तळलेले फणसाचे गरे
....बरेच दिवस मनात होतं या प्रकारा बद्दल माहिती देण्याचं. अता तसं पहायला गेलं तर या पाककृतीला फारशी मोठ्ठी कृती नाह्हीच आहे.पण तरिही मी माझ्या भावाच्या सासुरवाडीला (पावसला) त्यांच्याकडे गरे विकतात हे कळल्यावर, एकदा गेल्यावर पाहिनच कसे करतात ते... असं ठरवल होतं. गेल्यावर्षी अशीच एक उडती ट्रीप तिकडे घडली होती.तेंव्हा मी माझ्या सवयी प्रमाणे याचं व्होडिओ चित्रण (खास माझ्या पद्धतिने) करुन ठेवलं होतं. त्यात काल ख.फ.वरती गर्यांचा विषय हीटवर आलावता..मग म्हटलं, ही पाककृती प्रोफेशनली तयार करणारे श्री.मुरलीधर पंडीत यांना आपण ती इथे टाकुन त्यांनाच-प्रेझेंट करू.
(अर्थातच मी गेल्या महिन्यात कोकणात गेलोवतो,तेंव्हा अर्धा फणस आणला आणी मोजुन दोन तास हा खाली पाककृती नावानी जो लिहिलाय तो उद्योग करुन पाहिला,तेंव्हा हा मि.पा.वर टाकेन असं वाटलं सुद्धा नव्ह्तं... म्हणुन फोटु नाहित. नायतर आंम्हाला काय हौस कमी आहे? ;) .... तरिही श्री.पंडित यांच्या इथे तयार होणार्या ''तळलेल्या गर्यांची'' माझ्या-तोंडि माहिति सह व्हिडिओ क्लिप खाली देत आहेच... म्हणजे मारुती आमचा वाचा,आणी गणपति त्यांचा पहा! ;) )
थोडक्यात ही पाककृती अशी आहे---
साहित्यः-
१)कच्चा फणस
२)तो कापुन सोलण्यासाठी-वाटित तेल आणी हतात रग
३)मिठ-पाणी
४)खोबरे तेल
कृती:-
अता प्रथम अर्धा कच्चा फणस कोकणात रहात असाल तर झाडावरुन, कोकण सोडून-इतरत्र रहात असाल तर मार्केट मधुन...आणी तिथे तो मिळायची जी शाश्वती असते,त्या अनुषंगानी कोकणातनं कुणाबरोबर तरी येश्टीत्न पार्सल... असा घरी आणावा.
नंतर घरी आपल्या विळिवर कोबि कापायचा डब्बल येक्स्पिरियन्स मनात ठेऊन अडवा घेऊन मधोमध कापावा...आणी नंतर सुरिने(खरं म्हणजे सुर्यानेच...! ;) ) प्रत्येक अडव्या भागाचे उभे चार भाग करावे...
हं.... अता कंबर कसायची हं आता!
नंतर एखादं पोत्या सारखं दणकट आसन मांडीला घेऊन त्यावर बसावं.मग फणसाचा एक भाग हतात घेऊन तेल लावलेल्या हतानी गरे फणसातनं बोटानी ओढुन वेगळे करावेत. अता वेगळ्या झालेल्या गर्यांना फणसाच्या र्हायलेल्या दशा असातात त्याही नीट साफ करुन घ्याव्यात.यानंतर हतानीच गर्यातली अठळ(बी) वेगळी करुन गर्याचे दोन भाग करावेत... ( हुश्श्श... आमच्या सारख्या हौशी मंडळींचा निम्मा दम यातच निघतो. ;-) ) इथे २५ ओव्हर झाल्या ;) नंतर त्या गर्यांना फिंगरचिप्स प्रमाणे सुरुनी किंवा प्रोसेसरमधे उभे कापुन काढावे... मी पंडित काकांच्या प्रोसेसिंग युनिट मधे पाहिलं तेंव्हा त्यांनी तर १ खास गरे कापायचं यंत्रच करुन घेतलय. ते का? ते सुरिनी गरा पाटावर धरुन उभे छेद देताना मला कळलं.(इथेही गर्यांचा त्यांचा जन्मभुमितला-चिकटपणा हा गुण कापताना हताला चिकटुन मानसिक छळ वाढवत असतोच,पण काय करणार हौस आहे ना...मग भोगा! ;) )
नंतर कढैत अर्धाकिलो खोबरेल तेल मंद आचेवर तापत ठेवावं. दुसर्या बाजुला एका पातेल्यात अर्धा लि.पाण्याला अर्धा चमचा मिठ घालून ढवळुन मिठ-पाणी तयार करुन ठेवावं. तोपर्यंत तेल कढईवर बरच तापल्याचं आपल्याला लक्षात येइल! मग हतानी हळुहळु गरे कढईत सोडावे. मधे मधे झारा मारुन वर खाली करावे.आणी २/३ मिनिटानी,ओंजळभर गर्यांना २/३ चमचे मिठ-पाणी या प्रमाणात डाररेक कढैत गर्यांमधे मिठ-पाणी सोडावं...(तेल तडतडुन-अंगावर वगैरे येत नाही...काळजी नसावी...स्वाभाविक आहे हो,,,मिठ कोकणातलच ना..., फणसावर बरं तडतडेल ते ! ''पाण्यातुन पाजल्या मिठाला फणस जागतो'' असं म्हणतात,ते खोटं नै! ;) ) अता अजुन दोन मिनिटं झार्यानी गरे खाली वर करत रहावे. आणी एका बाजुला कागद पसरून तळलेले गरे त्यावर काढावे. गार झाले की हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. उसके बाद क्या...??? जब चाहो... खोलो- निकालो- और खा लो!!! :)
टीपा-
१)अर्धा कच्चा फणस म्हणजे पूर्ण वाढलेला अर्धा कच्चा फणस... बारिक साइजचं फळ नव्हे!
२)वितभर लांबिच्या विळिवर फणस कापायला जाऊ नये... ती आपली कोबिलाच बरी!!! बाजारातनं सुरा आणावा.
३)गरे पहिल्यापासुन ते शेवट पर्यंत मंद आचेवरच तळावे... नायतर, ''कोकणातला फणस-सुद्धा आपल्यावर जळतो '' अशी आत्मविदारक प्रतिक्रीया आपल्या मनात उमटेल.
४)गरे केल्यापासुन दोन दिवस चविला अतिशय फ्रेश लागतात. तिन दिवसानी ही चव अगदी थो....डी - उतरते.
==========================================================================
आता आपण खाली पाहाणार आहोत,श्री.पंडित यांचे इथे तयार केल्या जाणार्या ''तळलेल्या गर्यांची'' व्हिडिओ क्लिप.
वाचने
20181
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
कशासाठी..?
In reply to कशासाठी..? by मोदक
काल
In reply to काल by पैसा
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
काय झाले होते रे..?
In reply to काय झाले होते रे..? by मोदक
कै नै. फणसगप्पा चालल्या
In reply to कै नै. फणसगप्पा चालल्या by प्रचेतस
अच्छा.. म्हणून आज बुवांच्या
एक निर्व्याज प्रश्ण.
एेला! नशीब घरात कालच दीड किलो
हम्म्म्म्म!
In reply to हम्म्म्म्म! by प्रभाकर पेठकर
अनसा-फणसाची भाजी
लई भारी गुर्जी.
आले का?
वा!!!!!!!!!!!!!!!!!.
In reply to वा!!!!!!!!!!!!!!!!!. by प्रचेतस
@काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर
In reply to @काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर by अत्रुप्त आत्मा
पण त्रुप्ती ही मोक्षाची पहिली
In reply to पण त्रुप्ती ही मोक्षाची पहिली by प्रचेतस
नो नाय नेव्हर..
In reply to नो नाय नेव्हर.. by मोदक
कोण त्रुप्ती?
In reply to कोण त्रुप्ती? by पैसा
मोक्षाची पहिली पायरी
In reply to पण त्रुप्ती ही मोक्षाची पहिली by प्रचेतस
@पण त्रुप्ती ही मोक्षाची
In reply to @पण त्रुप्ती ही मोक्षाची by अत्रुप्त आत्मा
अता १ काव्य अगोबा वरही रचा
In reply to वा!!!!!!!!!!!!!!!!!. by प्रचेतस
एकदाचा धागा टाकल्यामुळे आता
एकदाचा धागा टाकल्यामुळे आता ते काही दिवस अत्रुप्तीतून बाहेर पडून ते त्रुप्तीच्या आनंदात विहरत बसतील.वल्ल्या.. आज एक मिपाकर म्हणून मला ही प्रतिक्रिया आवडली नाही. ;-)In reply to एकदाचा धागा टाकल्यामुळे आता by मोदक
आज नाही आवडली? हरकत नाही.
In reply to एकदाचा धागा टाकल्यामुळे आता by मोदक
बरं मग?
In reply to बरं मग? by प्रचेतस
तुम्ही बुवांच्या हळव्या आणि
In reply to तुम्ही बुवांच्या हळव्या आणि by मोदक
बुवा..आणि ते पण हळवे आणि
In reply to बुवा..आणि ते पण हळवे आणि by प्रचेतस
मांसं यद्यपि तत्त्याज्यं
In reply to मांसं यद्यपि तत्त्याज्यं by बॅटमॅन
साष्टांग डंडवत
In reply to मांसं यद्यपि तत्त्याज्यं by बॅटमॅन
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं
In reply to अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं by पैसा
दृष्ट्वैतच्च मुदितोऽहम्
In reply to दृष्ट्वैतच्च मुदितोऽहम् by बॅटमॅन
आता संस्कृत मधून येवढं तोडताय
In reply to आता संस्कृत मधून येवढं तोडताय by डॉ सुहास म्हात्रे
णो स्ब्जक्ट
In reply to आता संस्कृत मधून येवढं तोडताय by डॉ सुहास म्हात्रे
बॅटमॅनचं दुसरं नाव
In reply to बुवा..आणि ते पण हळवे आणि by प्रचेतस
बुवा..आणि ते पण हळवे आणि
बुवा..आणि ते पण हळवे आणि निरागस???अरे तेच तर दोन वायफळ शब्द आहेत माझे. :-D खाटीक बुवा.. :-))In reply to बुवा..आणि ते पण हळवे आणि by प्रचेतस
आगागागागागा... आगोबा!
In reply to आगागागागागा... आगोबा! by प्यारे१
वल्ली एकदम भारी रे
In reply to आगागागागागा... आगोबा! by प्यारे१
मस्त चित्र!!
In reply to वा!!!!!!!!!!!!!!!!!. by प्रचेतस
अणुमोडण
पाकृ आणि शब्दांकन, दोन्हीही
मस्त..
मस्त
जबरदस्त... खुप आवडीचा प्रकार
वा चटकदार गर्यांसारखे...
मस्त..
मस्त !
आहाहाहाहा ! मेवा !
जबरदस्त.... मस्त पाककृती
एकूणच फणस कापणे सोलणे म्हणजे
वॉव!!!
तोंपासु..
फणसाचे तळलेले गरे आवडतात.
मस्त!!
मस्तच पाकृ !!
हे असे असते होय! आभार!
च्यायला नशीबच फुटके म्हणायचे.