Skip to main content

शशक'२०२२ - कौतुक

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 07/05/2022 12:05 या दिवशी प्रकाशित केले.

मी सांगणार, तो लिहणार, मग मोजत बसणार ! नाही गं जमणार हे या लेखकांसारखे शशक लिहणे, हताश होत तो उद्गारला..
तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे..
अस्स ! मी जे केले ते जमेल का तुझ्या मिपावरच्या एका तरी धुरंधराला ?
पुरे झाला तुमचा फाजीलपणा ! तुमच्या त्या +१ च्या नादात मी पण फार वाहवत गेले.
व्वा ! म्हणजे माझी एकट्याचीच चुक, आता थांबू मग !
अर्थात ! आणि त्या लेखकांना दुसरे बरेच काही सुचत असते म्हंटले, तुम्हाला दुसरे काहीच दिसत नाही !
तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच राहिले नाही राणी! मिश्कीलपणे हसत व

शंभराव्या मुलाचा गालगुच्चा घेत धृतराष्ट्र गांधारीमहालातून बाहेर पडला..


वाचने 15115
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

=))

>>>तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे

या वाक्यातच दुसरा, तिसरा, चौथा, वगैरे अर्थ मनात घोळुनच गेला होता. =))

-दिलीप बिरुटे
(चावट) :)


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे

या वाक्यातच दुसरा, तिसरा, चौथा, वगैरे अर्थ मनात घोळुनच गेला होता. =))
>> अगदी!!


वा,
'यदाकदाचित' मधला गुडघे चोळत व्हीलचेअरमधुन उठणारा लवचिक धृतराष्ट्र आणि भव्य डॅन्सर गान्धारी डोळ्यासमोर आले.
नो प्लस वन.


हा हा, मस्त ..
तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच.. म्हणजे शत कौरव का ?
शशक चे वेड बरेच जुने म्हणायचे ..


=)))))
+१

लै भारी.
शेवटचे वाक्य वाचले अन फुटलो !