साहित्यः - १५/२० सॅलडची पाने , २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ मोठा कांदा, १वाटी भाजलेले दाणे , १टीस्पुन मीठ, १ टीस्पुन लाल तिखट ( आवडिनुसार कमीजास्त करावे), साखर चविनुसार, १/२ लिंबाचा रस, फोडणीसाठी ; १ टेबलस्पुन तेल, १टी स्पुन मोहरि , १ टीस्पुन हिंग , १टीस्पुन हळद.
कॄती :- सॅलडची पाने स्वछ धुऊन बारिक चिरुन घ्यावित, कांदा, टोमॅटो बारिक चिरुन घ्यावे.
दाणे सोलुन कुट करुन घ्यावे. नंतर एका बाऊलमधे चिरलेली सॅलडचि पाने , कांदा, टोमॅटो, दाण्याचे कुट, तिखट, मीठ, साखर, हळद घालावे . नंतर लिंबाचा रस घालावा..
एका छोट्या कढईत १ टेबलस्पुन तेल गरम करुन त्यात मोहरि घालावि मोहरी तडतडली कि हिंग घालावा आणि तयार झालेली फोडणी बाऊलमधिल साहित्यावर घालावी. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सॅलड तयार.

वाचने
4772
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
श्या !
सर्वांसाठी योग्य आहार आहे हा.
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
आवडती डीश..
नेहरिन जी , एक अप्रतिम रेसीपी दिली आहेत तुम्ही
ही पाकृही आवडली.