मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश · · पाककृती
आमचे जर्मन आजी आजोबा शंकरपाळ्यांचे दिवाने आहेत.त्यांच्या मते वाईन बरोबर शंकरपाळे ए वन काँबिनेशन! आजोबा दर वसंतात त्यांच्या ५,६ जिवलग मित्रांबरोबर एखादा आठवडा कुठेतरी सहलीला जातात. ह्या सहलीला फक्त आजोबा मंडळीच असतात हं , (आजी मंडळी त्यांची वेगळी सहल वेगळ्या वेळी काढतात). तर ह्या 'आजोबा स्पेशल' सहलीचे नाव.."रोट वाईन टूअर"! अर्थात रेड वाईन शिवाय ही सहल 'सुफल संप्रूण' होत नाही. आणि त्यामुळेच ह्या सहलीसाठी खारे शंकरपाळे कर अशी आजोबांची फर्माईश असतेच असते. हे खारे शंकरपाळे खास त्यांची फर्माईश म्हणून केले होते.
साहित्य-१वाटी रवा,१ वाटी मैदा,१/४वाटी डाळीचं पीठ, २ टेबल स्पून तूप किवा ३ टेबल स्पून तेलाचे मोहन(म्हणजेच तेल गरम करुन) १/२ वाटी दही घुसळून,तिखट,मीठ,ओवा,जिरे प्रत्येकी १चहाचा चमचा तळणीसाठी तेल कृती-मैदा,रवा,डाळीचे पीठ एकत्र करा,त्यात तिखट,मीठ,ओवा,जिरे घाला व नीट मिसळून घ्या.तूप फेसून त्यात घाला किवा तेलाचे मोहन घाला,घुसळलेले दही घाला व कमीतकमी पाणी घालून घट्ट भिजवा.१०/१५ मिनिटे झाकून ठेवा.पोळ्या जरा जाड लाटून शंकरपाळे कापा,तळा.

वाचन 13537 प्रतिक्रिया 0