Skip to main content

शशक'२०२२ - विश्वास

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 23/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध येस्स! आम्ही 2122 मध्ये सुखरूप पोचलोय! आता इस्रो मध्ये जाउन गेल्या 100 वर्षातली जर्नल्स भरभर चाळायला हवीत. हुश्श! इथल्या सिस्टिम्स वापरताना चांगलीच तारांबळ उडाली! अरुंधती तर घाबरलीच होती... एवढी हुशार क्वांटम फिजिकिस्ट, पण लहानसहान गोष्टीनं भीते! माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ती या कालप्रवासाला तयार झाली... असो, आता अभ्यास! अरे वा! कालप्रवासाच्या शोधाबद्दल अरूंधतीला नोबल प्राइज मिळालाय! पण यात माझं नाव कसं नाही? अरुंधती अनिरुद्धचा टाइम ट्रॅवलचा... सॉरी, कालप्रवासाचा! शोध सक्सेसफुल झालाय. आता मला एकच गोष्ट करायचीय... तो रात्री झोपला, की एकटीनं टाइम कॅप्सुल घेऊन 2022 मध्ये परत जायचं. मग पैसा, प्रसिद्धी आणि नोबल प्राइज... सगळं काही माझं. माझं एकटीचं!

वाचने 8948
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कथानक ठीक, लेखनशैली आवडली

+१

+1

-१ आवडली नाही कथा. टाईम ट्रॅव्हल चं लॉजिक पटल नाही. तीने हे असे केले .समजा अनिरुद्ध ने त्या दिवसाच्या आदल्या दिवशी येवून अरुंधतीलाच नाहीसे केले तर?

In reply to by विजुभाऊ

पण काल प्रवास यंत्र अरुंधती घेऊन गेली ना २०२२ मध्ये. आता अनिरुद्ध कसा परत जाणार? तो राहिला २१२२ मध्ये. *मला सुचलेलं स्पष्टीकरण. कथा माझी नाही.

+१ ok डोके

अच्छा, अरुंधती सध्या हे करते!