साहित्यः तांदुळ, हरभ-याची डाळ, उडदाची डाळ, हळद मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, आले कढिपत्ता.
प्रथम २ वाट्या तांदुळ, १ वाटी हरभ-याची डाळ, १/२ वाटी उडदाची डाळ हे एकत्र करून मिक्सरवर जाडसर दळून घ्यावे.
या जाडसर पिठाला भरडा असे ही म्हणतात. मिरच्या व कढिपत्याची पाने बारीक चिरून घ्यावी, आले बारीक पेस्ट करून घ्या
दोन ते तीन वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे त्या मध्ये १ चमचा हळद घालावी चांगली उकळी आल्यावर वरील पिठ
त्यात घालावे व लगेच गैस बंद करावा पिठ ढवळून लगेच झाकण ठेवावे.
वाफ जिरू द्यावी. तयास झालेल्या पिठाचा गोळा मळावा. मळताना त्यात चवी नुसार मिठ, हिरच्या मिरच्यांचे अगदी बारीक चिरलेले तुकडे, वाटलेले आले, कढिलिंबाची पाने बारीक चिरलेली हे घालावे. गोळा चांगला मळून घ्यावा. मळ्ताना पाणी वापरू नये.
या पिठाचे छोट्या पुरीच्या आकाराचे वडे थापून घ्यावे हे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी डिप फ्राय करावेत. खमंग व खुशखुशीत वडे तयार. टमाटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करावेत.
टिपः उकळीला पाणी ठेवताना जरूरीपुरतेच पाणी असावे पाणी जास्त नको.
स्वादासाठी पीठ मळताना त्यात धन्याची पावडर घालू शकता.
हे गरमच चांगले लागतात.
डायट असेल तर या मळलेल्या गोळ्यामधे बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून त्याचे कमी तेलावर थालिपीठ करू शकता. ते सुध्दा छान लागते.

वाचने
10680
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिलेली चित्रे मजकुराच्या मधे मधे
वरच्या बारमध्ये मदत पान आहे
In reply to दिलेली चित्रे मजकुराच्या मधे मधे by गौरीबाई गोवेकर
pakkruti baddal kahi....
छान
वडे छान दिसतायत. चित्रांच्या
फारच छान रेसिपी....दाल वडे
डाल वडे वेगळे..
In reply to फारच छान रेसिपी....दाल वडे by हिरवळ
छान!
आंम्हाला हे वडे श्राद्धाला
छान दिसताहेत वडे ..
अरे वा.......मस्त मस्त
मग आता हे पण करून बघ..
In reply to अरे वा.......मस्त मस्त by जयवी
वा वा वा