मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लुटा लुत्फ साध्या तांदळाच्या खिचडीचा :)

मराठमोळा · · पाककृती
नमस्कार मंडळी, भुक लागणे आणि त्यासाठी कर्म करणे हे माणसाचे एक मुल्य आहे असे मला वाटते, ;) घराबाहेर असल्यावर घरच्या जेवणाच्या चवीची आठवण येणे सहाजिकच आहे. :) असो, लोकांना आवडेल असे जेवण नेहमीच बनवतो पण फोटो घ्यायचे नेहमीच विसरतो, पण आज भुक जरा कमी असल्याने आणि त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. शेवटी कमीत कमी शेवटचा फोटो घेतलाच. :) बाहेर खायची इच्छा नसल्यास आणि भुकेवर साधा सरळ घरगुती उपाय म्हणजे तांदळाची खिचडी. :) चला तर, घ्या साहित्य.. तेलः तब्येतीनुसार मीठः चवीनुसार हिरवी मिरची: मानवेल तशी (उगाचच) आलं: १ ईंच तिखट: चवीनुसार लसुणः ४-५ मोठ्या पाकळ्या १-२ तुकडे दालचिनी २-३ ईलायची गाजरः १ फ्रेश वटाणे: मुठभर शेंगदाणे: मुठभर फ्लॉवरः थोडासा ;) कांदा: मोठा एक टोमॅटो: एक मिडियम बटाटा: मोठा एक कॉलीफ्लॉवरः अगदी थोडा. घरचा मसाला: २-३ चमचे (नसल्यास हरकत नाही, रेडीमेड वापरा ;) ) कृती: १. कुकर मधे तेल गरम करुन जिरं, मोहरी, दालचिनी, ईलायची तडकवा.. २. शेंगदाणे, कांदा, जिरं (हवं असल्यास) आणि मिरची तेल तापवुन त्यात टाका. २. थोडं थांबा हो.. ;) ३. थोडं हिंग टाका ४. मग कांदा,मिरची टाका. परता. ५. टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, बटाटा.. वगैरे सगळे मिक्स करा. ६. आलं, लसुण (अथवा पेस्ट) हिशोबानुसार टाका. १०-१५ मिनिटे परता. ७. तांदुळ, आणि (कोणत्याही) १-२ डाळी धुवुन घ्या. ८. आधीच्या जिन्नसात मिक्स करा, थोडा वेळ परता... :) ९. तांदुळ टाका, दोन पेरं बुडतील एवढं पाणि टाका झाकण लावा, ३-४ शिट्ट्या काढा, तोपर्यंत भुकेची कळ पण काढा १०. एक-दोन-तीन शिवास रिगल चे पेग रिचवा. ११. जेवण तयार आहे. दही असल्यास उत्तम. :)

वाचन 7082 प्रतिक्रिया 26