मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चायनिज रोल

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
साहित्य : कोबी ( लांबडा कापून ), फरसबी ( डायमंड शेप ), गाजर ( लांबडं किसून ), कांदा( लांबडा कापून ), पातिचा कांदा ( फक्त मागची पात घेणे ), सिमला मिरची ( लांबडी पातळ कापून ), सोया सास , चिली सास , पांढरी मिरी पावडर मीठ, तेल, नूडल्स . कृती : सर्व भाज्या स्वच्छ धुवून तेलावर शिजेपर्यंत परतून घेणे. नंतर त्यात शिजवलेल्या नूडल्स घालून थोडा वेळ परतावे. मग त्यात चवीनुसार मीठ , मिरी पावडर , सोया व चिली सास घालून १० मि. परतून घ्यावे.गार होउन द्यावे. मग पट्टी मधे रोल करून तेलावर खरपूस तळून शेझवान चटणी आणि थंडगार बिअर बरोबर सर्व करावे. टीप : या पट्ट्या बाजारात विकत मिळतात आणि शेझवान चटणी सुद्धा. शेवटची वस्तू कुठे मिळते हे सांगण्याची गरज नाही. ( या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. )

वाचने 12663 वाचनखूण प्रतिक्रिया 16

गणपा Wed, 12/02/2009 - 16:23
यम्मी...... या चायनिज लोकांना आपण फक्त यासाठी मानतो बुवा. >>( या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. ) हा हे अस नाही करायच ब्वॉ. सांगा की आम्हालाबी तुमचे शिक्रेट ;) (आगामी आकर्षण इंडोचायनीज्) -माझी खादाडी.

समंजस Wed, 12/02/2009 - 16:13
पाकृ आवडली!! करायला बराच वेळ लागतो, खायला मात्र थोडाच :

स्वाती२ Wed, 12/02/2009 - 17:27
>>शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. ते सिक्रेट रेसिपीवाल्या सुगरणीसारखं नका करु. ताज्या शेजवानची पाकृ पण टाका.

रेवती Wed, 12/02/2009 - 17:53
मस्तच! आपणही त्या गणपासारखे बल्लव आहात. या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. अरे वा!! रेवती

प्रभो Wed, 12/02/2009 - 19:55
जबहरा..... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शाहरुख गुरुवार, 12/03/2009 - 06:36
>>थंडगार बिअर बरोबर सर्व करावे. =)) मॅनली रेसिपी आहे की.. करुन बघीन सवड मिळताच.

मदनबाण गुरुवार, 12/03/2009 - 08:44
श्री जोशी, हा पदार्थ मस्त लागतो... :) पाकृ वाचण्यास अंमळ त्रास झाला !!! ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

सूहास गुरुवार, 12/03/2009 - 14:23
नाही..नाही म्हणता ..पाकृ उघडलीच्...आणी माझ्या आवडत्या पेयाचा उल्लेख आढळला सोबत असे काही म्हणजे जबरा....पण त्यात शेजवान ...म्हणजे त्रिवेणी संगमच.. सू हा स...