मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंबोरी रस्सा

शुचि · · पाककृती
Image removed. साहीत्य- ३ डझन खेकडे ५ टे. स्पून तेल ३ मोठे कांदे १ इंच आल्याचा तुकडा ४ मोठ्या पाकळ्या लसूण १० लहान तिखट मिरच्या १ घट्ट वाटी कोथींबीर २ घट्ट वाट्या ओलं खोबरं २ टी स्पून चिंचेचा घट्ट कोळ १ टी स्पून आलं-लसूण पेस्ट १ टी स्पून हळद १/२ टी स्पून हिंग ४ टी स्पून लाल तिखट ४ टी स्पून माशाच्या कालवणाचा मसाला ४ टी स्पून धणे-जीरे पावडर चवीप्रमाणे नारळाचं दूध चवीप्रमाणे मीठ Image removed.From Lotus हिरवं वाटण अर्थात कोथिंबीर, मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या वाटून तयार ठेवणे. खोबरं तेलावर लालसर परतून तयार ठेवणे आणि नंतर मिक्सरमधून काढणे. कांदा गुलाबी परतून तयार ठेवणे. Image removed.From Lotus चिंबोर्‍या स्वच्छ करून धुवून, नांग्या तोडून घेणे. मोठ्या नांग्या व मधला भाग वेगळा ठेवणे. लहान पाय वेगळे करणे. Image removed.From Lotus लहान पाय सगळे भरपूर पाणी घालून मिक्सरमधून काढणे व नंतर गाळून त्याचं पाणी घेणे. ह्याच पाण्याचा रस्सा होणार आहे. हुश्श!!!!! तयारी झाली बाई! _____________________________ आता एका मोठ्या कढल्यात थोडसं तेल तापवा, त्यावर आपला परतलेला गुलाबी कांदा घाला. थोड्या वेळातच चिंबोर्‍यांच्या मोठ्या नांग्या, मधले भाग ,लाल तिखट, माशाच्या कालवणाचा मसाला, हळद, हिंग, धण्याजीर्‍याची पूड, चिंचेचा कोळ व आलं-लसूण पेस्ट घाला. मध्यम आचेवर हे सर्व १० ते १५ मिनीटं मस्त उकळू द्यां. नंतर लालसर परतलेलं आणि मिक्सरमधून काढलेलं खोबरं घाला, मीठ, आणि जरा मेलो करायला नारळाचं दूध घालून, लहान नांग्यांचं आपण काढलेलं पाणी घालून परत मस्त उकळी येऊ द्या. आणि हा झाला चिंबोर्‍यांचा रस्सा तय्यार : ) Image removed.From Lotus

वाचन 8315 प्रतिक्रिया 25