रवा इडली (प्रकार २)
साहित्यः
जाडा रवा १ वाटी
दही १ वाटी
मीठ चविनुसार
इनो सॉल्ट १ लहान चमचा.(टी स्पून)
फोडणी साठी:
मोहरी १ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
भिजवलेली चणा डाळ २ मोठे चमचे (टेबल स्पून)
उडीदाची डाळ १ मोठा चमचा
मिरच्या २-३ बारीक चिरुन
कढीलिंबाची पाने ५-६
तेल २ मोठे चमचे.
सजावटः
जाड किसलेले गाजर ४-५ मोठे चमचे
कोथींबिर ४-५ मोठे चमचे
तळलेले काजू तुकडा १५-२० (तुकडे)
वाफवलेले मटार १/४ वाटी
कृती:
दह्यात पाणी मिसळून घट्ट ताक करून घ्या.
रव्यात हे ताक घालून मिसळा. चविनुसार मीठ मिसळा.
तेल तापवून त्यात मोहरी आणि जीरे घाला.
मोहरी जीरे तडतडले की त्यात भिजवलेली चण्याची डाळ, चिरलेली मिरची, उडीदाची डाळ, कढीलिंब घालून चण्याच्या डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतुन घ्या.
आता, ही फोडणी ताकात भिजवलेल्या रव्यावर ओतून नीट मिसळून घ्या.
हे मिश्रण अर्धातास बाजूला ठेऊन द्या.
अर्ध्या तासांनंतर...
इडली पात्रात पाणी तापावयास ठेवून इडल्यांच्या ताटल्यांना तेलाचा पुसट हात लावुन घ्या.
इडली साच्यात थोडे थोडे किसलेले गाजर, कोथींबिर, तळलेले काजू आणि वाफवलेले मटार घालून ठेवा.
ताकात भिजवलेल्या रव्यात इनो सॉल्ट घालून एका दिशेने ढवळून इनो मिसळून घ्या. आता हे रव्याचे मिश्रण साच्यांमध्ये घालून इडली ताटल्या इडली पात्रात वाफावयास ठेवा.
१५-२० चांगल्या वाफवून बाहेर काढा. थंड होण्यासाठी १० मिनिटे ठेवा.
नारळाची चटणी:
किसलेला ओला नारळ १ वाटी
डाळं २-३ मोठे चमचे.
हिरव्या मिरच्या २-३
मोहरी, कढिलिंबं, उडीदाची डाळ, हिंग फोडणी साठी.
तेल
मिक्सरवर नारळ, डाळं, आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.
तेल तापवून मोहरी, कढीलिंब, उडीदाची डाळ आणि हिंग घालून फोडणी करून घ्या. ती फोडणी वाटलेल्या नारळावर टाका. मीठ घालून नीट मिसळून घ्या.
रवा इडली आणि चटणीचा मनसोक्त आस्वाद घ्या.
वरील प्रमाणात १०-१२ इडल्या होतात.
शुभेच्छा....!
वाचन
15078
प्रतिक्रिया
41