Skip to main content

मालवणी मसाला.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 09/04/2011 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-पाव किलो लाल सुक्या मिरच्या,१२५ ग्रॅम धणे,३ चमचे काळी मिरी,५ ग्रॅम लवंगा,२ चमचे जिरे, २ चमचे शहाजिरे,अंदाजे २-२ चमचे प्रत्येकी दालचिनी,मसाल वेलची,दगड्फूल,२ हलकुंडाचे तुकडे. कॢती:-मिरच्या सोडून सर्व पदार्थ मंद विस्तवावर कोरदे भाजा.लाल मिरच्या थोद्या तेलावर परतून घ्या. सर्व एकत्र कुटून घ्या.मसाला तय्यार्.बरणीत भरताना थोडे जाडे मिठ घाला.म्हणजे खराब होणार नाही.

वाचने 8233
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मी ही हेच विचारते मसाला कशा-कशात वापरू शकतो??

निवेदिता-ताई,सनिकास्वप्निल्:-हा मसाला कुठल्याही भाजीत किंवा मसाल्याच्या आमटीसाठी वापरु शकतो. RUPALI POYEKAR:-हा मसाला तिसर्या,मोरी,मटण,चिकन यासाठी वापरु शकतो.