चिकन विंग्स्
साहित्यः
६ चिकन विंग्स्
२ टेस्पून आले-लसूण वाटून
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१/२ टीस्पून खाण्याचा लाल रंग ( ऐछिक)
१ कप टोमॅटो सॉस
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून कुटलेली काळीमिरी
१ कप मैदा / कॉर्न्फ्लवर
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
चिकन विंग्स् ला वाटलेले आले-लसूण, लिंबाचा रस, हळद आणी काळीमिरी चोळून ठेवावी.
लाल तिखट, खाण्याचा लाल रंग आणी मीठ लावून एकत्र करणे.
मैदा आणी टोमॅटो सॉस एकत्र करून ही पेस्ट चिकन विंग्स् ला लावून , झाकून ४-५ तास मुरू द्यावं.
पॅनमध्ये तेल तापवून मंद गॅसवर हे चिकन विंग्स् चांगले तळून घ्यावेत.
हवे असल्यास जास्त तेलात ही तळू शकतात (डीप फ्राय).
सॅलॅड्सोबत खायला द्या.
वाचने
5246
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
तोंडाला पाणी सुटले
मस्त... तोंडाला पाणी सुटले.
मी शाकाहारी असले तरी पाकृ
मस्त!
देव तुमचं कल्याण करो ... खरंच
एक शंका... न शिजवता तळले तर
एक शंका... न शिजवता तळले तर
बेस्ट