम्या तुझ दिस भरलं! कुटल्या देवाच नाव घ्याच आसल तर लागलीच घे. म्या सुपारी काढल्या तुझ्या नावाची.

In reply to by स्पंदना

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी.... :)

In reply to by स्पंदना

घोळ मिटवून आज सकाळी घरला पोचलो. आनि पयला पोराला बगिटलो. त्ये झालं की .... आनि मग साडेपाच म्हैन्यांनी पोहे खाल्लो. (च्यामारी त्या अल्जेरियन लोकांच्या. हे सुट्टी संपेस्तवर ;) ) आनि दुपारी जेवताना काय जेवलो म्हायत्ये? मेथीची भाजी लसूण फोडणी वाली नि जोंधळ्याची भाकरी. तुमाला अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ! ;)

In reply to by प्यारे१

कितीही अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ केलास तरी वैनीच्या हातच्या भाकरीचा राग नाही धरणार मी, आज ना उद्या मला खाऊ घालेलच ती. खाऊन घ्या! खाऊन घ्या! उगा भाव नका मारु!

सर्वात वरचं रंगीबेरंगी कुंटूंब आवडलं. या पाककृतीवरून एकदा चव घ्यायला हरकत नसावी असंच वाटतंय.

अपर्णा, मस्तच गं! इन्दुरला एका मारवाडी लग्नात हा पदार्थ संपवताना जीव गोळा झाला होता!! कसाबसा संपवला नाही तर नवर्या मुलीच्या वडिलांनी अरे, एतनेसे क्या होगा डॉक्टर, करत एक रास ताटात वाढली होती, तेव्हा अक्षरशः हात जोडुन पळुन आले होते!!

सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई, रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करिते लवकर न्येई ग तिला भवानी आई, रोडगा वाहीन तुला भवानी आई ....................