Skip to main content

शशक'२०२२ - अनोळखी मदत

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 19/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, शुकशुक , अहो लाल शर्टवाले, हां इकडे इकडे वर वर…" "जरा वरती या ना; मदत पाहिजे मी अडकलोय इथे, दरवाजाला बाहेरुन कडी लावली आहे कोणीतरी ती काढा ना." " इथुन मागे या, तिकडेच जीना आहे." धापा टाकत तो शेवटच्या मजल्यावर आला, अंधरवजा बोळात एक शिसवी लाकडाचा प्रचंड दरवाजा दिसत होता, कडी नव्हतीच त्याला. हँडलला जोर लावुन त्याने तो ढकलला तसा करर्र आवाज करत तो उघडला, आत काहीच दिसत नव्हतं बर्याच दिवस खोली बंद असली तर जसा कुबट वास येतो तसा भपकरा आला. त्याच्या हाताला हिसडा बसला आणि तो आत ओढला गेला.. ---------------------------------------------------------------------------------- "अहो शुक शुक , अहो सायकवाले मामा हां इकडे इकडे वर…"

वाचने 14502
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

+१

अपेक्षित शेवट, जरा कलाटणी देऊन अनपेक्षित परिणाम साधता आला असतात. पण ठीक +१

+१

+१

+१

+१


भारी आहे, आवडली.

+१ अपेक्षित शेवट!पण लेखनाचे छान टप्पे!

+१

+१

+१

+१

+१

विहिरीपाशी आकडे मोजणार्‍या वेड्याचा विनोद मी पस्तीस वर्षांपूर्वीच ऐकला होता. त्यालाच इथे कथेचे स्वरुप दिले आहे.

In reply to by सुरसंगम

विहिरीपाशी एक माणूस एकटाच बडबडत होता - "एकतीस, एकतीस, एकतीस ...." काही वेळाने एक वाटसरु तिथे आला आणि विहीरीजवळच्याला विचारु लागला, "काय झालं? एकतीस काय?" विहिरीजवळचा उत्तर न देता फक्त विहिरीकडे बोट दाखवून पुन्हा एकतीसचाच जप करीत राहिला. याला मदतीची गरज असावी असा विचार करीत वाटसरु त्याच्या जवळ गेला तर विहिरीजवळच्या इसमाने त्याला विहिरीतच ढकलून दिले आणि आता त्याचा नवा जप सुरु झाला, "बत्तीस, बत्तीस, बत्तीस...."

+१